Join us

अकाली पिकणाऱ्या केसांवर चमचाभर कॉफी करेल जादू! 'या' पद्धतीने लावा, केस होतील काळेभोर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2025 11:41 IST

White hair solution: Coffee hair mask for hair: Home remedies for black hair: अकाली पिकणाऱ्या केसांपासून आपली सुटका कशी होईल? कोणता हेअर मास्क ठरेल फायदेशीर? वाचा लेख

ऐन तारुण्यात केस पिकायला लागले की, आपल्याला टेन्शन येते. आधीच केसगळती आणि केसांच्या इतर समस्यांना आपला जीव नकोसा केलेला असतो.(Natural hair shine tips) अशातच केसांच्या या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक महागडे उत्पादने केसांवर लावतो.(Ayurvedic remedies for white hair) केसांना काळेभोर करण्यासाठी अनेक हेअर ड्रायचा उपयोग करतो परंतु, यामुळे केस काळे होण्याऐवजी ते अधिकच पांढरे होतात.(Coffee for hair growth and color) त्यात असणारे केमिकल्स केसांच्या वाढीसाठी नुकसानदायक ठरतात. (Coffee for hair growth and color)चुकीची जीवनशैली आणि जंक फुडचे सेवन आपले केस अकाली पांढरे होण्याचे कारण मानले जाते.(Coffee hair mask for hair) तसेच काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील केस पांढरे होतात. आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक पदार्थ ज्यामुळे आपले केस सहज काळे होऊ शकतात.(Home remedies for black hair) कॉफी फक्त त्वचेसाठी नाही तर केसांसाठी देखील फायदेशीर आहे. याचा आपण हेअर मास्क बनवून केसांना लावू शकतो. ज्यामुळे अकाली पिकणाऱ्या केसांपासून आपली सुटका होईल. (Premature greying solution)

२ रुपयांच्या कॉफीने हातांचे कोपरे- गुडघ्यांचा काळपटपणा होतो दूर, पाहा १० मिनिटांचा सोपा उपाय

आपल्यापैकी अनेक लोक पांढऱ्या केसांना लपवण्यासाठी मेहेंदीचा उपयोग करतात. पण मेहेंदीच्या पावडरमध्ये थोडी कॉफी मिसळून केसांना लावली तर केस मऊ आणि चमकदार तर होतील तसेच पांढरे देखील होणार नाही. हेअर पॅक बनवण्यासाठी आपल्याला कॉफी पावडरमध्ये मेहेंदी मिसळावी लागेल. त्यात पाणी घालून पेस्ट तयार करा. थोड्यावेळाने मास्क केसांना लावा. २ ते  ३ तासानंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा. 

तुम्ही ‘हे’ पदार्थ रोज खाता, म्हणून चेहऱ्यावर येतात मुरुम-पुटकुळ्या-डागही जाता जात नाहीत

पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी आपण चहाच्या पानांचा देखील वापर करु शकतो. यासाठी चहाच्या पाण्यात लिंबाचा रस मिसळा. हे पाणी थंड झाल्यानंतर केसांना लावा. दीड ते दोन तासांनी केस धुवा. केसांचा रंग सुधारण्यासाठी आवळा पावडर खूप फायदेशीर आहे. त्यासाठी आवळा पावडर आणि रीठा पावडर समप्रमाणात घ्या. पाण्यात मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार झाल्यानंतर केसांना लावा. २ तासानंतर केस स्वच्छ शॅम्पूने धुवा.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी