Join us   

कृत्रिम गर्भधारणेसाठी IVF प्रक्रिया चांगली की ICSI? कोणतं तंत्र वापरायचं हे कसं ठरवलं जातं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 2:56 PM

आयव्हीएफ आणि आयसीएसआय या प्रजननाच्या दोन आधुनिक पद्धती आहेत. गर्भाशयात फलित झालेल्या अंड्याचं रोपन करण्याआधी स्त्रीबीज फलित करण्याच्या या दोन पद्धती आहेत.

ठळक मुद्दे आयव्हीएफमध्ये फलित होण्यासाठी अनेक बीजांडं आणि शुक्राणु एका बशीत सोडली जातात.आयसीएसआयमध्ये शुक्राणूची निवड करून ते बीजांडात थेट सोडले जाते.खरंतर कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्रज्ञानात आयव्हीएफचा शोध आधी लावला गेला आणि त्यानंतर त्याचाच एक प्रकार म्हणून आयसीएसआय विकसित करण्यात आलं.

इन व्हर्टो फर्टिलायझेशन म्हणजे आयव्हीएफ (IVF) आणि इंट्रासायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन म्हणजेच आयसीएसआय (ICSI) प्रजननाच्या या दोन आधुनिक पद्धती आहेत. गर्भाशयात फलित झालेल्या अंड्याचं रोपन करण्याआधी स्त्रीबीज फलित करण्याच्या या दोन पद्धती आहेत. शुक्राणू आणि बीजांडाचं मीलन कशा प्रकारे केलं जातं यावर या दोन्हीतला महत्वाचा फरक अधोरेखित होतो. आयव्हीएफमध्ये फलित होण्यासाठी अनेक बीजांडं आणि शुक्राणु एका बशीत सोडली जातात. आणि आयसीएसआयमध्ये शुक्राणूची निवड करून ते बीजांडात थेट सोडले जाते. आयसीएसआय आयव्हीएफपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे कारण नैसर्गिक पद्धतीनं शुक्राणू बीजांडाला फलित करते  ही प्रक्रिया इथे होत नाही. यात प्रत्येक बीजांडाचा स्वतंत्रपणे शुक्राणूशी संयोग घडवून आणला जातो.

आयसीएसआय आणि आयव्हीएफमध्ये साम्य आहे? आयसीएसआय आणि आयव्हीएफ एका अर्थानं सारख्याच प्रक्रिया आहेत कारण इथे बीजांडं आणि शुक्राणू दोन्ही जोडीदारांकडून किंवा डोनरकडून घेतले जातात. एम्ब्रयोलॉजिस्ट ज्या दिवशी बीजांडं घेऊन बीजारोपण करतो त्याच्या दुसऱ्या दिवशी फलित झालेली बीजांडं निवडली जातात. त्यानंतर फलित झालेली बीजांडं पुढचे पाच दिवस इन्क्युबेटरमध्ये ठेऊन त्यावर लक्ष ठेवले जाते. आणि त्यातील सर्वोत्तम गर्भ मग गर्भाशयात रोपण केला जातो. खरंतर कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्रज्ञानात आयव्हीएफचा शोध आधी लावला गेला आणि त्यानंतर त्याचाच एक प्रकार म्हणून आयसीएसआय विकसित करण्यात आलं. रुग्णाच्या दृष्टिकोनातून विचार करता गर्भारोपण करण्याआधीची वैद्यकीय प्रक्रिया जसे की स्कॅन्स, सुपरओव्यूलेशन, निरनिरळ्या प्रकारची इंजेक्शन्स, रक्त चाचणी, बीजांड गोळा करून संग्रह करणे आणि प्रत्यक्ष गर्भरोपण या प्रक्रियांमध्ये विशेष फरक नसतो. जो काही फरक असतो तो लॅब म्हणजेच प्रयोगशाळेत होणाऱ्या प्रक्रियांमध्ये असतो.

 

आयव्हीएफ की आयसीएसआय, काय अधिक चांगलं? प्रजानानासाठीची सर्वसाधारण आणि यशस्वी पद्धत म्हणजे आयसीएसआय. विशेषतः जिथे पुरुषांमध्ये वंध्यत्वाची समस्या असते. जिथे शुक्राणू नैसर्गिकरीतीनं बीजांडाशी संयोग करू शकत नाही. तिथे शुक्राणूला बीजांडापर्यंत पोह्चवून फलित होण्यास या प्रक्रियेत मदत केली जाते.  डॉक्टर आयसीएसआय पर्याय देतात जर... - पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या शून्य किंवा अतिशय कमी असेल. -  शुक्राणूंचा आकार विचित्र असेल आणि त्यांना गती नसेल. - जर शुक्राणू शस्त्रक्रिया करून गोळा करावे लागणार असतील तर. - शुक्राणू काही कारणांनी  गोठलेले असतील तर.. अर्थात आयसीएसआय निवडायचे कि आयव्हीएफच्या पारंपरिक पद्धतीचा वापर कृत्रिम गर्भधारणेसाठी करायचा हे ज्या त्या व्यक्तीवर आणि जोडप्यावर अवलंबून असतं. जर बीजांडांची संख्या मर्यादित असेल तर बऱ्याचदा आयसीएसआय निवडलं जातं. कारण सगळ्या अडथळ्यांना पार करून सर्वोत्तम असेच शुक्राणू यात निवडले जातात.

यश किती? - बीजांड आणि शुक्राणूचं मिलन होऊन, बीजांड फलित झाल्यावर गर्भधारणा यशस्वी होण्याचं प्रमाण, आयसीएसआय वापरणाऱ्या आणि आयव्हीएफ वापरणाऱ्या जोडप्यांमध्ये सारखंच आहे. कारण कुठलीही पद्धत यशस्वी होणं हे बऱ्याचदा एम्ब्रयोलॉजिस्टच्या कौशल्यांवर अवलंबून असतं. त्याचरप्रमाणे बीजांड आणि शुक्राणूंच्या दर्जावर, सुदृढतेवर अवलंबून असतं. तसंच जोडप्याच सर्वसाधारण आरोग्य कसं आहे आणि वंध्यत्त्वाची कारणं काय आहेत यावरही अवलंबून असतं. - आयव्हीएफपेक्षा आयसीएसआय ही आधुनिक उपचार पद्धती आहे. ज्या पुरुषांमध्ये शुक्राणूंचा आकडा कमी असतो किंवा शुक्राणूंची गती कमी असते आणि पुरुषांमधली वंध्यत्वाची समस्या लक्षात घेऊन विकसित केलेली आहे. आजच्या घडीला आयसीएसआय मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. पण जेव्हा पुरुषातल्या वंधव्याचा प्रश्न नसतो तेव्हा ही उपचार पद्धती वापरायची की नाही हा त्या जोडप्याचा निर्णय असतो.  

विशेष आभार: डॉ. अर्चना श्रीवास्तव, आयव्हीएड तज्ज्ञ शब्दांकन : पारोमिता रॉय सरकार