Join us

नरवेलच्या भाकऱ्या; ऐकलंय हे नाव? कोकणातला पारंपरिक पदार्थ, पावसाळ्यात तर खायलाच हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 16:44 IST

कोकणात नरवेलचे झाड सर्वत्र असते, अतिशय औषधी. त्याच्या या भाकऱ्या, चवीला उत्तम. सुगंधी पदार्थ.

ठळक मुद्देआपले मराठी पदार्थ उत्तम चवीचे, पोषक असून पण मागे पडत आहेत हे फार विचार करण्यासारखे आहे.(छायाचित्र- प्रतिभा जामदार)

प्रतिभा भोजने जामदार

वर्षातून किमान दोनवेळा म्हणजे पावसात आणि थंडीत आवर्जून आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ. "नरवेल च्या भाकरी". खरेतर भाकरीचा काही संबंध नाही, याला मालपोआ म्हणता येईल. हा पदार्थ पीठ तयार करून नंतर तेलात तळून केले जातात नेहमी . ( मी मात्र नॉन स्टिक वर जरा जास्तीचे तेल टाकून फ्राय केलंय. ) शरीरात उष्णता वाढवणारा, ऊर्जा देणारा पारंपरिक पदार्थ. यात, तांदूळ, चणाडाळ, उडीद डाळ, ओला नारळ, ओवा, लसूण, मिरी, आले, गूळ, नरवेलची पाने या सगळ्यांचे वाटून केलेले मिश्रण आहे.कोकणात हे नरवेलचे झाड जवळपास सगळ्यांच्या घरी असते. बाळंतिणीला हे आवर्जून खायला घालतातच.

(छायाचित्र- प्रतिभा जामदार)

अलीकडे मात्र हे सगळेच पारंपरिक पदार्थ लुप्त होतांना दिसत आहेत. औषधी गुणधर्म असलेले हे झाड, गंध आणि चवीला सरस असून देखील तसे दुर्लक्षित आहे. त्याची लागवड होतांना दिसत नाही. कोणत्याही हॉटेलमध्ये ही डिश उपलब्ध असेल असे ऐकिवात देखील नाही. आपले मराठी पदार्थ उत्तम चवीचे, पोषक असून पण मागे पडत आहेत हे फार विचार करण्यासारखे आहे.त्यामुळे करुन पहा या नरवेलच्या भाकऱ्या..कृतीसाठी हा व्हीडीओ पहा..

अशाच सुंदर रेसीपी प्रतिभा जामदार यांच्या "संध्याई किचन" या यूट्यूब चॅनलवरही पाहता येतील.

https://www.youtube.com/channel/UCpq1pdCGy6xk7SkjAzQbxIQ

टॅग्स :अन्न