सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

Updated:January 1, 2026 22:20 IST2026-01-01T22:20:00+5:302026-01-01T22:20:02+5:30

according to saree colour matching makeup tips : saree colour matching makeup : makeup tips according to saree colour : लाल पासून निळ्या साडीपर्यंत...पहा प्रत्येक रंगासाठी परफेक्ट मेकअप शेड्स....

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

सुंदर अशी साडी नेसली की तिचा लूक परिपूर्ण किंवा परफेक्ट, सुंदर दिसण्यासाठी उठावदार (according to saree colour matching makeup tips) आणि योग्य मेकअप असणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र अनेकदा साडी कितीही महागडी किंवा आकर्षक असली तरी लिपस्टिकची चुकीची शेड किंवा आयशॅडोचा न शोभणारा रंग संपूर्ण लूक बिघडवू शकतो. एखादी सुंदर पैठणी असो किंवा मॉडर्न शिफॉन साडी, ती नेसल्यावर आपण आरशात स्वतःला पाहतो तेव्हा एक वेगळाच आत्मविश्वास आणि सुंदर लूक दिसतो. पण, साडी नेसून तयार होताना सर्वात मोठा गोंधळ उडतो तो म्हणजे 'मेकअप' करताना...

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

साडीचा रंग गडद असेल तर लिपस्टिक फिकट लावावी का? डोळ्यांचा मेकअप साडीला मॅचिंग (saree colour matching makeup) असावा की कॉन्ट्रास्ट? साडीवर रेड लिपस्टिक चालेल का?”, “ब्राइट साडीवर हेवी आयमेकअप करावा का?” असे प्रश्न प्रत्येकीला पडतात. अशा अनेक प्रश्नांमुळे अनेकदा आपला लूक हवा तसा उठून दिसत नाही. चुकीची लिपस्टिक शेड किंवा अती भडक आयशॅडो तुमचा पूर्ण लूक बिघडवू शकतो.

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

खरंतर, साडीच्या रंगानुसार परफेक्ट लिपस्टिक, आयशॅडो आणि मेकअप शेड (makeup tips according to saree colour) निवडली तर अगदी साधी साडीही ग्लॅमरस दिसू शकते. यासाठी कोणत्याही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टची गरज नाही, फक्त काही स्मार्ट टिप्स माहिती असणं आवश्यक आहे. साडीच्या रंगानुसार मेकअप कसा असावा आणि लिपस्टिक-आयशॅडो शेड योग्य पद्धतीने कशी निवडावी याच्या सोप्या ट्रिक्स पाहूयात. साडीच्या रंगानुसार मेकअपच्या अशा काही खास टिप्स फॉलो केल्या तर आपण कोणत्याही खास प्रसंगी किंवा फंक्शनमध्ये 'सेंटर ऑफ अट्रॅक्शन' ठराल!

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

पिवळ्या रंगाच्या साडीवर ब्राऊन किंवा ब्रॉन्झ रंगाचा आयशॅडो सुंदर दिसतो. लिपस्टिक शेडमध्ये, कोरल, ब्राईट रेड किंवा टेराकोटा शेड्मधील लिपस्टिक लावल्याने ओठांना अधिक उठावदारपणा येतो. गालांवर वॉर्म टोन्ड असलेला किंवा ब्रॉन्झ शेडमधील ब्लश लावावा.

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

साडीच्या हिरव्या रंगाशी जुळणारा किंवा स्मोकी, गोल्ड आयशॅडो आणि काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या आयलायनरचा वापर करावा. ओठांवर कोरल, पीच किंवा न्यूड पिंक शेड्समधील लिपस्टिक फारच सुंदर दिसतात. रात्रीच्या फंक्शनसाठी आपण डीप बेरी रेड रंगाची लिपस्टिक लावली तरी लूक खास उठून दिसतो. गालांवर पिंक किंवा पीच ब्लश लावल्याने लूक नॅचरल व सुंदर दिसतो.

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

जर तुम्ही कोणत्याही खास प्रसंगी निळ्या रंगाची साडी नेसणार असाल तर, डोळ्यांसाठी सिल्व्हर किंवा हलक्या निळ्या रंगाची आयशॅडो लावावी. यासोबतच, ब्लॅक स्मोकी आय निळ्या साडीवर खूपच जास्त शोभून दिसतो. ओठांवर हलक्या गुलाबी, रोझ किंवा न्यूड लिपस्टिक शेड्स परफेक्ट मॅच होतात. गालावर हलका गुलाबी ब्लश अधिक जास्त सूट होतो.

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

गुलाबी रंगाची साडी नेसणार असाल तर डोळ्यांवर, गुलाबी आणि तपकिरी रंगाचे मिश्रण असलेले आयशॅडो लावा, यासोबतच फक्त साधा मस्कारा किंवा आयलायनर लावा. ओठांवर साडीच्या रंगाशी मिळताजुळता पिंक शेड किंवा हलका गुलाबी तसेच बेबी पिंक रंगाचा लीप ग्लॉस देखील सुंदर दिसेल. ब्लश लावताना मॅचिंग पिंक ब्लश अधिक जास्त परफेक्ट मॅच होईल.

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

लाल रंगाच्या साडीवर गुलाबी आणि तपकिरी रंगाचे मिश्रण असलेले आयशॅडो लावा, यासोबतच फक्त साधा मस्कारा किंवा आयलायनर लावा. ओठांवर साडीच्या रंगाशी मिळताजुळता पिंक किंवा रेड शेड किंवा हलका गुलाबी तसेच बेबी पिंक रंगाचा लीप ग्लॉस देखील सुंदर दिसेल. ब्लश लावताना हलकासा पिंक ब्लश गालांवर लावल्याने लूक पूर्ण होईल.

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

गोल्डन किंवा न्यूड शिमर आयशॅडो डोळ्यांवर लावा सोबतच क्लासिक रेड किंवा मरून रंगाची लिपस्टिक तुमच्या ओठांना एकदम नॅचरल लूक देईल. डोळ्यांचा मेकअप हलका ठेवावा, जेणेकरून ओठ उठून दिसतील.

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

काळ्या रंगाच्या साडीवर रेड, प्लम, डीप बेरी, बोल्ड रेड किंवा वाईन शेड्समधल्या सगळ्या लिपस्टिक खूपच उठावदार आणि बोल्ड लूक देतात. पापण्यांवर आयशॅडो लावताना स्मोकी ब्लॅक, ग्रे, गोल्ड या तीन रंगाच्या आयशॅडो परफेक्ट मॅचिंग होतात. काळ्या साडीवर स्मोकी आईज आणि बोल्ड लिप्स परफेक्ट आणि बोल्ड लूक देतात.

सुंदर साडी नेसूनही मेकअप उठून दिसत नाही? करा साडीच्या रंगानुसार परफेक्ट शेडचा मेकअप - दिसाल चारचौघीत उठून...

पांढऱ्या किंवा ऑफ-व्हाईट रंगाच्या साडीवर न्यूड, पीच, सॉफ्ट रेड लिपस्टिक अत्यंत देखण्या दिसतात. आयशॅडोमध्ये ब्राउन, शॅम्पेन, लाइट गोल्ड रंगाच्या शेडसमुळे तुमचा लूक अधिकच खुलून दिसतो.