Join us   

अनओव्यूलेशन वंध्यत्त्वाचं  कारण असतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2021 5:35 PM

अंडाशयातून अंड बाहेर पडण्याची प्रक्रिया महिनोंमहिने होत नाही. काहीवेळा वर्षानुवर्षे होत नाही. वंध्यत्व येण्यामागे अनओव्यूलेशन हे महत्वाचं कारण असतं.

ठळक मुद्दे अनओव्यूलेशनमध्ये अंडाशयातून अंड बाहेर पडण्याची प्रक्रियाच होत नाही.काहीवेळा अंडाशयातून अंड बाहेर पडण्याची प्रक्रिया महिनोंमहिने होत नाही. काहीवेळा वर्षानुवर्षे होत नाही. वंध्यत्व येण्यामागे अनओव्यूलेशन हे महत्वाचं कारण असतं.

मासिक पाळीच्या दरम्यान अंडाशयातून अंड फलित होण्यासाठी बाहेर पडतं. पण काही वेळा हे कार्य अंडाशय करत नाही. या परिस्थितीला अनओव्यूलेशन म्हटलं जातं. अनओव्यूलेशनमध्ये अंडाशयातून अंड बाहेर पडण्याची प्रक्रियाच होत नाही. काहीवेळा महिलांना अचानक मासिक पाळी येते. म्हणजे त्यावेळी मासिक पाळीची तारीख नसते. आणि मग परत पुढच्या महिन्यात ठरलेल्या चक्रानुसार पाळी येते. काहीवेळा अंडाशयातून अंड बाहेर पडण्याची प्रक्रिया महिनोनमहिने होत नाही. काहीवेळा वर्षानुवर्षे होत नाही. वंध्यत्व येण्यामागे अनओव्यूलेशन हे महत्वाचं कारण असतं. अनैच्छिक वंध्यत्वमध्येही हेच मूलभूत कारण मानलं जातं.

अनओव्यूलेशनची कारणे कोणती? १) लठ्ठपणा २) थायरॉईड ३) पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम ४) अति ताण ५) हायपरप्रोलॅक्टिनेमिया म्हणजेच शरीरातील हार्मोनल प्रोलॅक्टिनचे प्रमाण वाढणे ६) पेरीमेनोपॉज म्हणजेच अपेक्षित वयाआधीच पाळी थांबणे ७) ड्रग्स, स्टिरॉइड्सचे परिणाम

अनओव्यूलेटोरी (बीजकोष फुटून अंड बाहेर येत नाही) चक्र काय आहे?

* ओव्यूलेशन नाही. * ल्युटिअल टप्पा नाही. * प्रेजेस्टेरॉन नाही. * तरीही मासिक पाळी येते. * एस्ट्रोडीओल * प्रोजेस्टेरॉन * मासिक पाळीचे दिवस * पाळीचा पहिला दिवस ओव्युलेटोरी (बीजकोष फुटून अंड बाहेर येण्याची प्रक्रिया ) चक्र काय आहे? * एस्ट्रोडीओल * प्रोजेस्टेरॉन * मासिक पाळीचे दिवस * पाळीचा पहिला दिवस * ल्युटिअल टप्पा * अनओव्यूलेटोरी चक्रामध्ये इस्ट्रोजेन मोठ्या प्रमाणावर असते पण प्रोजेस्टरॉन नसते. प्रोजेस्टरोन नसल्याने रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होतो आणि दीर्घकाळ होत राहतो.

 

अनओव्यूलेशनची लक्षणे

१) अनियमित मासिक पाळी : मासिक पाळी ३५ दिवसांपर्यंत आली नाही तर त्याला अनियमित मासिक पाळावी म्हटलं जातं. २) मासिक पाळीच चालू न होणे. ३) गर्भधारणा न होणे : वर्षभर प्रयत्न केल्यानंतरही गर्भधारणा न होणे  

उपचार काय?

१) कारण आणि लक्षणांनुसार उपहार ठरवले जातात. २) रुग्ण लठ्ठ असेल तर सगळ्यात आधी शरीराच्या एकूण वजनाच्या १० टक्के वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. ३) ज्यामुळे अंडाशयाचे काम परत चालू होऊ शकते. ४) जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीनमध्ये बदल केले जातात. ५) त्याचप्रमाणे वंध्यत्वासाठीचे उपचारही सुरु केले जातात. ६) उपचार नेहमी अधिकृत डॉक्टरांकडूनच घेतले पाहिजेत. ७) काहीवेळा आयव्हीएफ उपचारही सुचवले जातात. अनेक घटकांमुळे हार्मोनल असंतुलन होते आणि मासिक पाळी अनियमित होते. अनेक स्त्रियांसाठी वंध्यत्व अतिशय तणावपूर्ण असू शकतं. आपल्याला मूल होऊ शकत नाही याचा विलक्षण ताण स्त्रियांवर येतो. त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीसाठी उपचार पद्धती वेगळी सु शकते. कुणाला कशाचा फायदा होईल सांगता येत नाही. वरीलपैकी कुठलीही लक्षण आढळल्यास ताबडतोप डॉक्टरांशी संपर्क करून सल्ला आणि मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जेणेकरून वेळीच योग्य उपचारांना सुरुवात होऊ शकेल.

विशेष आभार: डॉ. नेहारिका मल्होत्रा

(M.D, FICMCH, FMAS, Diploma in Reproductive Medicine and Ultrasound)