Join us  

आता हळदीतही होतेय सर्रास भेसळ, ही भेसळ कशी ओळखाल? भेसळ शोधायचं हे घ्या तंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2021 5:17 PM

अनेक गुणांनी उपयुक्त हळदीतही भेसळीचे प्रमाण वाढले असून त्याची घरच्या घरी चाचणी करायला हवी

ठळक मुद्देहळदीतली भेसळ ठरु शकते आरोग्याला धोकादयकघरच्या घरी करता येतात भेसळ ओळखण्याच्या चाचण्या

भारतीय पदार्थांमध्ये मसाल्याच्या पदार्थांतील सर्वाधिक वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. पदार्थाला चव येण्यासाठी, फ्लेवरसाठी तर कधी रंग म्हणून हळद आवर्जून वापरली जाते. हळदीमध्ये आरोग्यासाठी अनेक उपयुक्त घटक असल्याने कित्येक आयुर्वेदीक औषधांमध्येही तिचा वापर केलेला असतो. इतकेच काय हळदीचे गुण हे सौंदर्यासाठीही उपयुक्त असतात त्यामुळे सौंदर्यप्रसाधनांमध्येही हळद वापरली जाते. अशा या हळदीतही सध्या मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. आता आपण वापरत असलेल्या हळदीत भेसळ आहे की नाही हे कसे ओळखायचे? तर फूड सेफ्टी अँट स्टँडर्ड अथॉरीटी ऑफ इंडियाने (FSSAI) हळदीतील भेसळ कशी ओळखायची याविषयी एक व्हिडियो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. नेटीझन्सनी या व्हिडियोला बरीच पसंती दाखवली आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही टेस्ट करु शकता. 

१. एका ग्लासमध्ये पाणी घ्या 

२. त्यात हळद घाला

३. ही हळद पाण्याच्या खाली गेली आणि पाण्याला गडद पिवळा रंग आला  तर हळदीमध्ये भेसळ आहे हे ओळखावे

४. भेसळ नसलेले हळदीचे पाणी फिकट दिसते

टॅग्स :अन्नव्यभिचार