Join us  

बागो में फिटनेस है! फिट व्हायचं तर बागकाम करा, बाल्कनीतली बाग वाढवते स्टॅमिना..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 6:55 PM

Health benefits of gardening: आपण विचारही करत नाही, एवढा फायदा आपल्याला बाग काम करून मिळत असतो... म्हणूनच तर एकदा रमून बघा तुमच्या बाल्कनीतल्या (balcony) त्या हिरवाईच्या दुनियेत !!

ठळक मुद्देतुम्ही तुमच्या छोट्याशा गार्डनमध्ये जरी काम केलं तरी त्यामुळे तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात. 

घराभोवतीच्या बागेमुळे किंवा बाल्कनी, टेरेसमधल्या (terrace) झाडा- फुलांमुळे केवळ आपलं घरच छान दिसतं असं नाही. तर घरातल्या या हिरव्या कोपऱ्यामुळे आपल्या आरोग्यालाही अनेक लाभ होत असतात. पण गंमत अशी आहे की आपल्याला ते समजून येत नाहीत. आपल्या ओळखीच्या अनेक व्यक्ती आपण बघतो, ज्या तासनतास बागेत (garden) रमतात.. झाडांशी हसतात, बोलतात आणि चक्क त्यांना गाणंही म्हणून दाखवतात. झाडांशी असं एकरूप होतं आलं ना, तर त्यासारखं दुसरं सुख नाही, असं त्या व्यक्तींचं म्हणणं असतं. ते अगदी खरंच आहे कारण गार्डन थेरपी (Garden therapy)ही अशीच एक संकल्पना आहे. यानुसार जर तुम्ही तुमच्या छोट्याशा गार्डनमध्ये जरी काम केलं तरी त्यामुळे तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे होत असतात. 

 

गार्डनिंग केल्यामुळे होणारे फायदेHealth benefits of gardening१. व्हिटॅमिन डी चा पुरवठाVitamin Dआपली बाग म्हणजे घराभोवतीचं मोठं अंगण असो किंवा मग बाल्कनीतलं छोटंसं गार्डन. बागेचा आकार केवढा जरी असला तरी बागकाम करायला आपल्याला काही वेळ सुर्यप्रकाशात उभं रहावंच लागतं. म्हणून सकाळची प्रसन्न आणि कोवळ्या उन्हाची वेळ आपण बागकाम करण्यासाठी निवडतो. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी चा आपोआपच पुरवठा होतो. कोणत्याही औषधींनी जे व्हिटॅमिन डी मिळत नाही, ते आपल्याला सुर्यप्रकाशातून मिळतं. हा गार्डनिंग करण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. व्हिटॅमिन डी मुळे हाडांना मजबूती मिळते. सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

 

२. रक्तदाबावर नियंत्रणBlood pressure Control बागकाम करताना आपोआपच आपल्या मनातला सगळा ताण, तणाव आपण क्षणभर विसरून जातो आणि हिरव्या झाडांमध्ये, फुलांमध्ये रमतो. त्यामुळे मन शांत होतं. मन शांत झाल्यामुळे आपोआपच आपला रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी थोडा वेळ का होईना बागकाम करावं. 

 

३. डोळ्यांचा होतो व्यायामBeneficial for eye exerciseहल्ली सगळ्यांचंच रूटीन असं झालं आहे की जास्तीजास्त वेळ बंदिस्त वातावरणात जातो. त्यातही नोकरी करणारे जे असतात, त्यांचा अधिकाधिक वेळ स्क्रिन पाहण्यात जातो. उरलेल्या वेळात मोबाईल, टीव्ही हे देखील पाहिलं जातं. त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. डोळ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी झाडांच्या हिरवळीत रमणे हा देखील एक चांगला उपाय आहे. बागकाम करताना हिरवा, प्रसन्न रंग वारंवार आपल्या डोळ्यांसमोर येतो. त्यामुळे डोळ्यांचा थकवा दूर होतो. म्हणूनच डोळ्यांचा व्यायाम होण्यासाठी लहान मुलांनाही बागकाम करण्याची सवय लावली पाहिजे. 

 

टॅग्स :बागकाम टिप्सइनडोअर प्लाण्ट्सगच्चीतली बाग