Dusshera Special : छोले भिजवायला विसरलात? आयत्यावेळी 3 ट्रिक्स करा, झटपट मऊ होतील छोले-पटकन शिजतील,

Updated:October 1, 2025 21:50 IST2025-10-01T20:49:42+5:302025-10-01T21:50:30+5:30

Best Hacks For Unsoaked Chhole : अनेकदा काबुली चणे भिजवायला विसरायला होतं अशावेळी काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकता.

Dusshera Special : छोले भिजवायला विसरलात? आयत्यावेळी 3 ट्रिक्स करा, झटपट मऊ होतील छोले-पटकन शिजतील,

छोलेची भाजी म्हणजे काबुली चण्यांची भाजी सर्वांनाच खायला आवडते. पण छोले करायचे म्हणजे चणे आदल्या दिवशी भिजवावे लागतात. (Best Hacks For Unsoaked Chhole Instant Softening)

Dusshera Special : छोले भिजवायला विसरलात? आयत्यावेळी 3 ट्रिक्स करा, झटपट मऊ होतील छोले-पटकन शिजतील,

अनेकदा काबुली चणे भिजवायला विसरायला होतं अशावेळी काही सोप्या टिप्स तुमचं काम सोपं करू शकता.

Dusshera Special : छोले भिजवायला विसरलात? आयत्यावेळी 3 ट्रिक्स करा, झटपट मऊ होतील छोले-पटकन शिजतील,

चणे स्वच्छ धुवून एका भांड्यात घ्या आणि त्यात पुरेसे पाणी घाला. या पाण्यात एक चिमूटभर किंवा पाव चमचा खाण्याचा सोडा मिसळा. हे मिश्रण लगेच कुकरमध्ये घाला आणि सामान्य वेळेपेक्षा १-२ शिट्या जास्त घेऊन शिजवा. सोडा चण्यांची बाहेरील साल मऊ करतो आणि ते लवकर शिजण्यास मदत करतो.

Dusshera Special : छोले भिजवायला विसरलात? आयत्यावेळी 3 ट्रिक्स करा, झटपट मऊ होतील छोले-पटकन शिजतील,

चणे स्वच्छ धुवून घ्या. एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात चणे घाला. चणे गरम पाणी शोषून घेतात आणि लवकर फुलतात. १.५ ते २ तासांमध्ये चणे फुगून तयार होतील. त्यानंतर ते कुकरमध्ये शिजवा.

Dusshera Special : छोले भिजवायला विसरलात? आयत्यावेळी 3 ट्रिक्स करा, झटपट मऊ होतील छोले-पटकन शिजतील,

काबुली चणे स्वच्छ धुवून घ्या आणि एका मोठ्या भांड्यात पुरेसे पाणी घेऊन त्यात घाला. हे भांडे गॅसवर ठेवा आणि तीव्र आचेवर (High Flame) चणे २० ते २५ मिनिटे चांगले उकळू द्या. २५ मिनिटांनी गॅस बंद करा. भांड्यावर झाकण ठेवून ते चणे १ ते १.५ तास तसेच गरम पाण्यात मुरू द्या.

Dusshera Special : छोले भिजवायला विसरलात? आयत्यावेळी 3 ट्रिक्स करा, झटपट मऊ होतील छोले-पटकन शिजतील,

या प्रक्रियेमुळे चणे व्यवस्थित फुलतात आणि ते साध्या पाण्यात भिजवल्याप्रमाणे मऊ होतात. त्यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवू शकता.