Join us   

इनरवेअर्सचा आतला भाग पांढरा -कडक कशाने होतो? कारणं आणि ४ सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2023 6:44 PM

Why is the vaginal discharge discoloring your underwear? : एखादी नवीन इनरवेअर (Innerwear) वापरायला सुरुवात केल्यावर काही दिवसातच मधला भाग पांढरा आणि कडक होतो. ते कशाने?

आपण चांगले दिसावे यासाठी आपण चांगले आपल्याला सूट होतील असे कपडे घालणे पसंत करतो. स्त्रियांच्या बाबतीत बाह्य कपडे जितके महत्वाचे असतात तितकेच अंडरगार्मेंट्स देखील महत्वाचे असतात. आपल्या बाह्य कपड्यांच्या आत आपण जे कपडे घालतो त्यावरही आपला लूक बऱ्याच अंशी अवलंबून असतो. स्त्रियांच्या अंडरगार्मेंट्समध्ये, ब्रेसियर व इनरवेअर ही दोन्ही अतिशय महत्वाची अंतर्वस्त्र असतात. बर्‍याचदा स्त्रिया त्यांच्या ब्रेसियर कडे खूप लक्ष देतात आणि त्यावर खूप पैसे खर्च करतात. पण, इनरवेअरकडे तितके लक्ष देत नाहीत. 

स्त्रियांची इनरवेअर (Innerwear) ही काही ठराविक काळानंतर बदलायची असते, तसेच या इनरवेअरच्या स्वच्छतेच्या बाबतीतही काळजी घेतली पाहिजे. काहीवेळा काही महिला इनरवेअर वापरून जुनी झाली किंवा त्यावर अनेक डाग पडले तरीही तशीच वापरतात. याचबरोबर पाळीच्या रक्तस्त्रावाचे डाग किंवा अंगावरून पांढरे पाणी जाणे याचे डाग असे अनेक डाग आपल्या इनरवेअरच्या बरोबर मध्यभागी पडतात. असे डाग नंतर कितीही धुतले तरीही जाता जात नाहीत. मग असे डाग वारंवार पडून इनरवेअरच्या बरोबर मध्यभागी ब्लिच केल्यासारखा पांढरा किंवा केशरी रंगाचा डाग पडलेला दिसतो. इतकेच नव्हे तर इनरवेअरच्या मध्यभागातील कापड कडक झालेले दिसते. हे नेमके कशामुळे होते व असे होऊ नये म्हणून नेमके काय करावे यासाठी काही उपाय पाहूयात(Does your underwear turn white in the middle? It’s more normal than you think).

इनरवेअरच्या मध्यभागावर पांढरे व केशरी डाग पडण्यामागे नेमके काय कारण आहे ? 

१. इनरवेअरचा मधला भाग पांढरा पडण्यामागे काही कारण आहेत त्या मागील कारण आधी समजून घेऊयात. आपल्या व्हजायनामध्ये Lactobacilli नावाचे चांगले बॅक्टेरिया असतात. जे आपल्या व्हजायनामध्ये खराब जिवाणूंचा संसर्ग होण्यापासून व्हजायनाचा बचाव करतात तसेच कोणत्याही प्रकारचे इंफेक्शन्स होण्यापासून रोखतात. बऱ्याचदा पाळी येण्याच्या आधी किंवा प्रेग्नंन्सी नंतर अंगावरून पांढरे पाणी जाण्याचे प्रमाण वाढते. हे पांढरे पाणी आपल्या व्हजायनामधून बाहेर येऊन आपल्या इनरवेअरवर पडते. जेव्हा हे पांढरे पाणी बाहेर येऊन हवेच्या संपर्कात येते तेव्हा त्यांच्यात ऑक्सीडायझेशनची प्रक्रिया होते.

या ऑक्सीडायझेशन प्रक्रियेमुळे आपल्या इनरवेअरवर पांढरे केशरी ब्लिच केल्यासारखे डाग पडतात. यानंतर हे डाग घालवण्यासाठी इनरवेअर कितीही वेळा धुतली तरीही हे डाग जात नाही. यामुळे हळूहळू इनरवेअरचा मधला भाग पांढरा पडत जाऊन कडक होऊ लागतो. ही सगळी प्रक्रिया नैसर्गिक आहे त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला आपण थांबवू शकत नाही. परंतु इनरवेअर लगेच खराब होऊ नये यासाठी आपण काही सोप्या टिप्सचा वापर करू शकतो.  

मासिक पाळीत झोपच येत नाही? पोटदुखी-हेवी ब्लिडिंग? ८ सोप्या गोष्टी, झोपा शांत...

 

पिरिएड ट्रॅकर अ‍ॅप्स काय असतात? खरंच त्यांचा उपयोग करुन पाळीच्या दिवसात योग्य काळजी घेता येते का?

इनरवेअरचा मध्यभाग पांढरा होऊ नये म्हणून सोपे उपाय :- 

१. लाईट कलरची इनरवेअर घाला :- ज्या दिवशी व्हजायनामधून जास्त प्रमाणात पांढरे पाणी जात असेल त्या वेळी लाईट रंगाचे अंतर्वस्त्र घालण्याला प्राधान्य द्यावे. जेणेकरून डाग पडल्यावर त्याचे ब्लिचिंग कमी दिसेल. 

२. पॅंटी लायनरचा वापर करावा :- जेव्हा आपल्याला असे वाटेल की अंगावरून जास्त प्रमाणात पांढरे पाणी जात आहे. त्याचे डाग आपल्या पॅंटीवर दिसू नये यासाठी पॅंटी लायनरचा वापर करावा. जेणेकरून हे पांढरे पाणी थेट इनरवेअरवर न पडता पॅंटी लायनरवर पडेल यामुळे डाग निर्माण होण्याचा प्रश्नच येणार नाही. 

३. सुती कापड्याच्या इनरवेअर घाला :- शक्यतो कायम सुती कापडाच्या इनरवेअर घालण्याचा प्रयत्न करावा. कारण सुती कापड ओलावा आणि संक्रमण दोन्ही टाळतात, यामुळे सुती कापड्याच्या इनरवेअर घाला. 

४. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा :- जर आपल्या अंगावरून जाणाऱ्या पांढऱ्या पाण्याचा रंग दिवसेंदिवस बदलत असेल. तो बदलून पिवळा, हिरवा, चॉकलेटी अशा रंगात दिसत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

टॅग्स : मासिक पाळी आणि आरोग्यमासिक पाळीचा दिवस