शुद्ध तुपाचं घरगुती काजळ, डोळे दिसतील सुंदर आणि केमिकल असलेले धोकादायक काजळ वापरणं बंद
Updated:May 29, 2025 10:25 IST2025-05-29T10:22:00+5:302025-05-29T10:25:01+5:30
How to make kajal at Home: Homemade kajal for eyes: Traditional kajal: केमिकल फ्री वॉटरप्रुफ काजळ घरच्या घरी करण्यासाठी सोपी पारंपरिक पद्धत पाहा.

आपल्या डोळ्यांना अधिक सुंदर आणि आकर्षित बनवण्याचे काम काजळ करते. काजळशिवाय आपला मेकअप लूक पूर्ण होत नाही. बाजारात अनेक केमिकल्स असणारे काजळ पाहायला मिळतात. परंतु, त्यात असणारे घटक आपल्या डोळ्यांच्या वेदना वाढवतात. (How to make kajal at Home)
केमिकल फ्री वॉटरप्रुफ काजळ घरच्या घरी करण्यासाठी सोपी पारंपरिक पद्धत पाहा. (Homemade kajal for eyes)
घरी काजळ बनवण्यासाठी आपण मातीचा दिवा, शुद्ध तूप आणि कापसाची वात लागेल. दिव्यात तूप भरुन कापसाची वात पेटवा. दिव्याच्या ज्वालेवर ताट उलटे ठेवा. ज्यामुळे काजळ तयार होण्यास मदत होईल.
प्लेटवर साचलेले काजळ चमच्याने घासून काढा. लहान ताटात गोळा करा. त्यात शुद्ध तूप किंवा खोबऱ्याचे तेल मिसळा आणि त्याची पेस्ट तयार करा.
बदाम जाळून ते काळे होईपर्यंत आगीवर भाजून घ्या. एका प्लेटवर घासून त्याची काजळी गोळा करा. त्यात नारळाचे तेल मिसळून पेस्ट बनवा.
कापूर जाळून त्याची काजळी स्टीलच्या प्लेटवर गोळा करा आणि त्यात थोडे तूप मिसळून काजळ बनवा.
घरी बनवलेले काजळ एका लहान डब्बीत साठवा. ती डब्बी स्वच्छ आणि कोरडी असायला हवी. याचा वापर आपण १५ ते २० दिवस करु शकतो.
घरगुती काजळ डोळ्यांना लावल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो. तसेच जळजळ किंवा ऍलर्जीचा धोका निर्माण होत नाही.