पातळ, पांढरे केस नको तर आतापासूनच ५ पदार्थ खाणं सुरू करा, केसांच्या तक्रारी कायमच्या विसरा
Updated:March 31, 2026 13:53 IST2026-03-31T13:46:57+5:302026-03-31T13:53:20+5:30

कमी वयातच केसांच्या वेगवेगळ्या तक्रारी खूप वाढल्या आहेत. काही लोकांचे केस कमी वयातच पांढरे होऊ लागले आहेत तर काही लोकांचे केस खूप गळत आहेत.(5 foods for naturally black hair)
केसांची अजिबातच वाढ होत नाही, असंही कित्येकांचं म्हणणं असतं. तुमच्याही केसांच्या बाबतीत अशा सगळ्या तक्रारी असतील तर काही पदार्थ नियमितपणे खायला लगेच सुरुवात करा.
त्यापैकी पहिला पदार्थ म्हणजे आवळा. आवळ्यामध्ये असणारं व्हिटॅमिन सी, लोह, ॲण्टीऑक्सिडंट्स केसांच्या वाढीसाठी अतिशय पोषक ठरतं. तसेच आवळ्यामुळे केस कमी वयात पांढरे होत नाहीत.(how to get rid of gray hair?)
बीटरुट नियमितपणे खाल्ल्यास डोक्याच्या त्वचेखालचं रक्ताभिसरण उत्तम होतं आणि त्यामुळे केसांची मुळं पक्की होण्यास मदत होते.
पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असतं. शरीरातलं लोह वाढलं की केसांच्या मुळांनाही चांगल्याप्रकारे ऑक्सिजन मिळतं. त्यामुळे केस गळणं कमी होतं आणि केस काळे राहण्यासही मदत होते.
रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन जास्त प्रमाणात असते. ते केसांसाठी अतिशय पोषक आहे. केस गळणं कमी करण्यासोबतच केसांवर छान चमक आणण्यासाठीही रताळे उपयुक्त ठरतात.
ताक देखील नियमितपणे प्या. कारण ते प्रोबायोटीक आहे. त्यामुळे ते गट हेल्थ आणि स्काल्प हेल्थ दोन्हीही उत्तम ठेवण्यास मदत करते. अशी माहिती डॉक्टरांनी dr.poorneshwar_sawant_official या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.