Join us  

तणावापासून ठेवतील 'कोसों दूर', फक्त तुळशीसोबत 'ही' ४ प्रकारची झाडं लावायला विसरू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2024 4:44 PM

These 4 plants provide positive energy : मन राहील प्रसन्न - तणाव राहील कायम दूर; बाल्कनीमध्ये तुळशीसोबत ४ झाडं लावा; कारण..

घरातील झाडे मन प्रसन्न करतात. शिवाय वातावरणात सकारात्मक उर्जा निर्माण होते. बाल्कनी गार्डनिंग करणे हे अनेकांच्या छंदांपैकी एक आहे. भारतात बऱ्याच घरांमध्ये तुळस आढळते. तुळस आयुर्वेदानुसार फायदेशीर तर ठरतेच, शिवाय घरात सकारात्मक उर्जा निर्माण करते. तुळशीची पानं खाण्याचे देखील फायदे आहेत. पण तुळशीसोबत ही ४ प्रकारची झाडं लावल्याने घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते (Positivity Energy).

शिवाय तुळशीमधील औषधीय गुणधर्म इतर झाडांसोबत घरातील वातावरणाला पॉझिटिव्ह ठेवते (Gardening Tips). ज्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि आपले शरीर आणि मन कायम प्रसन्न राहते(These 4 plants provide positive energy).

चमेली

चमेली उत्कृष्ट सुगंधासाठी ओळखली जाते. त्याचे तेल आणि फुले दोन्ही अतिशय सुवासिक असतात. घरामध्ये चमेलीची फुले लावल्याने आपल्या मनाला आराम मिळतो. शिवाय मन आणि शरीर प्रसन्न राहते.

लिंबाच्या झाडाला लिंबूच नाही? मातीत मिसळा फुकट मिळणाऱ्या २ गोष्ट; पिवळ्या धमक लिंबूने बहरेल रोपटं

कोरफड

कोरफड फक्त आपली त्वचा, केस आणि आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर मन शांत ठेवण्यासही उपयुक्त ठरते. कोरफड हवा शुद्ध करते आणि तणाव कमी करण्यासही मदत करते.

लॅव्हेंडर

लॅव्हेंडर वनस्पती त्याच्या विशेष गुणधर्म आणि सुगंधासाठी ओळखली जाते. हे रोप घरात लावल्याने तणाव दूर राहते. शिवाय त्याच्या उत्तम सुगंधामुळे झोपही चांगली लागते.

तुळस वारंवार का सुकते? ४ कारणं, तुळशीची काळजी घेण्याचे पाहा सोपे उपाय

कॅमोमाइल

कॅमोमाइल फुले सकारात्मकता उर्जा निर्माण करतात. मेंदूला तणावापासून मुक्त करण्यासाठी यासह चांगली झोप लागण्यासाठी मदत करते. यामुळे स्ट्रेस दूर राहते.

ब्राह्मी

ब्राह्मी केसांच्या आरोग्यासाठी आणि स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. आपण याच्या पानांचा आणि तेलाचा वापर करू शकता. ब्राह्मीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल