Join us   

केसांच्या आरोग्यासाठी ३ पदार्थ खा! केस गळणं कमी होईल- म्हातारपणातही केस काळेच राहतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2024 11:59 AM

1 / 7
केस गळण्याची समस्या हल्ली खूपच वाढली आहे. कुणाचे केस अकालीच पांढरे होत आहेत तर कुणाच्या केसांमध्ये सतत कोंडा झालेला असतो. (How to reduce hair loss)
2 / 7
केसांच्या या समस्यांची वेगवेगळी कारणं आहे. पण त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे केसांना मिळणारं अपुरं पोषण. (home remedies for gray hair)
3 / 7
आपल्या आहारातून केसांना योग्य पोषण मिळालं तर नक्कीच त्यांची चांगली वाढ होईल. तसेच केस गळणं कमी होऊन अकाली केस पांढरे होण्याचं प्रमाणही बऱ्याच प्रमाणात कमी होईल, अशी माहिती thejuhikapoor या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
4 / 7
त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ कोणते आहेत ते पाहा आणि या पदार्थांचं नियमितपणे सेवन करा. केस नक्कीच छान होतील.
5 / 7
यातला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे रताळी. रताळे आपण फक्त उपवासाच्या दिवशीच खातो. पण एरवीही रताळी खायला पाहिजेत. रताळ्यांमध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे डोळ्यांसाठी तर फायदा होतोच पण केस आणि त्वचेसाठीही ते अधिक पोषक ठरतं.
6 / 7
दुसरा पदार्थ आहे आवळा. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असतं. व्हिटॅमिन सी योग्य प्रमाणात मिळालं तर शरीरामध्ये लोह चांगल्या प्रकारे शोषून घेतलं जातं. योग्य प्रमाणात लोह मिळाल्यास रक्ताभिसरण क्रिया उत्तम होते आणि त्यामुळे केसांची मुळं पक्की होण्यास फायदा होतो.
7 / 7
तिसरा पदार्थ आहे खजूर. खजूरामध्येही लोह भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रक्ताभिसरण वाढून केसांची मुळं पक्की होतात आणि केस गळणं कमी होतं.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीअन्न