Join us  

आयरा खानच्या भरजरी लेहेंग्यावर होते सुंदर कर्दाना वर्क, बघा एम्ब्रॉयडरीचा हा प्रकार कोणता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 11:51 AM

Ira Khan's Reception Lehenga: आमिर खानच्या लेकीच्या लेहेंग्यावर सुंदर कर्दाना वर्क केलेले होते (Wedding of Ira Khan). तुम्हाला माहिती आहे का एम्ब्रॉयडरीचा (kardana embroidery) हा प्रकार नेमका कोणता असतो....(what is kardana work?)

ठळक मुद्देया घागऱ्यावरचे बहुतांश काम हातानेच करण्यात आले असून त्यासाठी सगळ्या कारागिरांनी मिळून जवळपास ३०० तास मेहनत घेतली

अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आणि सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे यांचा शाही विवाह सोहळा उदयपूर येथे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. सुरुवातीला दोघांनी कोर्ट मॅरेज केले. त्यानंतर उदयपूर येथे डेस्टिनेशन वेडिंग झाले. आणि त्यानंतर या सोहळ्याचा तिसरा टप्पा म्हणजेच लग्नाचे रिसेप्शन सिनेतारकांच्या आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडले. रिसेप्शनसाठी आयराने लाल- मरून रंगाचा सुंदर लेहेंगा घातला होता (Ira Khan's reception lehenga was having heavy kardana work). या लेहेंग्यावर करण्यात आलेले भरजरी कर्दाना वर्क (what is kardana work?) उपस्थितांची नजळ खिळवून ठेवणारे ठरले. (what is the speciality of kardana embroidery?)

 

फॅशन डिझायनर मोनाली रॉय यांनी आयराचा हा लेहेंगा डिझाईन केला होता. bollywoodshaadis यांना मोनाली रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार या घागऱ्यावरचे बहुतांश काम हातानेच करण्यात आले असून त्यासाठी सगळ्या कारागिरांनी मिळून जवळपास ३०० तास मेहनत घेतली.

बघा कोणत्या पदार्थासाठी कोणतं तेल वापरावं, तब्येतीच्या ५० टक्के तक्रारी दूर होतील- वजनही घटेल

रॉ सिल्क प्रकारचा कपडा असलेल्या तिच्या या लेहेंग्यावर कर्दाना वर्क आणि जरदोसी वर्क यांचं युनिक कॉम्बिनेशन करण्यात आलं असून त्यावर सोनेरी रंगाचं सेक्विन वर्कदेखील आहे. ब्लाऊज आणि लेहेंगा दोन्हींवर सारख्याच प्रकारचं वर्क असून ओढणी प्लेन लालसर रंगाची आहे. तसेच ओढणीच्या काठाला लेहेंग्याप्रमाणे नाजूक वर्क करण्यात आले आहे.

कर्दाना वर्क म्हणजे काय?

 

कर्दाना वर्क या प्रकारात वेगवेगळ्या आकाराचे कुंदन, स्टोन किंवा बीड्स वापरून कपड्यांवर त्याचं वर्क केलं जातं.

कपड्यांवर पडलेला डाग कितीही पक्का असला तरी लगेच निघून जाईल- १ सोपा उपाय 

हे स्टोन, मोती किंवा कुंदन एम्ब्रॉयडरी करून कपड्यावर फिक्स बसवले जातात. या प्रकारातला लेहेंगा बराच हेवी असतो. कारण त्यावर खूप भरगच्च काम केलं जातं.  

टॅग्स :फॅशनइरा खानआमिर खान