तेलात ५ गोष्टी मिसळून केसांना लावा, केस वाढतील भरभर आणि खर्च ५ रुपयांपेक्षाही कमी!
Updated:July 9, 2025 13:40 IST2025-07-08T19:51:31+5:302025-07-09T13:40:48+5:30
5 Things To Mix To Your Hair Oil If You Want Quick Hair Growth : Faster Hair Growth Tips : 5 Natural Secrets for Rapid Hair Growth : 5 Ways to Make Your Hair Grow Faster and Stronger : तुमच्या नेहमीच्या तेलात मिसळा हे ५ स्वस्तात मस्त पदार्थ, केस वाढतील दुप्पट वेगाने...

केसांची वाढ खुंटणे, केसगळती किंवा केसांची मुळे कमजोर होणं अशा केसांच्या समस्या (5 Things To Mix To Your Hair Oil If You Want Quick Hair Growth) प्रत्येकीलाच सतावतात. यावर उपाय म्हणून अनेकजणी महागडी तेलं, सीरम्स आणि ट्रीटमेंट्स करतात. परंतु हे सगळं करताना आपण एक साधासुधा आणि नैसर्गिक उपाय विसरतो. आपल्या नेहमीच्या वापरातील तेलामध्ये काही घरगुती पदार्थ मिसळले तर केसांची वाढ दुप्पट वेगाने होते.
आपल्या नेहमीच्या वापरातील तेलात काही घरगुती ( Faster Hair Growth Tips) पदार्थ मिसळल्यास, तेल अधिक औषधी आणि केसांसाठी फायदेशीर ठरते.
घरच्याघरीच उपलब्ध असलेल्या ५ पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तेलात मिसळून केसांच्या वाढीसाठी एक उत्तम उपाय ठरू शकतात.
१. कडीपत्त्याची पेस्ट :-
कडीपत्त्याच्या पानांमध्ये बायोटिन, बीटा-कॅरोटीन आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. कडीपत्त्याच्या पानांमधील हे घटक केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केस तुटण्याची समस्या कमी करतात. मूठभर ताजी कडीपत्त्याची पानं घ्या आणि कोमट खोबरेल तेल किंवा बदाम तेलात साधारण एक तास भिजवा. नंतर हे मिश्रण मिक्सरमध्ये पेस्टसारखं वाटून घ्या. ही पेस्ट स्काल्पवर नीट मसाज करत लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी सौम्य शॅम्पूने केस धुवा. या उपायामुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते, केसांच्या मुळांना बळकटी मिळते आणि केसांची वाढ जलद, दाट व निरोगी होते.
२. मेथी दाण्यांची पेस्ट :-
मेथीच्या बियांमध्ये प्रथिने, व्हिटॅमिन सी, फॉलिक अॅसिड आणि लोह भरपूर प्रमाणात असते. हे सर्व पोषक घटक केसांच्या जलद वाढीसाठी अत्यावश्यक असतात. दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. हे दाणे बारीक वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट नेहमीच्या तेलात मिसळा. हे मिश्रण स्काल्प आणि केसांना लावा, तासभर तसेच ठेवून नंतर थंड पाण्याने केस धुवा. या उपायाने केस अधिक दाट, लवचिक आणि मजबूत होतील. केस तुटण्याचे प्रमाण कमी होईल आणि केसांना नैसर्गिक चमकही मिळेल.
३. कांद्याचा रस :-
कांद्याच्या रसामधील सल्फरच्या प्रमाणामुळे स्काल्पचे रक्ताभिसरण वाढवते आणि केसांची वाढ मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होते. कांद्याचा रस २ टेबलस्पून घेऊन नेहमीच्या तेलात मिसळा. टाळूला मालिश करा आणि किमान ३० मिनिटे किंवा शक्यतो रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी सौम्य शाम्पूने केस स्वच्छ धुवा.आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्याने, केसगळती कमी होऊन केसांची जलद वाढ दिसून येईल.
४. एलोवेरा जेल :-
एलोवेरा जेल स्काल्पची पीएच लेव्हल संतुलित ठेवते आणि खोलवर पोषण देत टाळूला कंडिशन करते. हे सर्व घटक केसांची निरोगी वाढ करण्यास फायदेशीर ठरतात. २ टेबलस्पून एलोवेरा जेल घ्या आणि ते नेहमीच्या तेलांत मिसळून केसांना लावा. हे मिश्रण स्काल्पवर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करत लावा. नंतर तासभर तसेच केसांवर राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस स्वच्छ धुवा. या उपायाने, केसांतील कोंडा कमी होईल, केस अधिक मऊमुलायम, मजबूत आणि चमकदार दिसतील. नियमित वापर केल्यास केसांची वाढ सुधारते.
५. इसेंन्शियल ऑईल :-
केसांची वाढ वेगाने होण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि स्काल्पच्या विविध समस्या दूर करण्यासाठी इसेंन्शियल ऑईल हे खरेतर एक मिनी पॉवरहाऊसच आहेत. तुमच्या नेहमीच्या तेलात आपण पेपरमिंट,रोझमेरी, लव्हेंडर अशा वेगवेगळ्या प्रकारची इसेंन्शियल ऑईल मिसळू शकता. या तेलाने स्काल्पवर ५ मिनिटे खोलवर मसाज करा. तासभर किंवा रात्रभर ठेवून नंतर शाम्पूने केस धुवा.
६. तेल लावल्यानंतर केसांना उबदार, ओल्या टॉवेलमध्ये गुंडाळणे म्हणजे, स्काल्प आणि केसांसाठी एक मिनी स्पा ट्रीटमेंटच! गरम टॉवेलमधून तयार होणारी वाफ केसांच्या क्यूटिकल्स आणि स्काल्पवरील छिद्रं उघडण्यास मदत करते, ज्यामुळे तेल अधिक खोलवर शोषले जाते आणि केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते. या प्रक्रियेमुळे स्काल्पमधील रक्ताभिसरण वाढते, पोषक घटक अधिक प्रभावीपणे शोषले जातात आणि त्यामुळे केसांची वाढ अधिक जलद व निरोगी होते. त्यामुळे दरवेळी तेल लावल्यानंतर हा छोटासा फायदेशीर उपाय करायला विसरू नका.