Join us  

आपल्या चेहऱ्याला कोणते कानातले होतील सूट? ५ टिप्स, चेहऱ्याच्या शेपनुसार निवडा कानातले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2023 3:30 PM

Know How To Balance face shape with earrings Fashion Tips : आपल्याकडे विविध प्रकारचे बरेच कानातले असतात पण त्यातले नेमके कोणते घालायचे असा प्रश्न आपल्याला पडतो

ऑफीसला जाताना, बाहेर फिरायला जाताना किंवा अगदी एखाद्या समारंभाला जाताना आपण छान वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. यावर आपण नेहमी दागिने घालतोच असे नाही पण एखादे छानसे कानातले तरी आवर्जून पेअर करतो. कधी हे कानातले पारंपरिक पद्धतीचे असतात तर कधी मॉडर्न पद्धतीचे. कधी खूप मोठ्या आकाराचे तर कधी अगदी लहान टॉप्स असतात. पण प्रत्येक कपड्यावर किंवा स्पेसिफीक फंक्शनसाठी कपडे निवडताना आपल्याला जसा वेळ लागतो तसाच कानातले निवडतानाही बराच वेळ जातो. आपल्याकडे विविध प्रकारचे बरेच कानातले असतात पण त्यातले नेमके कोणते घालायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. अशावेळी कानातल्यांची निवड करणे सोपे व्हावे यासाठी आज आपण काही सोप्या टिप्स पाहणार आहोत. प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी याविषयीच्या काही टिप्स शेअर करतात. आपल्या चेहऱ्याचा शेप लक्षात घेऊन कानातल्यांची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या पाहूया (Know How To Balance face shape with earrings Fashion Tips) ...

१. गोल चेहरा - तुमचा चेहरा एकदम गोलाकार असेल तर चौकोनी किंवा उलटे त्रिकोणी कानातले तुमच्यावर छान दिसू शकतात. 

२. चौकोनी चेहरा - चेहऱ्याचा आकार थोडा चौकोनी असेल तर तुम्ही गोलाकार कानातले घालायला हवेत. जेणेकरुन तुमचा चेहरा बॅलन्स होण्यास मदत होईल. यामध्ये लहान आकारापासून मोठ्या आकाराच्या रींगांपर्यंत विविध प्रकारचे गोल कानातले तुम्ही आवडीनुसार घालू शकता. 

३. दंडगोलाकार चेहरा - तुमचा चेहरा दंडगोलाकार असेल तर त्यावर थोडे लांब पण बारीक आकाराचे कानातले अतिशय चांगले दिसतात. यामुळे चेहरा जास्त छान खुलून येण्यास मदत होते. उंच कानातले घातल्याने नकळत आपली उंचीही जास्त दिसण्यास मदत होते. 

४. त्रिकोणी चेहरा - चेहऱ्याला हनुवटीच्या बाजुने त्रिकोणी फेसकट असेल तर ड्रॉपच्या आकाराचे कानातले त्यावर चांगले दिसतात. बाजारात बरेच कानातले अशाप्रकारचे असतात, त्यामुळे तुमचा चेहरा थोडा त्रिकोणी असेल तर हा शेप तुम्ही नक्की ट्राय करायला हवा. 

५. सगळ्यांना चालतील असे कानातले - टॉप्स किंवा स्टडस असे अगदी कानाला चिकटून असणारे कानातले हे कोणत्याही प्रकारच्या फेस कटला चांगले दिसतात, त्यामुळे तुम्हाला काय घालायचे काहीच कळत नसेल तर सरळ मोती, खडे असे सिंपल टॉप्स तुम्ही पेअर करु शकता.  

टॅग्स :फॅशनदागिनेमेकअप टिप्स