Join us  

इनडोअर प्लांट्स दिसतात छान, पण असतात नाजूक! इनडोअर प्लांट्सनी कसं सजवाल घर, कशी घ्यायची काळजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2021 7:07 PM

इनडोअर प्लांट्स घरात आणले आणि अवघ्या काही दिवसात कोमेजून गेले असा तुमचाही अनुभव आहे का? मग इनडोअर प्लांट्सची काळजी घेण्याच्या या काही टिप्स.

ठळक मुद्देइनडोअर प्लांट्स सुकण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्याला त्या झाडांना पाणी किती द्यायचं, किती प्रकाशात त्यांना ठेवायचं, तापमान कसं हवं, हा अंदाज येत नाही.

घराबाहेर असलेल्या झाडांची कशी काळजी घ्यायची, पाणी कसं आणि किती द्यायचं, याचा अंदाज आपल्याला असतो. पण काही वेळेस हौस म्हणून किंवा मग घराची सजावट म्हणून इनडोअर प्लांट्स घरात आणले जातात. त्याची आपण व्यवस्थित काळजीही घेतो. पण तरीही ही झाडं महिनाभरातच सुकून जातात किंवा त्याची पानं सडू लागतात, असा अनुभव काही जणांना येतो. इनडोअर प्लांट्स सुकण्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे आपल्याला त्या झाडांना पाणी किती द्यायचं, किती प्रकाशात त्यांना ठेवायचं, तापमान कसं हवं, हा अंदाज येत नाही. म्हणूनच इनडोअर प्लांट्सची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने केल्या पाहिजेत. 

 

अशी घ्या इनडोअर प्लांट्सची काळजी१. घरातल्या सजावटीसाठी आणलेली झाडं कमी प्रकाशात ठेवावी. अनेकदा आपण ही झाडं घरात तर आणतो, पण मग आपल्याला प्रश्न पडतो की या झाडांना पुरेसा प्रकाश मिळत असेल का, म्हणून मग आपण ही झाडं घरातल्या अशा जागेत ठेवतो, तेथे भरपूर सुर्यप्रकाश येत असेल. पण आपल्याला वाटलेली ही काळजी झाडांसाठी घातक ठरते. या झाडांना कमी सुर्यप्रकाश हवा असतो. त्यामुळे त्यांना सुर्यप्रकाशात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. 

२. फिलॉडेंड्रॉन, ड्रॅकेना ही झाडं तुम्ही घरात लावू शकता. याशिवा पोथोस, डेव्हिस ही झाडं देखील घरात चांगली टिकतात. या झाडांना खूपच कमी सुर्यप्रकाश आणि पाणी लागतं. त्यामुळे ही झाडं घराचं सौंदर्य तर वाढवतातच पण जास्त काळ टिकतात आणि फ्रेश राहतात. 

 

३. पाणी जपून टाकाइनडोअर प्लांट्स सांभाळण्यासाठी ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. बाहेरच्या झाडांना जसे पाणी घालतो, तसे पाणी इनडोअर प्लांट्सला घालू नका. या झाडांच्या कुंड्यामधील माती केवळ ओलसर राहिली पाहिजे याची काळजी घ्या. या झाडांना रोज पाणी घालायचे नसते. आठवड्यातून दोन वेळेस केवळ दोन टेबलस्पून पाणी घाला. जर उन्हाळ्यात अति उष्णतेमुळे कुंडीतील माती सुकते आहे, असे वाटले, तर एखादा चमचा अधिक पाणी घाला. पावसाळ्यात हवामान दमट असते. अशावेळी घरातल्या झाडांच्या कुंडीतील माती लवकर कोरडी पडत नाही. त्यामुळे मातीचा ओलसरपणा पाहून आठवड्यातून एकदा पाणी घातले तरी चालते. 

 

४. जास्त खत नकोइनडोअर प्लांट्सला जास्त खताची आवश्यकता नसते. सुकलेले फुल किंवा उरलेल्या कोरड्या अन्नाचे कण जरी महिन्यातून एकदा कुंडीत टाकले तरी चालते. कार्बोनेटेड पाणी आणि चहा पावडर उकळून केलेले पाणी या दोन गोष्टी जर इनडोअर प्लांट्सला टाकल्या तर त्यांची वाढ पटकन होते आणि झाडं सशक्त होतात. 

 

टॅग्स :बागकाम टिप्स