Join us  

आंघोळीच्या पाण्यात मिसळा '४' पैकी '१' गोष्ट, दिवसभर राहाल कूल-फ्रेश; घामोळ्यांचा त्रास होईल छूमंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 10:00 AM

How To Have The Perfect Summer Bath : उन्हाळ्यात लगेच अंग चिपचिपित होत असेल तर, आंघोळ करताना पाण्यात ४ पैकी १ गोष्ट घाला..

उन्हाळ्यात आपले शरीर तापते, कडक उन्हात बाहेर गेल्यानंतर अंग चिपचिपित होते (Summer Special). ज्यामुळे अंगावर घामोळ्या, रेड रॅशेस निर्माण होतात. या कारणामुळे आपल्याला वारंवार आंघोळ करण्याची इच्छा होते (Summer Bath). कारण आंघोळीनंतर शरीर फ्रेश तर होतेच, शिवाय बॅक्टेरिया आणि जंतूपासून मुक्ती मिळते (Fresh). पण दिवसभरात आपण सतत आंघोळ करू शकत नाही.

शिवाय उन्हाळ्यात आंघोळ केल्यानंतर फ्रेशही वाटेल असेही नाही. दिवसभरात ताजेतवाने व फ्रेश राहायचं असेल तर, आंघोळच्या पाण्यात या '४' गोष्टी मिसळून आंघोळ करा. ज्यामुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटेल. मुख्य म्हणजे घामोळ्यांचा त्रास होणार नाही(How To Have The Perfect Summer Bath).

तुरटी

आपण आंघोळीच्या पाण्यात तुरटी घालू शकता. तुरटीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. जे त्वचेला अनेक इन्फेक्शनपासून दूर ठेवतात. शिवाय त्वचेमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी देखील उपयुक्त ठरते.

आंबा पाण्यात न भिजवता खाताय? आरोग्य बिघडेल! आंबा खाण्यापूर्वी किती वेळासाठी भिजत ठेवावा?

सैंधव मीठ

आपण आंघोळीच्या पाण्यात रॉक मीठ घालू शकता. आपल्याला दिवसभर फ्रेश ठेवण्यासाठी रॉक मीठ उपयुक्त ठरते. मुख्य म्हणजे यामुळे शरीराची दुर्गंधी दूर होते. आपण आंघोळीचे पाणी थोडे कोमट करून त्यात रॉक मीठ घालून मिक्स करू शकता.

हळद

हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. त्यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग सारखे गुणधर्म असतात. ते पाण्यात मिसळून आंघोळ केल्यास, थकवा आणि खाज सुटणे इत्यादीपासून सुटका मिळेल. याशिवाय पुरळ, मुरुम, टॅनिंग यासारख्या त्वचेच्या समस्याही दूर होतील.

चहाशिवाय चैन पडत नाही आणि चहाने ॲसिडिटी होते? चहा पिण्याआधी प्या १ गोष्ट'; त्रास बंद

कडुलिंबाची पानं

कडुलिंबाच्या पानांचा वापर करून त्वचेच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. त्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने किंवा कडुलिंबाचे तेल मिसळा. यामुळे मुरूम, खाज, घामोळ्यापासून सुटका होईल.

टॅग्स :समर स्पेशलब्यूटी टिप्स