केस गळणं किंवा कोंडा, समस्या कोणतीही असो केसांच्या सर्व समस्यांवर ‘हा’ एकच उपाय- त्रासच संपतील कायमच
Updated:October 8, 2025 15:05 IST2025-10-08T13:24:13+5:302025-10-08T15:05:49+5:30

केस गळणे, केसांची वाढ न होणे, केस खूप पातळ असणे, केस कोरडे असणे, कमी वयात केस पांढरे होणे, अशा केसांच्या कोणत्याही तक्रारी असतील तर त्या कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करायचे ते पाहा..
केस गळत असतील तर २ चमचे कांद्याचा रस, १ चमचा कोरफडीचा गर आणि एरंडेल तेलाचे काही थेंब एकत्र करा आणि आठवड्यातून २ वेळा केसांच्या मुळाशी लावा. काही दिवसांतच केस गळणं कमी होऊन नवीन केस यायला सुरुवात होईल.
केस खूप पातळ असतील तर ते दाट करण्यासाठी १ चमचा भिजवून वाटून घेतलेल्या मेथीच्या दाण्यांची पेस्ट, १ चमचा नारळाचे दूध एकत्र करा आणि केसांच्या मुळाशी लावा. अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका.
केस खूप कोरडे आणि चिकट झाले असतील तर २ चमचे दही, १ चमचा मध आणि १ चमचा बदाम तेल एकत्र करून केसांना लावा. अर्धा ते पाऊण तासाने केस धुवून टाका. केस छान मऊ होतील.
केसांवर चमक राहिली नसेल तर ते चमकदार आणि सिल्की होण्यासाठी १ केळ मॅश करून घ्या. त्यामध्ये १ चमचा मध आणि १ चमचा ओलिव्ह ऑइल घालून हा हेअर मास्क केसांच्या मुळापासून ते टोकापर्यंत लावा. अर्ध्या ते पाऊण तासाने केस धुऊन टाका.
डोक्यात खूप काेंडा झाला असेल तर २ चमचे दही, १ चमचा कडुलिंबाची पावडर किंवा मिक्सरमधून बारीक केलेली कडुलिंबाच्या पानांची पेस्ट आणि १ चमचा लिंबाचा रस एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा. एखाद्या तासाने केस धुूवून टाका. डोक्यातला कोंडा, डोक्याला येणारी खाज कमी होईल.
केसांची चांगली वाढ व्हावी यासाठी १ चमचा कोरफडीचा गर, १ चमचा कांद्याचा रस, अर्धा चमचा खोबरेल तेल आणि १ चमचा भिजवून वाटून घेतलेल्या मेथी दाण्यांची पेस्ट एकत्र करा. अर्धा तास हा लेप केसांच्या मुळाशी लावून ठेवा आणि त्यानंतर सौम्य शाम्पू वापरून केस धुवून घ्या.