Join us   

मेनोपॉजमध्ये हॉट फ्लॅशेसचा त्रास का होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 3:11 PM

रात्री हॉट फ्लॅशेसमध्ये येणारा घाम, एक् ते पाच मिनिटं येऊ शकतो. आणि हॉट फ्लॅशेसचा त्रास दिवसातून चार ते पाच वेळा होऊ शकतो.

ठळक मुद्दे मेनोपॉजच्या दरम्यान शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोनचं प्रमाण कमी झालेलं असतं.रात्री येणा-या घामावर सहज नियंत्रण ठेवता येऊ शकतं फक्त स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याबद्दल जागरूक असलं पाहिजे.अनेक स्त्रियांना त्यांच्या हॉट फ्लॅशेसवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे औषोधोपचारांमुळे हॉट फ्लॅशेसवर नियंत्रण मिळवता येतं.

हॉट फ्लॅशेस अर्थात गरम प्रवाह हे मेनोपॉजचं महत्वाचं लक्षण आहे. यात डोकं आणि छाती गरम होते. इस्ट्रोजेनचं बदलतं प्रमाण हे हॉट  फ्लॅशेस येण्याच्ं मुख्य कारण.  अनेक स्त्रियांना त्यांच्या हॉट फ्लॅशेसवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे औषोधोपचारांमुळे हॉट फ्लॅशेसवर नियंत्रण मिळवता येतं.

हॉट फ्लॅशेस ही सर्वसामान्य बाब आहे का? पेरीमेनोपॉज म्हणजे मेनोपॉज यायच्या आधीच्या काळात अनेकींना हॉट फ्लॅशेसचा त्रास जाणवतो. मेनोपॉज सर्वसाधारणपणे ४४ ते ५५ या वयोगटात येतो. काही स्त्रियांना हॉट फ्लॅशेसचा त्रास विशेष घाम न येताही होऊ शकतो. तर काहीवेळा इतका प्रचंड घाम येतो की कपडे घामानं ओलसर होऊन बदलावे लागू शकतात. रात्री हॉट फ्लॅशेसमध्ये येणारा घाम, एक् ते पाच मिनिटं येऊ शकतो. आणि हॉट फ्लॅशेसचा त्रास दिवसातून चार ते पाच वेळा होऊ शकतो.

मेनोपॉज का येतो?

मेनोपॉजच्या दरम्यान शरीरातील इस्ट्रोजेन या हार्मोनचं प्रमाण कमी झालेलं असतं. काहीवेळा हे प्रमाण कमी होतं कारण मेंदू शरीराचं तापमान सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो. बाह्य शरीरात झालेल्या छोट्या बदलांमुळेही रात्रीचा घाम येऊ शकतो.

काय आहेत हे छोटे बदल? १) संवेदनशील त्वचा २) मेंदूमधील रसायनांचा असमतोल ३) रक्त वाहिन्यांमधून होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव

कशामुळे ट्रिगर होतं? १) धूम्रपान, खूप घट्ट कापडे घालणं २) खूप जाड पांघरूण, ब्लँकेट्स घेऊन झोपण्याची सवय. ३) मद्य आणि कॅफेन ४) खूप तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणं ५) खोलीत हवा खेळती नसणं ६) अति ताण

रात्री येणार घाम कमी कसा करावा? १) रात्री येणा-या घामावर सहज नियंत्रण ठेवता येऊ शकतं फक्त स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याबद्दल जागरूक असलं पाहिजे. २) नियमित व्यायाम गरजेचा आहे. ३) आहारात सोयाबीनचा समावेश करावा.आहारातील सोयाबीनमुळे हॉट फ्लॅशेस कमी होतात. ४) जवस खाणं किंवा जवसाच्या सप्लिमेण्ट कॅप्सूल घेणं किंवा जवसाचं तेल यांचा आहारात समावेश केल्यानेही हॉट फ्लॅशेसचा त्रास कमी होऊ शकतो.  ५) खोलीतील तापमानावर नियंत्रण हवं. रिलॅक्स राहणं आवश्यक आहे. ६) लिंबू सरबत किंवा तत्सम पेय ज्यांनी ताजतवानं वाटेल ती अधूनमधून घेतली पाहिजेत.   औषोधोपचार काय? अनेक स्त्रियांना त्यांच्या हॉट फ्लॅशेसवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे औषोधोपचारांमुळे हॉट फ्लॅशेसवर नियंत्रण मिळवता येतं.    हार्मोन्स थेरपी  हा सगळ्यात चांगला पर्याय आहे. अर्थात डॉक्टरांशी चर्चा करून हॉट फ्लॅशेस कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घ्यावं. रात्री येणारा घाम आणि हॉट फ्लॅशेस या समस्येवर सहज उपचार होऊ शकतात. फक्त मेनोपॉजच्या काळात घाबरून न जाता डॉक्टरांकडून योग्य ते उपचार समजून घेतले पाहिजेत. विशेष आभार: डॉ. उमा सिंग (MBBS, MS)