Join us  

पाहा धकधक गर्लचा २.५ लाखांचा खास ड्रेस, फ्लोरल लाल शरारामध्ये ५० व्या वर्षीही दिसते तितकीच सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 5:35 PM

Madhuri Dixit looking hot in Red 2.5 Lacks Sharara Dress : या ड्रेसवर माधुरीने हिरव्या रंगाची अतिशय नाजूक अशी छान ज्वेलरी घातल्याने तिचा लूक आणखी खुलला आहे.

नव्वदीच्या काळात सौंदर्य, अभिनय आणि स्माईलने रसिकांना घायाळ करणारी माधुरीची लोकप्रियता आजही अजिबात कमी झालेली नाही. डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यानंतर माधुरी परदेशात आपल्या संसारात व्यस्त झाली.पण २ मुलांची आई झाल्यानंतरही वयाच्या पन्नाशीत माधुरीचे सौंदर्य आजही तरुणींना लाजवेल असेच आहे.माधुरीची स्माईल जितकी दिलखेचक आहे तितकंच तिचं एकूणच सौंदर्य वयाच्या या टप्प्यावरही अनेकांना घायाळ करणारं आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा आहार आणि संतुलित जीवनशैली (Madhuri Dixit looking hot in Red 2.5 Lacks Sharara Dress). 

माधुरीची त्वचा, स्माईल, फिगर आणि ती कॅरी करत असलेली फॅशन याबद्दल नेहमीच चर्चा असते. बॉलिवूडमधून विश्रांती घेतल्यानंतर माधुरी रिअॅलिटी शोमधून तर आपल्या समोर आलीच पण तिच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातूनही ती आपल्याला भेटत असते. ब्यूटी आणि फूड हे २ तिच्या आवडीचे विषय घेऊन माधुरी आपल्या युट्यूब चॅनेलवर नेहमी काही ना काही पोस्ट करत असते. साडी असो किंवा वेस्टर्न आऊटफिटस या दोन्हीमध्ये माधुरी तितकीच सुंदर दिसते. नुकतेच माधुरीचे लाल रंगाच्या ड्रेसमधील हॉट फोटो पाहायला मिळाले, या ड्रेसमध्येही माधुरी अतिशय सुंदर दिसते.  

फुल स्लिव्हज असलेला लाल रंगाचा हा शरारा फ्लोरल प्रिंटचा आहे. याला नाजूकशी किनार लावलेली असून डीप असा व्ही नेक दिलेला आहे. या ड्रेसची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल २.५ लाख इतकी आहे. अनिता डोंगरे या फॅशन डिझायनरने तयार केलेल्या या शराराचे कापड सिल्कचे आहे. यावर जरदोसी, सिक्विन आणि दोऱ्याचे एम्बरॉडरी वर्क आहे. तसेच या ड्रेसला घोळदार अशी सलवारही देण्यात आली आहे. या ड्रेसवर माधुरीने हिरव्या रंगाची अतिशय नाजूक अशी छान ज्वेलरी घातल्याने तिचा लूक आणखी खुलला आहे. यावर तिने फारसा मेकअपही केला नसून नॅचरल लूकमध्ये ती अतिशय मोहक दिसत आहे.    

टॅग्स :फॅशनमाधुरी दिक्षित