डोक्यात कोंडा अजिबात होणार नाही, महिन्यातून फक्त एकदा ' या ' पद्धतीने केस धुवा, कोंडा गायब
Updated:February 6, 2026 16:16 IST2026-02-06T16:11:21+5:302026-02-06T16:16:25+5:30

बऱ्याच जणांची एक समस्या म्हणजे डोक्यातला कोंडा. हिवाळ्याच्या दिवसात तर कोंड्याचे प्रमाण खूप जास्त वाढते.(best home hacks to get rid of dandruff)
कोंडा वाढला की डोक्यात खूप खाज यायला लागते. शिवाय केस गळण्याचे प्रमाणही वाढते.(how to reduce dandruff?)
म्हणूनच या सगळ्या तक्रारी कमी करायच्या असतील तर डोक्यातला कोंडा सगळ्यात आधी गेला पाहिजे आणि तो कसा घालवायचा याचा एक सोपा उपाय जावेद हबीब यांनी शेअर केला आहे.(home hacks for dandruff free hair by Javed Habib)
जावेद हबीब सांगतात की हा उपाय करण्यासाठी दीड ते दोन चमचे तुमचा नेहमीचा शाम्पू घ्या.
त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घाला. दोन्ही पदार्थ व्यवस्थित एकजीव करून घ्या आणि त्यानंतर ते डोक्याच्या त्वचेला लावून हलक्या हाताने स्काल्पला चोळा.
त्यानंतर केस धुवून टाका. डोक्यातला कोंडा बऱ्याच प्रमाणात गेलेला असेल.हा उपाय महिन्यातून एकदाच करा. दर महिन्याला तुम्ही हा उपाय नेहमीच करत गेलात तर तुमच्या डोक्यात कधीच कोंडा होणार नाही.