नीता अंबानी यांच्या साड्यांची नेहमीच चर्चा होत असते. पैसा, फॅशन सेन्स आणि सौंदर्य या तिन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व नेहमीच बोलके, आकर्षक आणि समोरच्यावर छाप पाडणारे असते. साडी हा पारंपरिक भारतीय पेहराव नीता अंबानी यांचा विशेष आवडीचा. त्यांच्या या आवडीतून पारंपरिक विणकाम कलेला प्राेत्साहन देण्याचा, बळकटी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच तर त्या कधी काशीला जाऊन बनारसी विणणाऱ्या कारागीरांची भेट घेतात तर कधी गुजरातच्या विणकरांकडून पटोला साडी विणून घेतात. आता त्यांची अशीच एक अतिशय सुंदर आणि खूप महागडी साडी चर्चेत आली असून ती जबरदस्त व्हायरल झाली आहे. ती साडी एवढी महाग का ते पाहूया..(Nita Ambani Recently Spotted In a Stunning ₹3.5 Crore Saree)
कशी आहे नीता अंबानींची ३. ५ कोटींची साडी?
नीता अंबानींच्या त्या साडीचा रंग गडद चॉकलेटी किंवा कॉफी कलर या प्रकारात मोडणारा आहे. या साडीचे फोटो luxuriousbymm या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आले असून ती साडी सेलिब्रिटी फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला या जोडीने डिझाईन केली आहे.
किचन ट्रॉली ओढायला खूप जड जाते? फक्त २ कामं करा- अगदी अलगदपणे ट्रॉली सरकेल
असं म्हटलं जात आहे की ही साडी एवढी महाग असण्याचं कारण म्हणजे ती अस्सल सोन्याच्या टिश्यू फॅब्रिकने तयार केली आहे. शिवाय नाजूक जर्दोसी वर्क करून या साडीवर स्वरोस्कीचे हिरे जडविण्यात आलेले आहेत. त्यामुळे अगदी प्रत्येक हालचालीसोबतच ही साडी चमकून उठते आणि तिची श्रीमंती दाखवून देते. या साडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साडी तयार करताना किंवा तिच्यावर वर्क करताना कुठेही मशिन वर्क केलेलं नाही.
पुर्णपणे हाताने त्यावर नक्षीकाम करण्यात आलेलं असल्यानेही साडीची किंमत वाढलेली आहे. शिवाय साडीचे काठही अतिशय सुंदर पद्धतीने विणलेले आहेत.
कळकट -घाणेरडा कंगवा झटपट स्वच्छ करण्याच्या पाहा २ मस्त देसी जुगाडू पद्धती, कंगवा दिसेल नवाकोरा
या देखण्या साडीवर नीता अंबानी यांनी सोनेरी रंगाचे भरीव वर्क असणारे ब्लाऊज घातले होते. शिवाय त्यांच्या गळ्यातला पाच पदरी हार आणि कानात असलेले हिऱ्यांचे ठसठशीत कानातले नीता यांच्या लूकला एक अतिशय शाही आणि श्रीमंती टच देणारे ठरले.