Join us  

कुणाल खेमूला छोटीशी डुलकी घेणं पडलं महागात, बघा तोपर्यंत लेकीने काय केली कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 6:02 PM

Viral Video of Soha Ali Khan's Daughter: आपल्याकडून थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी तेवढ्या काही मिनिटांत लहान मुलं काय काय पराक्रम करून ठेवू शकतात, याचा अनुभव जवळपास प्रत्येक पालकानेच घेतलेला असतो.

ठळक मुद्देबहुतांश मुलींनी लहानपणी हा प्रयोग केलेलाच असतो. इनायाही तेच करते आहे....

५ ते ६ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना सांभाळणं हे अजिबातच चेष्टेचं काम नाही. या मुलांकडे सतत लक्ष द्यावं लागतं. त्यात आपण थोडं जरी कमी पडलो तरी तोपर्यंत मुलं काय काय कुटाणे करून ठेवू शकतात किंवा घरात काय पसारा घालून ठेवू शकतात, याचा आपण विचारही करू शकत नाही. सोहा अली खान आणि कुणाल खेमू (Soha Ali Khan and Kunal Khemu's daughter) या स्टार दाम्पत्याच्या लेकीनेही म्हणजेच इनायाने (Inaya) कुणालचा डोळा चुकवून असंच काहीसं केलं आहे. पण तिने जी काही खोडी काढली आहे, ती अतिशय गोड आहे. बघा नेमकं केलंय तरी काय तिने..(Inaya applying nail colour on Kunal's nail)

 

सोहा अली खानने बाप- लेकीचा हा सुरेख व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अवघ्या काही सेकंदाचाच हा व्हिडिओ आहे, पण तरीही नेटिझन्सला मात्र अतिशय आवडला आहे.

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडतेय? वापरा ५ पदार्थ, त्वचा राहील मुलायम आणि चमकदार

बहुतांश मुलींनी लहानपणी हा प्रयोग केलेलाच असतो. इनायाही तेच करते आहे, अशा स्वरुपाच्या कमेंट्सही या व्हिडिओला आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की कुणाल खेमू सोफ्यावर पडून डुलकी घेत आहे. आणि त्याचवेळी त्याची लेक इनाया मात्र या संधीचा फायदा घेऊन त्याच्या पायाच्या नखांना नेलपेंट लावत आहे.

 

हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे. लहानपणी प्रत्येक मुलीला तिच्या आईकडे असणाऱ्या मेकअपच्या वस्तूंचं आकर्षण वाटत असतं. या कॉस्मेटिक्सचा वापर करण्याची त्यांची खूप इच्छा असते.

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मलायका अरोरा सांगतेय दंड योगा, बघा कसा करायचा हा व्यायाम 

त्यामुळे मग काही जणी स्वत:वर प्रयोग करतात तर काही जणी इनायाप्रमाणे घरातल्या मोठ्या माणसांवर प्रयोग करतात. मागे एकदा अभिनेत्री समीरा रेड्डी हिने देखील तिच्या मुलीचा अशाच पद्धतीचा व्हिडिओ शेअर केला होता. यात समीराची लेक तिचं मेनिक्युअर करून देताना दिसत होती. 

 

टॅग्स :सेलिब्रिटीसोहा अली खानकुणाल खेमूसमीरा रेड्डी