Join us  

केस धुतले की फरशीवर केसच केस? शाम्पूमध्ये मिसळा १ नैसर्गिक जेल; केस होतील घनदाट-करतील शाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2024 10:15 AM

Is Aloe Vera Shampoo Good For Hair : लांब आणि दाट केसांसाठी कोणत्या पद्धतीने केस धुवायला हवे?

प्रत्येकाला घनदाट सुंदर केस हवे असतात (Hair Care Tips). पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांचे प्रचंड नुकसान होते. काही लोक केसांची निगा राखण्यासाठी विविध प्रकारचे कॉस्मेटिक, तेल आणि शाम्पूचा वापर करतात (Hair Growth). पण काही वेळेला या कॉस्मेटिक हेअर केअर प्रोडक्ट्समुळे, केसांवर दुष्परिणामही दिसून येतात. केमिकल बेस्ड प्रोडक्ट्समुळे केस कमकुवत होतात आणि झपाट्याने गळू लागतात. ज्यामुळे टक्कल पडण्याची देखील भीती मनात येते. काही वेळेला शाम्पू करूनही केस फ्रिझी राहतात.

केसांवरची शाईन कमी होते. शिवाय केस धुतल्यानंतर ते गळतात हे वेगळच. केस गळू नये, शिवाय धुतल्यानंतर शाईन करावे असे वाटत असेल तर, शाम्पूमध्ये चमचाभर एलोवेरा जेल मिक्स करा. यामुळे केस धुतल्यानंतर शाईन करतील, शिवाय केस गळतीही थांबेल(Is Aloe Vera Shampoo Good For Hair).

नारळ पाणी की लिंबू पाणी? उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी कोणते पेय पिणं उत्तम? तज्ज्ञ सांगतात..

केस धुताना एलोवेरा जेलचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात २ मोठे चमचे एलोवेरा जेल घ्या. त्यात शाम्पू घालून ब्लेंड करून घ्या. आता एका बाऊलमध्ये तयार शाम्पू काढून घ्या, व थेट केसांवर याचा वापर करा. नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केस गळती, केसात कोंडा, अकाली केस पांढरे होणे यासह इतर केसांच्या समस्या सुटतील. आपण या शाम्पूचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता.

पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

केसांवर कोरफडीचे फायदे

एलोवेरा जेलमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. त्यातील घटक केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात. केसांवर याचा वापर केल्याने केसांना पोषण मिळते. अँटी-डँड्रफ गुणधर्म असतात. शिवाय व्हिटॅमिन बी1, बी2, बी6 आणि बी12 सारखे घटक असतात जे केसांची वाढ वाढवतात.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स