Join us  

एका जागी शांत बसा, आजार छु मंतर! खरं नाही वाटत, सुखासनात बसून तर पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 8:01 PM

योगसाधनेत सुखासनाला विशेष महत्त्व आहे. या आसनानं शारीरिक आणि मानसिक आरोग्यास मिळणारे फायदे मोलाचे आहेत.

ठळक मुद्देसुखासन नियमित केल्यास एकाग्रता वाढते. यामुळे कामावर लक्ष चांगलं केंद्रित होतं.सुखासनामुळे शरीर लवचिक राखण्यास मदत होते.सुखासन नियमित केल्यास शरीर आणि मनाला सुख आणि शांती मिळते.

व्यायाम हा फक्त वजनाशी निगडित कधीच नसतो. फिटनेस तज्ज्ञ, संशोधक, अभ्यासक, डॉक्टर्स व्यायाम हा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी करावा असं सांगतात. केवळ वजन कमी करणे एवढाच उद्देश ठेवून व्यायाम केल्यास त्या व्यायामाचा फायदा होत नाही. योगतज्ज्ञ तर नेहेमी सांगतात की वजन कमी करण्यासाठी म्हणून योग कधीच करु नये.स्वास्थ्य प्राप्त करुन घेण्यासाठी योग करावा. या उद्देशाने योग केला की त्याचा फायदा आपोआपच वजनावरही होतो.

योगसाधनेत सुखासनाला विशेष महत्त्व आहे. या आसनानं शारीरिक आणि मानसिक आरोग्यास मिळणारे फायदे मोलाचे आहेत. सुखासन हा एक संस्कृत शब्द आहे. सुख आणि आसन या दोन शब्दांचा मिळून तो तयार झाला आहे. या आसनामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. संसर्गापासून शरीरचा बचाव होतो. हे आसन नियमित केल्यास शरीर आणि मनाला सुख आणि शांती मिळते.

छायाचित्र:- गुगल

सुखासन कसं करावं?

 1 सुखासन करताना योग मॅट किंवा संतरंजी अंथरावी आणि त्यावर बसावं.2. दोन्ही हात ओमच्या अवस्थेत गुडघ्यांवर ठेवावेत.3. हे आसन करताना पाठीचा कणा अगदी ताठ हवा.4. डोळे बंद करावेत आणि शरीरावरचा सर्व ताण काढून टाकावा. शरीर सैल सोडावं.5. सुखासनात कमीत कमी दहा मिनिटं राहावं. त्यापेक्षा जास्त वेळ सुखासन केलं तरी चालतं.6. सुखासनात मंद गतीने श्वसन सुरु ठेवावं.

छायाचित्र:- गुगल

सुखासनानं काय मिळतं?

1. शरीरातला रक्तप्रवाह सुधारतो.2. हदयाशी निगडित समस्यांचा धोका कमी होतो.3. हे आसन मानसिक ताण कमी करण्यास मदत करतं.4. हे आसन नियमित केल्यास एकाग्रता वाढते. यामुळे कामावर लक्ष चांगलं केंद्रित होतं.5. या आसनामुळे राग येण्याचं प्रमाण अगदीच कमी होतं.6. हे आसन नियमित केल्यास मेंदू शांत राहातो.7. सुखासनामुळे शरीर लवचिक राखण्यास मदत होते.8. सुखासनामुळे छाती आणि हाताचे स्नायू मजबूत होतात.

छायाचित्र:- गुगल

हे मात्र लक्षात ठेवा.

 1. ज्यांना गुडघे दुखीचा त्रास आहे त्यांनी सुखासन करणं टाळावं.2. पाठीचा कणा दुखत असल्यास सुखासन करु नये.3. सुखासन नेहेमी रिकाम्या पोटी करावं.4. सायटिकाच्या रुग्णांनी सुखासन करु नये.5. सुखासन करताना श्वास रोखून ठेवू नये.