Join us  

फ्लॉवरपॉट मधील फुलं खूप दिवस टवटवीत रहावी असं वाटतं ना? करा ५ पदार्थांचा स्मार्ट उपयोग...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 5:53 PM

फ्लॉवरपॉटमधील फुलं काही तासांतच सुकून जातात का, मग हे काही उपाय करून बघा.. 

ठळक मुद्देसोडा टाकल्यामुळे जसे इडली, ढोकळा हे पदार्थ फुलून येतात तसेच फुलांचे सौंदर्यही अधिक खुलते.

आपल्या बागेत फुलणारी किंवा एखाद्या बुकेमधे आलेली काही फुलं आपल्याला खूप आवडतात आणि म्हणून ती चटकन आपल्या डोळ्यांना दिसतील, अशा पद्धतीने आपण त्यांना सजवून ठेवतो. पण हे सूख थोडा वेळंच टिकतं. कारण काही काळातच फ्लॉवरपॉटमधील फुले सुकून जातात आणि आपला हिरमोड होतो. म्हणूनच तर फ्लॉवरपॉटमधील फुलं अधिक काळपर्यंत टिकून रहावीत म्हणून काही सोपे उपाय करून बघा. या उपायांमुळे तुमच्या फ्लॉवरपॉटमधील फुलं अधिक काळपर्यंत टवटवीत राहतील आणि त्यामुळे तुमचे घरही प्रसन्न आणि फ्रेश वाटू लागेल. 

 

१. मीठ आणि साखरफ्लॉवरपॉटमध्ये फुलं सजवून ठेवायची असतील तर ती कधीच नुसत्या पाण्यात टाकून ठेवू नका. साधारण अर्धा ग्लास जर पाणी घातलं असेल तर त्यामध्ये एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर टाका. यामुळे फुलं अधिककाळ फ्रेश राहतात. 

 

२. खाण्याचा सोडाफुलांचा सोडा टिकविण्यासाठी खाण्याचा सोडा किंवा बेकिंग सोडा अतिशय उपयुक्त ठरतो. सोडा टाकल्यामुळे जसे इडली, ढोकळा हे पदार्थ फुलून येतात तसेच फुलांचे सौंदर्यही अधिक खुलते. फ्लॉवरपॉटमध्ये टाकण्यासाठी जर एक ग्लास पाणी घेत असाल तर त्या पाण्यात एक टेबलस्पून सोडा टाका. पाणी व्यवस्थित ढवळून घ्या आणि आता त्यामध्ये फुलांना सजवा. जर तुम्ही फुलं सजविण्यासाठी पारदर्शक बाऊल वापरणार असाल तर त्यासाठी क्लब सोडा वापरा. त्यामुळे आतले पाणी पांढरट न दिसता नितळ दिसेले.

 

३. हेअर स्प्रेहा उपाय वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हेअर स्प्रे जर फुलांवर शिंपडला तर नक्कीच फुले अधिक काळ टवटवीत राहण्यास मदत होते. 

४. व्हिनेगर फ्लॉवर पॉटमध्ये जर एक ग्लास पाणी घेतले असेल तर त्यात दोन चमचे साखर आणि दोन चमचे व्हिनेगर मिसळा. यामुळे फुलांचे सौंदर्य अधिक काळ टिकून राहण्यास मदत होते.  

 

टॅग्स :बागकाम टिप्स