Join us   

केस खूपच पातळ झाले? केमिकल्स असणारे हेअर प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा करा ५ घरगुती उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 5:56 PM

1 / 9
१. केस एवढे गळतात की आता तर केस धुण्याचंही टेन्शन येतं. कारण केस धुतले की केस गळण्याचं प्रमाण खूपच वाढतं, अशी अनेक जणींची तक्रार असते.
2 / 9
२. केस गळायला लागले किंवा केसांची कोणतीही तक्रार सुरू झाली की आपण ती समस्या कमी करण्यासाठी केसांवर केमिकल्स असणारे वेगवेगळे हेअर प्रोडक्ट्स ट्राय करून बघतो. पण त्यामुळे खरंतर केसांंचं गळणं आणखीनच वाढतं.
3 / 9
३. म्हणूनच नाजूक झालेल्या केसांवर कोणतेही रासायनिक उपचार करण्यापेक्षा काही घरगुती इलाज करून बघा. कारण या उपयांचा कोणताही वाईट परिणाम केसांवर होत नाही. तसेच केसांची मुळं पक्की होऊन केस मजबूत होण्यास मदत होते.
4 / 9
४. पहिला उपाय म्हणजे आवळे, रिठे आणि शिकेकाई पावडर सम प्रमाणात घ्या. एका पातेल्यात २ ग्लास पाणी घेऊन त्यात हे तिन्ही पदार्थ उकळवा. पाणी कोमट झाल्यानंतर या पाण्याने केस धुवा. हे तिन्ही घटक केसांचं गळणं कमी करण्यासाठी मदत करतात.
5 / 9
५. कोरफडीचा गर आणि कढीपत्त्याची पानं एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. हा लेप केसांच्या मुळाशी लावा. अर्धातास तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाका.
6 / 9
६. विड्याची पानं आणि दही हा उपाय देखील केसांसाठी अतिशय गुणकारी आहे. हा उपाय करण्यासाठी चार ते पाच विड्याची पानं आणि २ टेबलस्पून दही हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या. हा लेप केसांच्या मुळाशी लावून ठेवा. साधारणपणे १५ ते २० मिनिटांनी केस धुवून टाका. विड्याची पानं आणि दह्यामध्ये असणारं कॅल्शियम केसांना मजबूती देतं.
7 / 9
७. कांदा किसून त्याचा रस काढा. हा रस केसांच्या मुळाशी लावा. साधारण अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका. हा उपाय केल्याने केस गळणं कमी होतं, तसेच केसांची वाढही अधिक जोमात होते.
8 / 9
८. एक टेबलस्पून मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला. सकाळी मेथीचे दाणे, ३- ४ जास्वंदाची फुले आणि ५- ६ जास्वंदाची पाने मिक्सरमधून वाटून घ्या. हा लेप केसांच्या मुळांशी लावा. अर्ध्या तासानंतर केस धुवून टाका.
9 / 9
९. यापैकी जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल तो करावा. पण चांगला परिणाम दिसून येण्यासाठी काही महिने त्यात सातत्य ठेवावे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय