Join us  

नो मेकअप लूक, हा ट्रेंड आहे तरी काय.. जे अनुष्का शर्माला जमतं ते तुम्हालाही जमेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 7:55 PM

भाजी आणायला किंवा चक्कर मारायला जरी घराबाहेर जायचे असेल, तरी तरूण मुली आणि महिला कमीतकमी चार ते पाच वेळा आरशात डोकावून पाहतात. दुसरीकडे मात्र अनुष्का शर्मा, आलिया भट यासारख्या मोठमोठाल्या सेलिब्रिटीज चक्क नो मेकअप लूकचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल करतात. नो मेकअप लूक असूनही या हिरॉईन्स इतक्या सुंदर कशा बरे दिसतात ?

ठळक मुद्देनो मेकअप लूक मध्ये खरोखरच मेकअप करायचा नाही, असे काही नसते.यामध्ये मेकअप अत्यंत सौम्य पद्धतीने केला जातो. जेणेकरून तुम्ही सुंदर तर दिसताच पण त्यासोबतच तुम्ही मेकअप केला आहे, असे बघणाऱ्याला जाणवतही नाही.

मेकअप करणे हा बहुतांश स्त्री वर्गाचा आवडता छंद. यामध्ये डिस्टर्ब केले तर त्यांना अजिबात आवडत नाही. पण आता मात्र नो मेकअप लूक नावाचा एक भलताच ट्रेण्ड आला आहे. नुकत्याच आई झालेल्या अनुष्का शर्मानेही तिचे नो मेकअप लूकचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. आता मुळात नो मेकअप लूक ऐकताच आपल्याला आपला घरातला विना मेकअपचा चेहरा आठवतो आणि प्रश्न पडतो की मेकअप न करता या हिरोईन्स एवढ्या सुंदर दिसतात तरी कशा ?तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल, तर नो मेकअप लूकचे हे टॉप सिक्रेट नक्कीच जाणून घ्या. तुम्हीही हा लूक ट्राय करा आणि तुमचेही नो मेकअप लूकचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होऊ द्या...

 

असा करा नो मेकअप लूक१. सगळ्यात आधी तुमच्या आवडीचे कोणतेही क्लिंजर वापरून तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या. कारण यामुळे चेहऱ्यावरील सर्व घाण, धुळ निघून जाईल आणि त्वचा फ्रेश होईल.२. स्वच्छ धुतलेल्या चेहऱ्याला ओलावा देण्यासाठी आणि त्वचेचा पोत सांभाळण्यासाठी मॉईश्चरायझर लावून घ्या. मेकअपदरम्यान लावल्या जाणाऱ्या केमिकल्सचा त्वचेवर विपरित परिणाम होऊ नये म्हणून, कोणत्याही मेकअपच्या आधी चेहऱ्याला मॉईश्चराईज करणे गरजेचे असते. ३. मॉईश्चरायझर लावल्यानंतर चेहऱ्याला एकसमान लूक देण्यासाठी प्रायमर लावून घ्या. कपाळ, गाल, हनुवटी या सगळ्या भागात एका समान लेयरमध्ये प्रायमर लागले जाईल, याची काळजी घ्यावी.४. नो मेकअप लूक करताना फाउंडेशन लावण्याची गरज नाही. जर लावयचेच असेल तर लाईट किंवा मिडियम कव्हरेज देणारे फाउंडेशन वापरावे. फाउंडेशनऐवजी तुम्ही सनस्क्रीन लोशन किंवा बीबी किंवा सीसी क्रिमही वापरू शकता. ५. यानंतर आता अगदीच हलक्या हाताने कॉम्पॅक्ट पावडर लावा. आपण नो लूक मेकअप करतोय, त्यामुळे पावडरचा वापर कुठेही जास्त होणार नाही, याची काळजी घ्या. 

६. तुमच्या स्कीन टोनमध्ये अगदी सहजपणे मिसळून जाईल, अशी शेड ब्लशसाठी निवडा.७. डोळ्यात हलकेच काजळ घाला. ब्लॅकऐवजी ब्राऊन किंवा ग्रे कलरचे काजळ घाला. तसेच वरच्या आणि खालच्या पापण्यांना मस्कारा लावा. न्यूड कलरचे आयशॅडो लावू शकता.८. आता सगळ्यात शेवटचा आणि तेवढ्याच महत्त्वाचा पार्ट म्हणजे लिपस्टिक. नो मेकअप लूक करताना तुमची लिपस्टिक न्यूड शेडच असली पाहिजे. न्यूड शेड लिपग्लॉस असेल तर सर्वोत्तम. 

टॅग्स :ब्यूटी टिप्समहिलामेकअप टिप्स