Join us  

चेहेऱ्यावरच्या काळ्या डागांसाठी महागड्या ट्रीटमेण्ट करताय? आधी हे वाचा, घरातल्या या ५ गोष्टी तुमचा प्रश्न सोडवू शकतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 6:16 PM

टोमॅटो, छोले, कच्चं दूध, बटाटा आणि मध . स्वयंपाकघरात या पाच गोष्टी सहज उपलब्ध होतात. त्यांच्या उपयोगाने चेहेऱ्यावरचे काळे डाग सहज जातात.

ठळक मुद्देटोमॅटोमधे लायकोपेने हा घटक असतो. हा घटक त्वचा उजळ करण्यास मदत करतो. तसेच या घटकामुळे चेहेऱ्यावरचे काळे डाग जातात.खनिजं आणि पोषक तत्त्वांनी युक्त असलेल्या छोल्यांमधे खराब झालेल्या त्वचेचं आरोग्य सूधारण्याची क्षमता असते.कच्चं दूध चेहेऱ्यास लावल्यास त्वचेच्या रंध्रातून त्वचेला आवश्यक ते जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतात.त्वचा स्वच्छ करणारे घटक बटाट्यामधे असल्याने त्याच्या उपयोगाने उन्हामूळे चेहे ऱ्यावर पडणारे काळे डाग नाहीसे होतात.

चेहेऱ्यावरच्या काळ्या डागांमुळे अनेकजणींना ब्यूटी कॉम्पलेक्स येतो. काळे डाग लपवण्याचे आटोकाट प्रयत्न केले तरी ते दिसतात. मेकअपच्या साधनांनी काळे डाग तात्पुरते झाकले जातात. पण ते कायमस्वरुपी घालवायचे असतील तर त्यावर उपायच करावे लागतात. त्यासाठी महागड्या स्कीन ट्रीटमेण्टची गरज नाही. 

चेहेऱ्यावर काळे डाग अनेक कारणांनी येतात. सूर्यप्रकाशाच्या प्रखरतेने चेहेरा काळवंडतो. ऊन, धूळ आणि अशूध्द घटकांनीही त्वचेच्या पेशीतील मेलानिनची निर्मीती मोठ्या प्रमाणात होते. त्यामूळेही चेहेऱ्यावर काळे डाग पडतात. वारंवार चेहेऱ्यावर मूरुम आणि पुटकुळ्या येत असतील तर त्याचेही डाग चेहेऱ्यावर राहातात. चेहेऱ्याला सतत हात लावण्याची सवय असते. त्यामूळेही चेहेत्यावर डाग पडतात. तसेच अनेकजणींना चेहेऱ्यावरचे फोड फोडण्याची सवय असते. या सवयीमूळे फोड गेल्यावर त्याचे डाग मात्र कायमस्वरुपी राहातात. चेहेऱ्यावरचे अनावश्यक केस काढून टाकल्यामुळेही फोड येऊन त्याचे काळे डाग पडतात. पण स्वयंपाकघरात आढळणाऱ्या रोजच्या जिन्नसातून या काळ्या डागांवर उपचार करता येतात.

टोमॅटोचा लेप

टोमॅटो तर प्रत्येकीच्याच घरात सहज उपलब्ध होऊ शकतो. टोमॅटोमधे लायकोपेने हा घटक असतो. हा घटक त्वचा उजळ करण्यास मदत करतो. तसेच या घटकामुळे चेहेऱ्यावरचे काळे डाग जातात. म्हणूनच टोमॅटोचा गर किंवा टोमॅटोची पेस्ट काळ्या डागांवर उत्तम उपाय आहे.यामूळे चेहेरा मऊ होतो. टोमॅटोच्या नियमित वापराने त्वचा सैल पडत नाही. तसेच चेहेऱ्यावरील खड्डे बूजतात. टोमॅटोच्या लेपासोबतच रोजच्या जेवणात सॅलेड म्हणून टोमॅटो खाल्ल्यास त्याचा त्वचेला जास्तीत जास्त फायदा मिळतो. काळे डाग लवकर निघून जाण्यासाठी टोमॅटोचा लेप हा आठवड्यातून दोनदा तरी लावावा. लेप लावला की पंधरा ते वीस मिनिटांनी चेहेरा थंड पाण्याने धुवावा.

छोल्यांचा फेस पॅक

छोल्यांची भाजी छान लागते हे सर्वांनाच माहित आहे. पण यात मोठ्या प्रमाणावर झिंक असल्यामूळे मूरुम पूटकूळ्यावरील इलाजासाठी सूध्दा त्याचा वापर होतो. छोल्यांमधे त्वचेतील विषरी घटक बाहेर काढण्याचे गूणधर्म असतात. खनिजं आणि पोषक तत्त्वांनी यूक्त असलेल्या छोल्यांमधे खराब झालेल्या त्वचेचं आरोग्य सूधारण्याची क्षमता असते. यासाठी छोल्यांची पावडर करुन घ्यावी. चार चमचे छोले पावडर आणि त्यात दोन चमचे लिंबाचा रस टाकून फेस पॅक तयार करावा. आणि तो संपूर्ण चेहेऱ्यास ( जिथे डाग आहेत तिथे जास्त प्रमाणात) लावावा. पंधरा वीस मिनिटांनी गार पाण्याने चेहेरा धुवावा. या फेस पॅकमूळे चेहेऱ्यावर अती तेल निर्माण होण्यावर नियंत्रण येतं. चांगले परिणाम दिसण्यासाठी हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.

कच्चं दूध

दूधात लॅक्टिक अ‍ॅसिड असतं. ते त्वचा मऊ करतं. शिवाय चेहेऱ्यावरचे डाग फिके करतात. कच्च्या दूधामूळे चेहेऱ्यावरच्या मृत पेशी निघून जातात. कच्चं दूध चेहेऱ्यास लावल्यास त्वचेच्या रंध्रातून त्वचेला आवश्यक ते जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतात. चेहेऱ्यावरचे काळे डाग काढण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कापसाचा बोळा कच्च्या दूधात बूडवून तो चेहेऱ्यावरुन फिरवावा. सकाळी उठल्यावर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

बटट्याचा रस

बटाट्यामधे त्वचेस उपयूक्त विकर भरपूर प्रमाणात असतात. त्वचा स्वच्छ करणारे घटक बटाट्यामधे असल्याने त्याच्या उपयोगाने उन्हामूळे चेहेऱ्यावर पडणारे काळे डाग नाहीसे होतात. बटाट्याच्या रसाचा फेस पॅक करताना एक चमचा बटाट्याचा रस आणि एक चमचा दही किंवा लिंबाचा रस घ्यावा. हा फेस पॅक चेहेऱ्यावर पंधरा मिनिटं ठेवावा. नंतर थंड पाण्याने चेहेरा धुवावा. लिंबू किंवा दह्यामूळे या पॅकमधे आम्लधर्म निर्माण होतो. आणि तो काळे डाग घालवण्यास फायदेशीर ठरतो.

मध

मध त्वचेची उत्तम काळजी घेतं, मध हे नैसर्गिक मॉश्चरायझर आहे. मधाच्या उपयोगाने चेहेऱ्यावरील मृत त्वचा निघून जाऊन चेहेरा स्वच्छ होतो. काळे डाग घालवण्यासाठी मध वापरताना हातावर थोडं मध घेऊन त्याने चेहेऱ्यास काही वेळ हलका मसाज करावा. मसाज केल्यावर पंधरा मिनिटं मध तसंच राहू द्यावं. नंतर चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा. काळे डाग लवकर जाण्यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा तरी हा मधाचा उपयोग करावा.