Join us  

दात पिवळट-हिरड्या काळ्या झाल्या? 'या' घरगुती पावडरनं दात घासा-मोत्यासारखे चमकतील दात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 2:21 PM

How To Make Teeth Whitening Powder At Home : या घरगुती उपायांच्या वापराने दातांचा पिवळेपणा दूर होईल आणि दातांवर नॅचरल चमक येईल. (Teeth Whitening Powder For Removing Yellowness Of Teeth)

दातांचा पिवळे दिसू नयेत, पांढरेशुभ्र दिसावेत असं प्रत्येकालाच वाटतं. जर दात पिवळे असतील तर तुम्हाला चारचौघात तोंडही उघडता येत नाही. दोन दिवसांतून एकदा ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो. काही सोप्या टिप्स फॉलो करून दात चमकवू शकता. दातांना चमकवण्यासाठी नेहमीच ५ ते १० हजार रूपये खर्च करून महागड्या ट्रिटमेंट्स घ्यायला हव्यात असं काही नाही. (How To Make Teeth Whitening Powder At Home)

वेब एमडीच्या रिपोर्टनुसार दातांचा काळेपणा काढून टाकण्यासाठी ऑईल पुलिंग, ब्रशिंग फ्लोसिंग, बेकिंग सोड्याचा वापर फायदेशीर ठरतो. याव्यतिरिक्त हायड्रोजन पेरॉक्साईड, एपल सायडर व्हिनेगर, हळद हा सुद्धा उत्तम पर्याय आहे.  या घरगुती उपायांच्या वापराने दातांचा पिवळेपणा दूर होईल आणि दातांवर नॅचरल चमक येईल. (Teeth Whitening Powder For Removing Yellowness Of Teeth)

दात चमकवण्यासाठी पावडर कशी तयार करावी?

दात पिवळे असतील आणि अनेकदा प्रयत्न केल्यानंतर पांढरे होत नसतील तर तुम्ही घरात टिथ व्हाईटनिंग पावडर तयार करा. यासाठी १ चमचा लवंगाची पावडर घ्या. १ चमचा काळं मीठ घ्या, १ चमचा मुलेठी पावडर, १ चमचा दालचिनी पावडर घ्या, सुकलेले कडुलिंबाची पानं आणि पुदिन्याची पानं आवश्यक असतील. हे पदार्थ भरून मिक्स एका डब्यात स्टोअर करा. 

टिथ व्हाईटनिंग पावडर कशी यूज करावी?

टिथ व्हाईटनिंग पावडर तुम्ही टुथपेस्टला लावून दातांवर हलक्या हाताने मसाज करा त्यानंतर गुळण्या करा. यामुळे दातांची चमक परत येण्यास मदत होईल. यामुळे कॅव्हिटीजपासून बचाव होईल आणि त्यानंतर ती प्रोसेस रिपीट करा ज्यामुळे दात स्वच्छ राहण्यास मदत होईल. 

या गोष्टींची काळजी घ्या

१) सकाळी उठल्यानंतर आणि रात्री उठल्यानंतर ब्रश करायला विसरू नका. 

२)  जेवल्यानंतर गुळण्या करायला विसरू नका  ज्यामुळे दातांवर लेअर्स येणार नाहीत. 

३) गुळण्या केल्यानंतर कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करा. 

४) ब्रश हलक्या हाताने रगडा. ज्यामुळे हिरड्या चांगल्या राहतील. 

५) कडुलिंबाची काड्यांच्या पावडरचा वापर करून साफ करा.

६) २ दातांच्यामध्ये घाण जमा झाली असेल तर साफ-सफाई करण्यासाठी डेंटल फ्लॉस करा.