केसांना मेहेंदी-डाय लावणे नको वाटते? 'हा' घरगुती हर्बल रंग लावा- पांढरे केस होतील काळे
Updated:May 17, 2025 15:48 IST2025-05-17T15:24:15+5:302025-05-17T15:48:44+5:30

हल्ली कमी वयात केस पांढरे होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. कमी वयापासूनच केसांवर वेगवेगळे केमिकलयुक्त रंग ट्राय करायला नकोसे वाटते.(best home remedies for naturally black hair)
शिवाय मेहेंदी लावून केस रंगविण्याचाही कंटाळा येतो. आधी दोन तास मेहेंदी भिजवून ठेवा. नंतर ती केसांना लावा, शिवाय मेहेंदी धुवायलाही खूप वेळ लागतो. ही सगळी प्रक्रिया अनेकींना खूप किचकट आणि वेळखाऊ वाटते.(how to colour hair without applying mehendi or hair dye?)
म्हणूनच जर तुम्हाला मेहेंदी किंवा बाजारात विकत मिळणारे हेअर कलर वापरून केस रंगविण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करा. यामुळे केस नक्कीच छान काळेभोर होण्यास मदत होईल. हा उपाय कसा करायचा याविषयीची माहिती mirror_salon_academy_nashik या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.(how to get rid of gray hair?)
हा उपाय करण्यासाठी कलौंजी पावडर केसांना छान पोषण देते.
इंडिगो पावडरमुळे केसांना काळा रंग येण्यास मदत होते आणि केसांचा पांढरेपणा झाकला जातो.
आवळा पावडरमुळे तुमच्या केसांना रंग आणखी गहिरा होण्यास मदत होते. अनेकजणींना केसांना लालसर रंग आलेला आवडत नाही. त्यांच्यासाठी आवळा पावडर उपयुक्त ठरते. कारण यामुळे केस लालसर होत नाहीत.
ब्राह्मी पावडरमुळेही केसांचा रंग आणखी गडद होण्यास मदत होते. या सगळ्या पावडर समप्रमाणात एकत्र करून केसांना लावा. आणि दिड ते दोन तासाने केस धुवून टाका. यामुळे केसांना नैसर्गिकपणे काळा रंग येण्यास मदत होईल.