Join us  

लोफर्स, पीव्हीसी आणि चंकी प्लॅटफाॅर्म? चप्पल-बुटांचे स्टायलिश प्रकार- फुटवेअर फॅशनचा नवा ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2022 4:39 PM

उन्हाळ्यात कोणते चप्पल-बूट घालावे याचा फारसा विचार केला जात नाही, पण पायांची काळजी घेणं महत्त्वाचं, निवड योग्य करा.. trendy footwear fashion

ठळक मुद्देप्रियंका चोप्राची पीव्हीसी सॅंडल व कंगना राणावतचे लोफर्स प्रकारचे जोडे चर्चेत असतातच. 

पावसाळी चप्पलचा आपण विचार करतो, तशी खरेदीही करतो. पण उन्हाळ्यात काय? कुठलेही चप्पल चालते, त्यातून मग पाय सुजतात. दुखतात. फॅशनचा विचार बाजूला ठेवलाच तरी तब्येतीचा विचार करायलाच हवा. त्यातही आता तर फुटवेअर फॅशनचाच भाग झाल्यानं आपल्या स्टाईलचा विचार करताना आपण पायात काय घालतो याकडेही बारकाईने पाहिले पाहिजे. कपड्यांप्रमाणेच शूज किंवा फूटविअरमध्येही जुनेच, क्लासिक ट्रेंड्स किंवा अगदी सत्तरच्या दशकातल्या फॅशनही नव्याने इन होताना दिसणार आहेत. प्रियंका चोप्राची पीव्हीसी सॅंडल व कंगना राणावतचे लोफर्स प्रकारचे जोडे चर्चेत असतातच. 

काय आहेत सध्या चर्चेत?

(Image : Google)

लोफर्स - हा शब्द जरी विनोदी भासत असला तरी हा प्रकार आहे आरामदायी. पूर्वी लोफर कुणी उन्हाळ्यात घालत नसत. पण आता उन्हाळ्यासाठी खास फॅब्रिक लोफर्सही मिळतात. जर फार चालायचं नसेल तर अनेकजणी नॉर्मल लोफर्सही घालतात. त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर उन्हाळ्यात लोफर्स घालू नयेत असा काही नियम नाही.

(Image : Google)

पीव्हीसी सॅण्डल्स - महिला/युवतींसाठी हा बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. पीव्हीसी सॅण्डल्स ट्रेंडने जोरदार कमबॅक केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या सॅण्डल्स प्लास्टिकच्या असल्या तरी स्टायलिण लूक देतात. मात्र सॅंडल निवडताना काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा तुमच्या पायांसाठी ते त्रासदायक ठरु शकते.

(Image : Google)

टो रिंग सॅण्डल्स- उन्हाळ्यात या सँडल्स उत्तम.  भरपूर पट्टे असल्यामुळे या सॅण्डल्सचा लूक जरा ग्लॅमरस, फंकी,ट्रेंडी दिसेल.

(Image : Google)

मोठे चंकी प्लॅटफॉर्म सॅण्डल्स - ७० च्या दशकात या सॅण्डल्स लोकप्रिय झाल्या होत्या. यांचा प्लॅटफॉर्म जरी मोठा, उंच असला तरी तुम्हाला कम्फर्टशी तडजोड करावी लागत नाही हे विशेष. ड्रेसेस, स्कर्ट्सवर तुम्ही सहज ट्राय करु शकता.

टॅग्स :फॅशन