Join us

मनी प्लांटची पानं पिवळी पडली, वेलीची वाढ खुंटली? मातीत मिसळा पांढरा पदार्थ, वेल वाढेल भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2025 17:18 IST

Home remedy for money plant care: yellow leaves on money plant: Soil mix for healthy money plant: आपल्या घरातील मनी प्लांटची वेल सुकली असेल किंवा कोमजली असेल तर मातीत पांढरा पदार्थ घालून रोपाला वाढवण्यास मदत करु शकता.

आपल्यापैकी अनेकांना बाल्कनीत, घराच्या अंगणात  किंवा गार्डनमध्ये विविध प्रकारची झाडे किंवा रोपटी पाहायला मिळतता.(Money Plant Care Tips) मनी प्लांट हा अनेकांच्या घरातील लोकप्रिय इनडोअर प्लांटपैकी एक आहे. मनी प्लांट हे केवळ घराला सुंदर बनवण्यासाठीच नाही तर त्याच्या गुणांमुळे देखील ओळखला जातो.(Home remedy for money plant care)हिरवीगार, सुंदर पानं असणाऱ्या मनी प्लांटची वेल घरात असणं घराची शोभा वाढवतं.(monsoon season best fertilizer for money plant) परंतु, ऋतू बदलला की जसा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो तसाच रोपांवर देखील होतो.(yellow leaves on money plant) पावसाळ्यात रोपांना बहर येण्याऐवजी ती अधिक कोमजतात, पानं पिवळी पडून गळतात. अशावेळी रोपाला पाणी किंवा पुरेसे खत घालून देखील त्याची वाढ होत नाही. जर आपल्या घरातील मनी प्लांटची वेल सुकली असेल किंवा कोमजली असेल तर मातीत पांढरा पदार्थ घालून रोपाला वाढवण्यास मदत करु शकता. (Organic tip to grow money plant fast)

झाड वाढलं पण लिंबाचा पत्ता नाही? १० रुपयांची गोष्ट मातीत घाला, येतील पिवळेधम्मक लिंबू

मनी प्लांटच्या वेलीला बहर आणण्यासाठी आपण त्यात कच्चे दूध घालायला हवे. ज्यामुळे रोप अधिक हिरवे, टवटवीत होईल. तसेच त्याची वाढ देखील वेगाने होऊ लागेल. दूध जसे शरीरासाठी महत्त्वाचे मानले जाते, तसेच रोपांसाठी देखील फायदेशीर आहे. दुधातील कॅल्शियम वनस्पतीसाठी फायदेशीर आहे. ते वनस्पतीच्या पेशींना अधिक मजबूत करते, तसेच त्याची रचना सुधारण्यास मदत करते. दुधामधून वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अमीनो आम्ल प्रथिने प्रदान करते. दुधात असणारे व्हिटॅमिन बी वनस्पतीला हवे असणारे आवश्यक खत पुरवतात. तर लॅक्टोज नावाचा दुधातील घटक मातीतील लहान जीवांसाठी अन्न म्हणून काम करते. 

मनी प्लांटमध्ये कच्चे दूध थेट घालू नका. यामध्ये फॅट असते ज्यामुळे मातीत कुजल्यानंतर याचा दुर्गंध येऊ लागतो. तसेच रोपाच्या भोवती माश्या, मुंग्या आणि इतर कीटक फिरु लागतात. ज्यामुळे घर आणि झाड दोघांनाही त्रास होऊ शकतो. इतकेच नाही तर बुरशी आणि बॅक्टेरियाचा धोका देखील वाढतो. ज्यामुळे मुळे कुजतात आणि झाड कोमजते. 

दूध मनी प्लांटच्या झाडात खत म्हणून टाकत असाल तर ग्लासभर पाण्याच १ चमचा कच्चे दूध घाला. पातळ केलेले दुधाचे द्रावण महिन्यातून एकदाच रोपात घालायला हवे. ज्यामुळे रोप कुजण्याचा किंवा दुर्गंधीचा धोका कमी होतो. पानांवर साचलेली धूळ आणि घाण साफ करण्यासाठी कच्चे दूध फायदेशीर आहे. याचे द्रावण स्प्रेच्या बाटलीत भरुन आपण पानांवर देखील मारु शकतो. 

टॅग्स :बागकाम टिप्स