Join us  

आपण खूपच बारीक आहोत असा कॉम्प्लेक्स आहे? ‘वजनदार’ भारदस्त दिसण्यासाठी करायच्या ८ गोष्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 3:05 PM

बारीक स्त्रियांचंही बॉडी शेमिंग सर्रास होतं, ते चूकच आहे. काहीजणींना त्यातून आपल्या दिसण्याचा भयंकर कॉम्प्लेक्स येतो, तो मनातून काढायलाच हवा.

ठळक मुद्देकेलं तर बारीक मुलींनी, कोणत्या प्रकारचे कपडे घातले तर त्या जरा वजनदार, भारदस्त दिसतील?

श्रावणी बॅनर्जी

वजन वाढण्याची केवढी चर्चा. आता लॉकडाऊनमध्ये तर फारच.  पण बारीक, लूकडय़ासुकडय़ा  माणसांचं काय? त्यांनाही लोक चिडवतात. बॉडी शेमिंग होतंच.  नावं ठेवली जातात. टोमणे मारले जातात. कुपोषित म्हंटलं जातं. आणि कुठलेही कपडे घातले तरी हँगर म्हणून लोक हसतातच. या बॉडी शेमिंगचा कंटाळा येतो. पण तरीही काय? केलं तर बारीक मुलींनी, कोणत्या प्रकारचे कपडे घातले तर त्या जरा वजनदार, भारदस्त दिसतील?आता ही समस्या वाचूनही कुणाला हसू येईल की, बारीक आहे तर त्याचं काय वाईट वाटायचं. पण लोक नावं ठेवतात बारीक मुलींना, त्यांची लग्न नाही होत असंही दिसतं. खरंतर स्लिम माणसं जगात अगदीच कमी असावीत की काय असं वाटावं अशी आजूबाजूची परिस्थिती आहे. ‘इससे छोटा साईज नहीं है’ असं म्हणत स्मॉल साईज ड्रेस आपल्यासमोर हताशपणो टाकणाऱ्या सेल्समनचा राग येतो. इतके मोठ्या साइजचेच कपडे हल्ली रेडिमेड मिळतात.पण मग यावर उपाय काय?

...तर काही गोष्टी लक्षात ठेवायच्या.

१.  कपडे शिवताना आपल्या कुर्ते, शर्ट यांना   शोल्डर पॅड ॲड करून घ्यावेत. खांदे चांगले रुंद दिसतील अशा पद्धतीनं कपडे शिवावेत. त्यासाठी हे शोल्डर पॅड फार उपयोगी दिसतात.२. स्लिम मुलींनी शक्यतो स्लिव्ह्जलेस ड्रेसेस घालू नयेत. त्यामुळे दंड अजूनच बारीक दिसतात. त्याऐवजी पफ स्लिव्हज वापराव्यात.  बाह्या प्लेन रंगापेक्षा त्यावर काही टेक्श्चर, प्रिण्ट असावेत. कंबरेला घट्ट बेल्ट लावणं टाळावं. आवळून पट्टा बांधल्यानं कंबर आणखीनच बारीक दिसते.३. ड्रेसचं कापड असं पाहिजे जे थोडं फुगीर दिसेल, फुलेल. अंगाला चिकटणारे कपडे मुळीच घालू नयेत. कॉटन, कॉरड्री, वूल, लिनन, प्युअर सिल्क, ऑरगांझा, वेल्वेट, ब्रॉकेड, या फॅब्रिकचे कपडे शक्यतो वापरावेत.४. उन्हाळा नसेल तेव्हा लेअरिंगचा फायदा होवू शकतो. आतून टी शर्ट घालून, त्यावरुन एखादा चेक्सचा शर्ट घालायचा. दिसतोही ट्रेण्डी आणि थोडं जाडही झाल्यासारखं वाटतं. नाहीतर रुंद शोल्डर्सची जॅकेट घालायलाही हरकत नाही. ५. आपण बारीक आहोत त्यामुळे ढगळे कपडे घातले तरी चालतात, किंवा ढगळेच कपडे घालायला पाहिजेत असा काही मुलामुलींचा चुकीचा समज आहेच. पण ढगळेही घालू नयेत त्यानं गबाळे दिसतात. काठीला कापड गुंडाळावं आणि बोंगा व्हावा असं काहीतरी दिसतं. तुम्हाला तुमच्या लूकडेपणाचा काहीतरी कॉम्प्लेक्स आहे असा मेसेजही त्यातून जातोच. तेव्हा तसं करू नका. मापाचे, उत्तम फिटिंगचे कपडे शिवा.६. ज्या मुलींना आपल्या बारीक असण्याचा फारच जास्त कॉम्प्लेक्स आहे त्यांनी चुडीदारच्या ऐवजी सलवार, पटियाला हे प्रकार जास्त वापरावेत.७. बारीक प्रिण्टचे कपडे शक्यतो वापरू नका. त्याऐवजी बोल्ड प्रिण्ट्स वापरा. पेस्टल किंवा डार्क कलर्स आणि मीडीयम प्रिण्ट असं कॉम्बिनेशनही चांगलं दिसतं.८. मनगटावर मोठ्ठाली घडय़ाळं, मोठय़ा बॅगा, बेल्ट्स, गळ्यातले, कानातले वापरू नका. ते तुमच्या देहापेक्षा मोठे दिसतात, आणि मग त्यात तुम्ही अजून बारीक दिसता.

टॅग्स :फॅशन