कमी वयात केस पांढरे आणि पातळ झाले? बघा उपाय- केसांच्या सगळ्याच तक्रारी संपून जातील
Updated:October 27, 2025 15:12 IST2025-10-27T15:06:46+5:302025-10-27T15:12:43+5:30

केसांच्या तक्रारी हल्ली खूप वाढल्या आहेत. ८० टक्के लोक केसांच्या वेगवेगळ्या तक्रारींमुळे त्रस्त आहेत.
काही घरगुती उपाय केले तर या तक्रारी नक्कीच कमी होऊ शकतात. त्यासाठी काय करावं याविषयीची आहारतज्ज्ञ लीना महाजन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली खास माहिती..
केस खूप जास्त गळत असतील तर १ चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्यादिवशी भिजलेले मेथी दाणे आणि आवळा एकत्र वाटून तो लेप केसांच्या मुळाशी लावा. एखाद्या तासाने केस धुवून टाका.
केस चांगले वाढावेत यासाठी १०० मिली पाण्यामध्ये रोजमेरी ऑईलचे १ ते २ थेंब टाका आणि हे पाणी केसांच्या मुळाशी लावा. केस छान वाढतील.
केस तुटत असतील तर आहारात ओमेगा ३ देणारे पदार्थ वाढवा. यासाठी तुम्ही अक्रोड, जवस, बदाम असे पदार्थ खाऊ शकता.
केस कमी वयात पांढरे होत असतील तर रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये १ ग्लास पाणी ठेवा आणि दुसऱ्यादिवशी सकाळी ते प्या. तसेच काळे तीळ रोज खा.
जर केस खूप जास्त फ्रिजी असतील तर चांगल्या दर्जाचं हेअर सिरम तुमच्या कंडिशनरमध्ये घाला. ते केसांना लावा आणि १० मिनिटांनी केस धुवून टाका.