Join us   

मासिक पाळी लवकर येते? हा आजार आहे की कुठल्याची आजाराची लक्षणं? उपाय काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2024 8:30 AM

मासिक पाळी उशीरा येणं ही जशी समस्या आहे तशी सतत लवकर येणंही काही योग्य नव्हे, डाॅक्टरांना भेटा..

ठळक मुद्दे मासिक पाळी अनियमित असेल तरी समस्या असू शकते.

मासिक पाळी लवकर येते अशी अनेक मुलींची तक्रार असते. उशीरा आली पाळी किंवा आलीच नाही तर डॉक्टरांकडे अनेकजणी जातात पण लवकर येत असेल तर? हा आजार म्हणायचं की कोणत्या आजाराची लक्षणं की ते नॉर्मलच असतं? मासिक पाळी सतत लवकर आली तर काय होतं?

मुलगी वयात येतांना जेव्हा मासिक पाळी सुरू होते तेव्हा लवकर येणं किंवा उशीरा येण हे तसं नैसर्गिक असतं. कारण तोर्पयत ते चक्र स्थिर झालेलं नसतं. पहिलं वर्ष किंवा दोन वर्ष हे चक्र स्थिर होईर्पयत ही अनियमितता असते. नंतर मात्र २१ दिवसांचं चक्र असतं. पण २१ दिवसांपूर्वीच मासिक पाळी येत असेल तर त्या अनियमिततेची काणं तपासायला हवी. मासिक पाळी येऊन गेल्यानंतर १३/१४ व्या दिवशी किंवा त्याआधीच येत असेल तर वैद्यकीय मदत घ्यावी. आपल्या आहार-विहराकडेही लक्ष द्यावं.

(Image :google)

असे कशाने होते?

१. प्रचंड मानसिक तणाव असेल तरी मासिक पाळी लवकर येऊ शकते. अतिरिक्त वजन वाढ झाली असेल तरी त्याचा मासिक पाळीवर परिणाम होतो. हा लाईफस्टाईल प्रॉब्लेम आहेच. पण काहीजणींना थायरॉईडचीही समस्या असू शकते. २. अनेकजणी वरकरणी नाकारतात पण शारीरिक संबंधापर्यंत प्रेमप्रकरणाच्या गोष्टी गेलेल्या असतात. त्यातूनही इन्फेक्शन्स झालेली असतात. तसे काही आपल्या संदर्भात झालेले आहे का, त्याचा मनावर प्रचंड ताण आहे का हे तपासून पाळी लवकर येण्याची कारणं मुलींनी शोधावी, पण दुर्लक्ष करू नये.

३. चेहऱ्यावर याच काळात एकाएकी खूप जाड गाठींसारखे फोड येतात., त्यांच्यामध्ये पू होतो. ते फुटले किंवा त्यांना हात लागला तरी वेदना होतात, असे होत असेल तर मात्र डॉक्टरांची मदत घ्यायला हवी. हार्मोनल इम्बॅलन्स झाल्याची शक्यता असते.  अनेक मुलींच्या ओठांवर, पोटावर, छातीवर मऊ केस असतात. तसे असतील तर फार काळजी करू नये. पण छातीवर किंवा हनुवटीखाली एक किंवा दोनच जाड-राठ केस आले असतील तर हार्मोन्सशी संबंधित समस्या असू शकते. ४. मासिक पाळी अनियमित असेल तरी अशी समस्या असू शकते. काही घरांमध्ये महिलांना ही समस्या अनुवंशिकही असते, मात्र कारणं समजून घेऊन त्यावर आवश्यक उपाय करून घ्यावे. प्रश्न संपूर्ण आरोग्याचा आहे.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यमहिला