सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची लेक सारा (Sara Tendulkar) देखील तितकीच लोकप्रिय आहे. सारा तेंडुलकर फक्त तिच्या ग्लॅमरस लुकसाठीच नव्हे, तर तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही खूप फेमस आहे. सारा (Sara Tendulkar Reveal Her Beauty Secret Shares Desi Nuskha For Long & Healthy Hair) नेहमीच तिची त्वचा आणि केसांची खूप काळजी घेते. केस आणि त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सारा महागड्या ब्यूटी प्रॉडक्ट्स ऐवजी तिच्या आईने सांगितलेले घरगुती उपाय करण्याला अधिक पसंती देते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, साराने तिच्या लांब, सुंदर, घनदाट, काळ्याभोर केसांचे (Sara Tendulkar shares her mother’s desi hair oil nuska) सिक्रेट शेअर केले आहे. लांब, मजबूत आणि निरोगी केसांचे सगळे श्रेय सारा तिच्या आईने सांगितलेल्या पारंपरिक उपायालाच देते.
आपल्या आईने सांगितलेल्या, घरगुती उपायामुळे आपल्या केसांची गुणवत्ता आणि पोत सुधारल्याचे ती सांगते. केसांची योग्य ती काळजी घेण्यासाठी सारा करत असलेला उपाय साधासोपा, नैसर्गिक आणि कोणालाही सहज करता येण्यासारखा आहे. उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घेणं आवश्यक असताना, केसांचे आरोग्य आणि सौंदर्य टिकवण्यासाठी साराचा हा देसी घरगुती उपाय उपयोगी ठरु शकतो. सारा तेंडुलकरकेसांची काळजी घेण्यासाठी नेमका कोणता घरगुती उपाय फॉलो करते ते पाहूयात.
खरंतर, वोग इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत साराने तिची लाईफस्टाईल, ब्यूटी रूटीन आणि इतर अनेक गोष्टींबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला. या दरम्यान तिने सांगितलं की ती आपल्या केसांची खास काळजी घेण्यासाठी एक विशिष्ट घरगुती पारंपरिक उपाय फॉलो करते. सारा केसांसाठी करत असलेला घरगुती उपाय नेमका आहे काय ते पाहा...
उन्हाळ्यात घामामुळे केसांना कुबट दुर्गंधी येते? करा ६ घरगुती उपाय, चिकट केस-घाण वास गायब...
सारा केसांना कांद्याचा रस लावते...
आपल्या केसांची खास काळजी घेण्यासाठी सारा कांद्याचा रस केसांवर लावते. कांद्याचा रस केसांसाठी अत्यंत लाभदायक ठरतो. कांद्यात भरपूर प्रमाणात सल्फर असते, जे केसांच्या वाढीस चालना देते, मुळं मजबूत करते आणि स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केसगळती, डँड्रफ कमी होतो आणि स्काल्प अधिक निरोगी राहते. कांद्याच्या रसामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्मही असतात, जे स्काल्पला संसर्गापासून सुरक्षित ठेवतात. त्यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि नैसर्गिकरीत्या त्यांची वाढ होते.
स्वयंपाकघरातील 'हे' पदार्थच आहेत केसांसाठी उत्तम कंडिशनर! नको महागडे कंडिशनर - करा नैसर्गिक उपाय...
कांद्याचा रस केसांसाठी वापरण्याची योग्य पद्धत पाहूयात...
१. कांद्याचा रस काढा :- कांद्याचा रस काढल्यानंतर तो नीट गाळून घ्या, जेणेकरून त्यातील दोरे किंवा छोटे तुकडे केसांमध्ये अडकणार नाहीत.
२. कापसाच्या बोळ्याने लावा :- आता एक कापसाचा बोळा घ्या आणि त्याच्या मदतीने कांद्याचा रस केसांच्या मुळांमध्ये नीट लावा.
३. हलका मसाज करा :- रस लावल्यानंतर हलक्या हातांनी मसाज करा, जेणेकरून तो स्काल्पपर्यंत पोहोचेल आणि रक्ताभिसरण सुधारेल.
४. केसांवर मिश्रण तसेच राहू द्या :- हे मिश्रण केसांवर ३० ते ४५ मिनिटांपर्यंत तसेच राहू द्या.
५. केस धुवा :- नंतर केस सौम्यशाम्पूने शाम्पुने स्वच्छ धुवा.
आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय केल्यास केसांची वाढ, मजबुती आणि घनता सुधारण्यास मदत होईल.