Join us  

मेकअप करताना 'ही' गोष्ट विसरलात, तर मुळीच मिळणार नाही परफेक्ट लूक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 2:56 PM

बऱ्याच जणी मेकअप करण्यात फार काही एक्सपर्ट नसतात किंवा काही जणींना अगदीच गरजेपुरता कधीतरी मेकअप करायचा असतो. पण कधीतरी होणारा हा मेकअप नेमका फसतो आणि चेहरा अगदी पावडरचे थर चढविल्यासारखा पांढरट दिसू लागतो. तुम्हीही ही गोष्ट अनुभवली असेलच. ही गोष्ट टाळायची असेल, तर अशा पद्धतीने मेकअप करा.

ठळक मुद्देडोळ्यांच्या भोवती असणाऱ्या सुरकुत्या लपविण्यासाठी प्रायमर आणि क्लिंजर एकत्रितपणे लावण्याचा सल्ला दिला जातो.प्रायमर लावल्यामुळे मेकअप अधिक काळ तसाच राहतो.

मेकअप करायचा म्हणजे मॉईश्चरायझर, फाउंडेशन आणि कॉम्पॅक्ट एकानंतर एक चेहऱ्यावर लावायचे आणि मग आवडीनुसार लिपस्टिक, काजळ आणि टिकली लावून तयार व्हायचे, हा विचार अनेक जणींच्या डोक्यात अगदी पक्का असतो. पण इथेच तर सगळी गडबड होते. अशा पद्धतीने केलेला मेकअप अनेकदा तुम्हाला हवा तसा लूक देऊ शकत नाही. उलट चेहरा आणखीनच खराब होऊ लागतो.  असे होण्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे मेकअपचा बेस समजले जाणारे प्रायमर लावायला आपण विसरलेले असतो. त्यामुळेच मेकअप करताना प्रायमर लावणे अतिशय गरजेचे आहे. 

 

प्रायमर का लावावे ?१. मेकअपचा सगळ्यात मुख्य भाग म्हणजे योग्य पद्धतीने प्रायमर लावणे. प्रायमर लावल्यामुळे त्वचेवरची जी छिद्रे किंवा पोअर्स असतात, तिचा आकार कमी होऊन ती झाकली जातात आणि चेहऱ्यावर मेकअप चांगल्या पद्धतीने  सेट होतो. २. प्रायमरचा सगळ्यात मोठा उपयोग म्हणजे त्यामुळे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि चेहऱ्यावरचे काळे डाग, व्रण देखील झाकले जातात. चेहऱ्यावरील पिंपल्सचे लाल डागही प्रायमर लावल्याने कमी दिसू लागतात. ३. त्वचेला अतिशय स्मुथ बनविण्याचे काम प्रायमरद्वारे केले जाते. यामुळे त्वचेचा पोत एकसारखा  दिसू लागतो. यालाच इव्हन टोन स्कीन म्हणतात. कपाळ, गाल, हनुवटी अशी सगळीच त्वचा एकसारखी दिसू लागते. मेकअप केल्यावर अनेक जणींचा चेहरा भुरकट दिसू लागतो. पण योग्य पद्धतीने प्रायमर लावले तर असे होत नाही. ४. प्रायमरद्वारे त्वचेला संरक्षणही मिळते आणि त्वचा अधिक ग्लो करू लागते. 

 

प्रायमर लावण्याची योग्य पद्धत१. सगळ्यात आधी फेसवॉश किंवा क्लिंजर लावून चेहरा स्वच्छ धुवून घ्या.२. चेहरा कोरडा केल्यानंतर त्यावर माॅईश्चरायझर लावा. दिवसा मेकअप करायचा असेल तर मॉईश्चरायझर लावल्यानंतर सनस्क्रीन लोशनही लावावे. ३. यानंतर हातावर अगदी थोडे म्हणजे साधारण ५ ते ६ थेंब प्रायमर घ्या. हाताच्या पहिल्या बोटाने कपाळ, नाक, गाल, ओठांच्या दोन्ही टोकांजवळचा भाग, हनुवटी या भागात प्रायमर लावून घ्या. ४. यानंतर साधारण एखादा मिनिट चेहऱ्यावर काहीच लावू नका. त्यामुळे प्रायमरला चेहऱ्यावर सेट व्हायला योग्य वेळ मिळेल. ५. यानंतर फाउंडेशन लावून तुम्हाला हवा तसा मेकअप करा. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समेकअप टिप्समहिला