Join us  

फक्त या ५ गोष्टी करा, तुम्ही ठरवलं तरी तुमचा व्यायाम चुकणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:07 PM

व्यायामाचा कंटाळा आल्यास व्यायामात नियमितता राहात नाही. व्यायाम आनंदी करण्याच्या काही युक्त्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापिठांनी केलेल्या अभ्यास आणि संशोधनातून या युक्त्या समोर आल्या आहेत.

ठळक मुद्देव्यायामाची छोट्या छोट्या भागात विभागणी करावी. तूकड्या तूकड्यात केलेल्या व्यायामाचे श्रम वाटत नाही.संगीतामुळे व्यायामावर लक्ष केंद्रित होतं. थकव्याकडे दूर्लक्ष होतं. व्यायाम हा अवघड वाटत नाही.आपण छान हसत असल्यास आपल्या मेंदूलाही त्यामूळे सकारात्मक संदेश मिळतो. त्याचा परिणाम हणजे व्यायामाचा आनंद वाटायला लागतो.व्यायाम करताना जर पूर्ण लक्ष व्यायामावरच दिलं तर आपलं मन चालू क्षणात राहातं. आपल्याला मेंदू काय आदेश देतंय हे लक्षात येतं.

रोज उठून व्यायाम करायचा ही गोष्ट अनेकांना कंटाळवाणी वाटते. व्यायामाच्या वेळेस थकणाऱ्या शरीरामूळे रोज व्यायाम नकोसा वाटायला लागतो. त्यामूळे अनेकदा व्यायामाला बुट्टी दिली जाते. व्यायाम करण्यात सलगता नसेल तर व्यायामातून अपेक्षित परिणाम शरीर आणि मनास भेटत नाही. रोज व्यायाम करण्यासाठीची सकारात्मक शक्ती शरीरास आणि मनास मिळाली तर रोजचा व्यायाम ही आनंदाची बाब घडेल. व्यायाम आनंददायी करण्याच्या काही युक्त्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यापिठांनी केलेल्या अभ्यास आणि संशोधनातून या युक्त्या समोर आल्या आहेत.

) व्यायामाची छोट्या छोट्या भागात विभागणी करासलग ४५ मीनिटं किंवा एक तास व्यायाम करायचा आहे , या विचारानंच अनेकांना थकायला होतं. आणि व्यायाम नकोसा वाटायला लागतो. म्हणूनच व्यायामाची छोट्या छोट्या भागात विभागणी करावी. १० मीनिटं संपूर्ण शरीराचा व्यायाम. मग थोडं थांबून पुढची दहा मीनिटं हाताचा व्यायाम. पुन्हा छोटा ब्रेक घेऊन १० मीनिटं पायाचे व्यायाम, ब्रेक. मग दहा मीनिटं जमिनीवर पडून व्यायाम. अशी व्यायामाची विभागणी केल्यास थकवा येत नाही. संपूर्ण शरीराचा व्यवस्थित व्यायाम होतो. आणि असा तुकड्या तुकड्यात केलेल्या व्यायामाचे श्रम वाटत नाही. उलट आणखी जास्त वेळ व्यायाम करावासा वाटतो. 

२) मन आनंदी करण्यासाठी संगीत ऐकाव्यायाम करताना थकवा जाणवायला लागला की व्यायामातला इंटरेस्ट संपून जातो. हा थकवा वाटू नये यासाठी आपलं लक्ष थकव्यावरुन इतरत्र वळणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या आवडीचं संगीत मदत करु शकतं. व्यायाम करण्यास उत्तेजना मिळेल अशी गाणी निवडून ती व्यायामाच्या वेळेस ऐकली तर व्यायाम करताना छान उत्साह येतो. संगीताच्या लयीमुळे व्यायाम करताना शरीराच्या हालचालीलाही एक लय मिळते. संगीतामुळे व्यायामावर लक्ष केंद्रित होतं. थकव्याकडे दूर्लक्ष होतं. व्यायाम हा अवघड वाटत नाही. त्यामूळे अवघड वाटणारे व्यायाम करण्याफ्ची इच्छा होते. व्यायामात मन लागल्याने त्याचा अपेक्षित परिणाम शरीरास मिळतो.

३) हसत राहाव्यायाम करताना चेहेºयावर हास्य हवं. पण व्यायाम करताना, घाम येत असताना, दम लागलेला असताना चेहेरा हसरा ठेवणं ही अवघड गोष्ट वाटू शकेल. पण हे प्रयत्नपूर्वक करायला हवं. कारण व्यायाम करताना चेहेऱ्यावर हास्य असल्यास व्यायामादरम्यान शरीराला ऑक्सिजनची कमी गरज लागते. चेहेऱ्यावर हास्य असल्यास मन आनंदी राहातं. त्यामूळे व्यायाम करताना स्नायूंवर येणारा ताण कमी होतो. स्नायूंना हलकं वाटल्यास व्यायाम करणं अवघड वाटत नाही. आपण छान हसत असल्यास आपल्या मेंदुलाही त्यामूळे सकारात्मक संदेश मिळतो. त्याचा परिणाम हणजे व्यायामाचा आनंद वाटायला लागतो. असा छान हसत आनंदानं व्यायाम केल्यास व्यायाम रोज करण्याकडे कल वाढतो. 

४) सकारात्मक बोलत राहा.व्यायाम हा आपल्या शरीरास फायदा व्हावा या सकारात्मक अपेक्षेच्या पूर्तीसाठी केला जातो. पण व्यायाम करतानाच मनात नकारात्मक विचार असतील तर शरीराला व्यायामासाठीची ऊर्जा मिळत नाही. अमूक एक व्यायाम प्रकाराचा कंटाळाच येतो, अमूक एक प्रकार फारच थकवतो. अमूक एक प्रकार जमतच नाही असा विचार केला तर व्यायाम करावासा वाटत नाही. त्यापेक्षा मला हे जमेल, मला व्यायाम करताना आनंद वाटेल असे सकारात्मक विचार ठेवले तर व्यायाम करताना शरीराला पुरेशी ताकद मिळते.

५) व्यायाम जोडीदार हवा.एकट्याने व्यायम करायचा यामूळेही अनेकींना व्यायाम नकोसा वाटतो. मग व्यायामाला वरचेवर दांड्या पडतात. पण जर व्यायाम करत्ग्सोबत मैत्रिण असल्यास अवघड व्यायाम जास्त करण्याची इच्छा निर्माण होते. आपली सोबतची मैत्रिणही व्यायाम करतेय, तीही घामेघूम झालेली आहे हे बघून आपल्यालाही व्यायाम करावासा वाटतो. सोबतीनं व्यायाम केल्यानं शरीराला होत असलेले कष्ट जाणवत नाही. व्यायामाला कोणी सोबत असल्यास व्यायामाला जायचा कंटाळा येत नाही. व्यायामासाठी आवश्यक असलेला नियमितपणा अंगी येतो.

६) एकाग्रतेचा- सजगतेचा सराव करा.आठवडाभर आनंदानं व्यायाम करायचा असल्यास आठवड्यातून किमान दोन वेळा माइंडफूलनेसचा सराव करावा. यामूळे व्यायामाचा दमसास वाढतो. व्यायाम करताना श्वासावर लक्ष केंद्रित होतं. आपल्या शरीरात, मनात काय चाललंय याची जाणीव होते. त्याचा परिणाम म्हणजे व्यायामाला एक फ्लो येतो आणि व्यायामाची मजा वाटू लागते.

७) लक्ष व्यायामातच असू द्याबाहेर व्यायाम करताना बरेचदा लक्ष विचलित होतं. आपण काय व्यायाम करतोय हेच लक्षात राहात नाही. लक्ष विचलित झाल्याने मनात वेगवेगळे विचार येतात. त्यामूळे व्यायामावरचं लक्ष उडून जातं. मग अशा व्यायामाची मजा येत नाही. थकवा येतो. व्यायाम करताना जर पूर्ण लक्ष व्यायामावरच दिलं तर आपलं मन चालू क्षणात राहातं. आपल्याला मेंदू काय आदेश देतंय हे लक्षात येतं. व्यायामाच्या वेळेस शरीर, मन आणि मेंदू हे तिन्ही एकाग्र असतील तर व्यायाम ही एक आनंदाची बाब होते.