Join us   

मासिक पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवावेत का? डॉक्टर सांगतात, आरोग्यसाठी योग्य काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2023 4:40 PM

Can You Have Sex on Your Period? sex in Period good or bad for health? मासिक पाळीच्या काळात सेक्स करणं योग्य की अयोग्य?

मासिक पाळीच्या चार दिवसात शारीरिक संबंध ठेवावेत की नाही? या प्रश्नाविषयी अनेक समज -  गैरसमज आहेत. अनेकींना त्या काळात अतिशय वेदना होतात. मूड स्विंग्ज होतात. त्याकाळात संबंध नकोच वाटतात. कधीकधी जोडीदाराला संबंध हवे असतात, त्यामुळे नात्यातही ताण निर्माण होतात. पण यासंदर्भात खरे काय? संबंध ठेवणं योग्य की अयोग्य?

यासंदर्भात फॅमिली फिजिशयन डॉक्टर गीता वडनप सांगतात, ''मासिक पाळी सुरु असताना शारीरिक संबंध ठेवण्यात योग्य अयोग्य असे काही नाही. हे प्रत्येक महिलेच्या इच्छेवर अवलंबून आहे. कारण या काळात रक्तस्त्राव होते, त्यामळे खबरदारी घेणं गरजेचं आहे. मासिक पाळीत योनीची स्थिती अधिक नाजूक असते. त्यामुळे गर्भनिरोधकाचा वापर करून संबंध ठेवणे उत्तम. मासिक पाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवल्याने गर्भधारणेचा धोका कमी होतो.''

मायउपचार या वेबसाईटला दिलेल्या माहितीत डॉ. अर्चना निरुला सांगतात, ''मासिक पाळीचा अर्थ असा नाही की सेक्स करणे सोडून द्यावे. मात्र मासिक पाळी दरम्यान, महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. या काळात शारीरिक संबंध ठेवताना ल्यूब्रिकेशनची गरज भासत नाही. कारण रक्तस्त्राव सूरु असतो. परंतू मासिक पाळी दरम्यान, महिलांना क्रॅम्प्स, मायग्रेन, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. या काळात शारीरिक संबंध ठेवल्यास या समस्या कमी होऊ शकतात. मात्र मासिक पाळीच्या दरम्यान, सुरक्षित संबंध ठेवणे गरजेचं.

शाहरुखची लेक सुहाना करते मिनिमल मेकअप, फॅशनेबल नाही तर कंफर्टेबल कपड्यांचा तिचा खास चॉईस

कारण या काळात संसर्गाचा धोका खूप जास्त वाढतो. यात जोडीदरापैकी एकाने गर्भनिरोधक वापरणे आवश्यक. सामान्यतः योनीची पीएच पातळी ३.८ ते ४.५ पर्यंत राहते परंतु मासिक पाळीच्या काळात योनीची पीएच पातळी वाढते, त्यामुळे या काळात संसर्गाचा धोका जास्त असतो.

जोडीदाराच्या संमतीनेच संबंध ठेवा

मासिक पाळीच्या काळात फार कमी लोकांना संबंध ठेवणे आवडते. महिलांना या काळात संबंध ठेवताना अस्वस्थ वाटते. त्यामुळे महिलेच्या मनाची तयारी नसेल तर असे संबंध टाळावेत. संमती असल्यास योग्य काळजी घेऊनच संबंध ठेवायला हवेत.

टॅग्स : लैंगिक जीवनमासिक पाळी आणि आरोग्यमहिला