Join us  

कसली सुंदर दिसतेस अशी कॉम्प्लिमेण्ट मिळवून देणारी ही घ्या जादू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 3:56 PM

कधीतरी आपल्याला वाटतं की आज आपण मस्त दिसतोय, त्यादिवशी नेमकी कुणीतरी कॉम्प्लिमेण्ट देतं की आज किती सुंदर दिसतेय तू, त्यादिवशी नेमकी काय जादू झालेली असते?

ठळक मुद्देमग आपण आपल्या सौंदर्याला आत्मविश्वासाचा खास टच कधी देणार?

गौरी पटवर्धन

आपण सुंदर आहोत असं आपलं मन आपल्याला का सांगत नाही? याचं अगदी स्पष्ट, खरं आणि प्रामाणिक उत्तर द्यायचं तर ते म्हणजे, आपल्या मनाला हे नीट माहिती असतं, की आपण सुंदर दिसत नाही? आहोत म्हणून ते आपल्याला तसं सांगत नाही. आपलं मन आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही? आणि आपणही आपल्या मनाशी कधीच खोटं बोलत नाही. त्यामुळे आपल्याला आपण जेव्हा खरंच सुंदर वाटतो तेव्हा आपल्याला ते आतून समजतंच आणि ते त्यावेळी आपल्याही चेहेऱ्यावर दिसतं.प्रत्येकीच्या बाबतीत हे ही कधी ना कधी घडलेलं असतं. आपण अगदी नेहेमीचेच कपडे घालतो, नेहेमीसारखंच आवरतो, काहीही वेगळं करत नाही, पण तरीही एखादा दिवस असा येतो जेव्हा सगळा दिवस आपल्याला रँडमली कॉम्प्लिमेंट मिळतात. बस किंवा लोकलमध्ये रोज भेटणारी मैत्रीण, ऑफिसमधली कलीग, शेजारीण असं सहज आपल्याला म्हणतात,“अरे वा, आज एकदम छान दिसते आहेस… आज काय स्पेशल?”

किंवा“छान ड्रेस / साडी / टॉप आहे तुझा… तुला छान सूट होतोय.”किंवा“कुठून घेतलीस गं साडी? कितीला? फारच सुंदर आहे”आपण हसून, खूश होऊन ती कॉम्प्लिमेंट घेतो पण मनात येतंच, “अहो काकू / आजी / ताई… ही साडी? पाच वर्षांपूर्वी घेतलेली आहे. पाच वर्षात मी ती किमान दहा वेळा नेसले आहे. त्यापैकी किमान दोन वेळा तुम्हाला भेटले आहे. त्यावेळी तुम्हाला दिसली नाही का ही साडी?”तर त्या वेळी काय आणि आत्ता काय… त्यांनी नुसती साडी किंवा ड्रेस बघितलेलाच नसतो. तर त्यांना आपल्याकडे एकूण बघून असं वाटलेलं असतं की आपण सुंदर दिसतोय. आणि खरं सांगायचं तर बहुतेक वेळा त्या दिवशी आपल्यालाही तयार होताना असं वाटत असतं, की आज मला छान वाटतंय, हा रंग मला छान दिसतो, आज केस छान सेट झालेत किंवा बांधले गेलेत. एखाद्या दिवशी सगळं छान जमून येतो तो तो दिवस असतो. आपल्याला आतून स्वतःच्या दिसण्याबद्दल छान वाटतं आणि मग ते आपल्या चेहेऱ्यावर दिसतं. मग इतरांनाही आपण सुंदर वाटतो.मग प्रश्न असा येतो, की एरवी आपण तेच कपडे घालतो किंवा तसेच आवरून सावरून बाहेर पडतो, मग एरवी असं का होत नाही. तो काय फॅक्टर असतो ज्याच्यामुळे आपण सुंदर दिसतो किंवा दिसत नाही. तर त्यातला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर म्हणजे आत्मविश्वास!“ही लिपस्टिक फार गॉडी आहे का?”“काजळ जरा जास्त लागलंय का?”“या इयर रिंग्ज घेतांना तर फॉर्मलवर जातील म्हणून घेतल्या, पण आता त्या जरा जास्त फेस्टिव्ह वाटतायत का?”“ही साडी या फंक्शनला फार साधी आहे का?”“हा कलर मला सूट होत नाही असं वाटतंय.”असे अनेक विचार आपल्या मनात स्वतःबद्दल येत असतात. आणि हे विचार आपलं दिसणं तर बदलू शकत नाहीत, पण ते दुसरी एक गोष्ट नक्की करतात आणि ते म्हणजे आपला आत्मविश्वास डळमळीत करतात. मात्र तआत्मविश्वास चेहऱ्यावर आला की आपण सुंदर दिसायला लागतो.मग आपण आपल्या सौंदर्याला आत्मविश्वासाचा खास टच कधी देणार?

टॅग्स :ब्यूटी टिप्स