Join us  

बोअर होतंय ? स्ट्रेस-टेंशन छळतं आहे ? -या ‘ॲक्टिव्हिटी’ करा, हो जा फ्रेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 2:37 PM

मनावरचा ताण घालवायचा असेल तर शरीराला थोडं जास्त हालचालीचं काम द्यायला हवं. घाम गाळायला हवा. माणसाचं शरीर हे केवळ बसून राहाण्यासाठी नाहीच. त्यामुळे उठून शरीराच्या दृष्टीने थोड्या ताकदवान हालचाली करायला हव्यात. या हालचालींमुळे आपल्या स्नायू क्रियाशील राहतात. रक्तप्रवाह सुधारतो . व्यायामामुळे दीर्घ श्वसन होतं त्याचा परिणाम शरीराला आराम मिळतो.

ठळक मुद्दे योग आसनं करताना प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे मनाला वास्तवात राहाण्याची सवय लागते. नाहक विचार करुन ताण घेण्याची सवय दूर होते. ताई ची हा व्यायाम प्रकार रोजच्या जीवनातील ताण बाजूला सारुन वर्तमान क्षणांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देतो.नृत्य हा एक व्यायामप्रकारही आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक लाभ या व्यायाम प्रकारातून मिळतात. टेनिस खेळण्यानं शरीरात एन्डॉर्फिन्स्न नावाचं संप्रेरक स्त्रवतं. या संप्रेरकामुळे शांत आणि समाधानाची जाणीव निर्माण होते. ही जाणीव मनावरचा ताण सहज घालवते.

सध्याचे दिवस हे खूप ताणाचे आहेत. पण या ताणातून मार्ग काढता यायला हवा. अभ्यासक म्हणतात की ताण हा कोणालाही येवू शकतो. स्त्रियांना कमी आणि पुरुषांना जास्त ताण असतो असं नाही. पण ताणाच्या परिणामांमध्ये मात्र फरक आहे. ताणाचा पुरुषांपेक्षा स्त्रियांवर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे मनावरचा ताण घालवण्यासाठी उपाय करायला हवा. ताण घालवणं म्हणजे पलंगावर झोपून घेऊन आराम करणं नव्हे. त्यामुळे ताण जात नाही. मनावरचा ताण घालवायचा असेल तर शरीराला थोडं जास्त हालचालीचं काम द्यायला हवं. घाम गाळायला हवा. माणसाचं शरीर हे केवळ बसून राहाण्यासाठी नाहीच. त्यामुळे उठून शरीराच्या दृष्टीनं थोड्या ताकदवान हालचाली करायला हव्यात. या हालचालींमुळे आपल्या स्नायू क्रियाशील राहतात. रक्तप्रवाह सुधारतो . व्यायामामुळे दीर्घ श्वसन होतं त्याचा परिणाम शरीराला आराम मिळतो. व्यायाम हा शरीराच्या दृष्टीने आवश्यक आणि परिणामकारकच असतो. पण मनावरचा ताण घालवण्यासाठी काही विशिष्ट व्यायाम जाणीवपूर्वक करावे लागतात.

ताण घालवणरे व्यायाम

योगयोगसाधनेतील विविध आसनांनी शरीर लवचिक होतं. शरीरावरचा ताण नाहीसा होतो. योग साधनेतील आसनं करताना दीर्घ श्वसन केलं जातं.त्याचा परिणाम शरीरास आराम मिळण्यास होतो. एका अभ्यासानुसार हे सिध्द झालं आहे की योगसाधनेमुळे रक्तदाब नियंत्रित राहातो. पण मानसिक ताण घालवण्यासाठी जाणीवपूर्वक योगसाधनेचा विचार केला तर ताणाचं व्यवस्थापन प्रभावीरित्या करता येतं. योग आसनं करताना प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे मनाला वास्तवात राहाण्याची सवय लागते. नाहक विचार करुन ताण घेण्याची सवय दूर होते. योगसाधना शिकून ती घरी स्वत:ची स्वत: करता येते.

ताई चीप्राचीन चायनिज मार्शल आर्टचा ताई ची हा एक प्रकार आहे. शारीरिक हालचाल आणि श्वसन याच्याशी निगडित हा व्यायाम प्रकार आहे. या व्यायाम प्रकाराला हालचालीतून ध्यानधारणा असं संबोधलं जातं. ताई ची हा व्यायाम प्रकार रोजच्या जीवनातील ताण बाजूला सारुन वर्तमान क्षणांवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहन देतो. ताई ची हा शरीराची लवचिकता आणि शरीराची ऊर्जा वाढवतो. ताई ची व्यायाम प्रकार केल्यानं छान वाटायला लागतं. तसेच समतोल साधता येणं, आरामदायी आणि गाढ झोप लागणं आणि हदयाचं आरोग्य नीट राहाणं हे या व्यायाम प्रकाराचे आणखी महत्त्वाचे फायदे आहेत.

ताई ची व्यायाम प्रकारात शंभरापेक्षा सौम्य आणि प्रवाही शारीर हालचालींचा समावेश असतो. या हालचालींचा आणि श्वसनाचा जवळचा संबंध असतो. योग आसनं करताना मधे जसा थांबा असतो तसा थांबा यात नसतो. एका विशिष्ट लयीत सतत हालचाली केल्या जातात. हा व्यायाम प्रकार शरीर आणि मनावरचा ताण निवळण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो.तो क्लासेसद्वारा शिकून त्याचा सराव घरातल्या घरात करता येतो.

चालणेचालणं हा सगळ्यात सोपा आणि सहज प्रकारचा व्यायाम आहे. त्यासाठी क्लास लावण्याची किंवा विशिष्ट साधनं विकत घेण्याची गरज पडत नाही. नियमित चालण्यानं ताण निर्माण करणाऱ्या कारणांची तीव्रता कमी होते, ह्दयाचं आरोग्य सुधारतं. उच्च रक्तादाब, कोलेस्टेरॉल आणि टाइप २ चा मधूमेह यांची लक्षणं कमी होतात. नियमित चालण्यानं ताणाची पातळी कमी होते, आत्मविश्वास वाढतो. चांगलं जगण्यासाठी चालण्याचा व्यायाम मोठी भूमिका पार पाडतो. चालण्यानं स्नायुंवर आलेला ताण निघून जातो. श्वास खोलवर घेता येतो. शिवाय मेंदू शांत होतो. दहा मिनिटं चालण्यानं हा व्यायाम सूरु करता येतो. दोन तीन आठव्ड्यांनी चालण्याच्या गतीत आणि अंतरात वाढ करत गेल्यास त्याचा फायदा होतो. चालण्याच्या निमित्तानं आपण बाहेर पडतो. निसर्गाच्या सान्निध्यात राहातो त्याचा परिणाम मन शांत आणि आनंदी होण्यास होतो. आठवड्यातले पाच ते सहा दिवस अर्धा तास चालण्याचा व्यायाम आरोग्य व्यवस्थित ठेवण्यास आणि ताणाचं व्यवस्थापन करण्यास फायदेशीर ठरतो. तसेच चालण्याच्या व्यायामानं वजन कमी होण्यासही मदत होते. यासाठी वेग आणि अंतर थोडं वाढवावं लागतं.

बागकामबागकाम करणं हा मनाचं आरोग्य सांभाळणारा उत्तम व्यायाम आहे. बागकाम केल्यानं मनावरचा ताण कमी होतो तसेच शरारातील उष्मांकही जळतात. बागकाम केल्यानं निसर्गाचं सान्निध्य लाभतं. मनावरचा ताण घालवून टाकण्यासाठी तज्ज्ञ बागकाम करण्याचा सल्ला देतात.

नृत्यनृत्य हा एक व्यायामप्रकारही आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक लाभ या व्यायाम प्रकारातून मिळतात. हालचालींचा डौल आणि शरीराची चपळता य गोष्टी नृत्यानं साध्य होतात. नृत्यात सतत नव नवीन हालचाली शिकण्यासाठी लक्ष केंद्रित करावं लागतं त्यामूळे आठवड्यातून दोन ते तीन दिवस नृत्याच व्यायाम केल्यास विस्मरणाचा धोका टळतो. नृत्य हा समुहाशी बांधून ठेवतो. माणसांशी नातं निर्माण करतो. या गोष्टींमुळेही मनावरचा ताण निवळतो. आनंदी राहाण्यास बळ मिळतं.

टेनिस  हा व्यायाम प्रकार ह्दयासाठी उत्तम मानला जातो. ताणानं निर्माण होणारे उच्च रक्तदाब आणि हदयासंबंधित आजाराचा धोका कमी होतो. टेनिस हा काही एकट्यानं खेळायचा खेळ नाही. त्यामूळे खिलाडू वृत्ती निर्माण होते. यामुळेही ताण कमी होतो. टेनिस खेळण्यानं शरीरात एन्डॉर्फिन्स्न नावाचं संप्रेरक स्त्रवतं. या संप्रेरकामुळे शांत आणि समाधानाची जाणीव निर्माण होते. ही जाणीव मनावरचा ताण सहज घालवते.