घरीच करा डोळ्यांसाठी नॅचरल आयमास्क, थकलेल्या डोळ्यांना मिळेल गारवा-डोळे दिसतील सुंदर...
Updated:June 21, 2025 20:01 IST2025-06-21T19:44:24+5:302025-06-21T20:01:03+5:30
5 Relaxing Eye Masks That Can Be Made At Home : Relax Your Eyes With These Effective Eye Masks : Homemade recipe for eye masks and compresses to relax : स्वयंपाकघरातील साध्या व सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या मदतीने आपण डोळ्यांची काळजी घेऊ शकतो.

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स, सूज, थकवा आणि कोरडेपणा या डोळ्यांशी (5 Relaxing Eye Masks That Can Be Made At Home) संबंधित फारच कॉमन समस्या झाल्या आहेत. सतत स्क्रीनकडे पाहणं, झोपेची कमतरता, ताणतणाव यामुळे डोळे व डोळ्यांखालची त्वचा ही वेळेआधीच थकलेले वाटू लागतात. या समस्यांवर घरच्या घरी तयार करता येणारे नैसर्गिक आयमास्क अत्यंत फायदेशीर ठरू शकतात(Homemade recipe for eye masks and compresses to relax).
स्वयंपाकघरातील साध्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांच्या (Relax Your Eyes With These Effective Eye Masks) मदतीने आपण डोळ्यांची योग्य ती काळजी घेऊ शकतो. आपण असेच काही सोपे, नैसर्गिक आणि परिणामकारक आयमास्क पाहणार आहोत, जे डोळ्यांना थंडावा, पोषण आणि डोळ्यांखालील त्वचा नव्याने तजेलदार करण्यास मदत करतील.
१. काकडीचा आयमास्क :-
फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवलेल्या काकडीचे पातळ काप करावेत किंवा काकडी किसून देखील वापरु शकतो. काकडीचे ताजे थंडगार स्लाइस किंवा किस डोळ्यांवर १० ते १५ मिनिटे ठेवा. यामुळे डोळ्यांखालचे डार्क सर्कल्स कमी होऊन थकलेल्या डोळ्यांची सूज उतरवतो.
२. गुलाबपाणी व मधाचा आयमास्क :-
प्रत्येकी १ टेबलस्पून मध आणि गुलाबपाणी घेऊन त्याचा आयमास्क तयार करावा. तयार आयमास्क डोळ्यांभोवती लावा, १० मिनिटांनी धुवा. या उपायामुळे डोळ्यांभोवतीच्या त्वचेला पोषण मिळते व डोळ्यांचा थकवा दूर होतो.
३. एलोवेरा जेल :-
ताजे एलोवेरा जेल काढून ते फ्रिजमध्ये थोडे थंड होण्यासाठी ठेवून द्या. एलोवेरा जेल थंड झाल्यावर, हे जेल डोळ्यांभोवती लावा व १५ मिनिटे तसेच ठेवून द्या नंतर धुवा. डोळे व डोळ्यांखालील त्वचेचा कोरडेपणा दूर करून त्वचेला मॉइश्चराइज करतो तसेच डोळ्यांना नैसर्गिक ओलावा मिळून डोळे कोरडे पडत नाहीत.
४. ग्रीन टी आयमास्क :-
वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज फेकून न देता आपण त्यांचा डोळ्यांसाठी आयमास्क म्हणून वापर करु शकतो. वापरलेल्या ग्रीन टी बॅग्ज फ्रिजमध्ये थंड करून डोळ्यांवर १५ मिनिटांसाठी ठेवा. यामुळे डोळ्यांची सूज व थकवा दूर होतो.
५. थंड दूध :-
थंडगार दुधाचा आयमास्क देखील डोळ्यांच्या अनेक समस्या दूर करतात. थंड दूधात कापूस बुडवून डोळ्यांवर १० मिनिटांसाठी ठेवा. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो व थकवा कमी होतो.
६. बटाटा :-
काकडीप्रमाणेच बटाट्याचा आयमास्क देखील डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतो. यासाठी बटाट्याचे पातळ काप करावेत किंवा किस करून घ्यावा. आता डोळ्यांवर थेट काप किंवा किस १५ ते २० मिनिटांसाठी ठेवून द्यावा. या उपायामुळे डार्क सर्कल्स कमी होतात व डोळ्यांना थंडावा मिळतो.