Join us  

सिझलिंग सेल्फी काढायचेत, सेल्फीतही सुंदर दिसायचं? त्यासाठी वापरा सुपर सेल्फी ब्युटी टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 2:35 PM

सगळ्यांचे सेल्फी खूप भारी येतात, आपल्यालाच का बरं जमत नाही मस्त सिझलिंग सेल्फी काढायला, असं वाटतंय का तुम्हाला ?... मग या काही सेल्फी टिप्स फॉलो करा. तुमचा सेल्फी पाहून सगळेच म्हणतील वॉव !!

आज काल जोपर्यंत आपण सेल्फी घेत नाही, तोपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाचे सेलिब्रेशन पुर्ण होत नाही. कार्यक्रमालाच सेल्फी घ्यायचा असाही नियम आता राहिलेला नाही. पावसाचे दिवस आहेत ?, मग घ्या पावसासोबत सेल्फी, मस्त वाफाळता चहा केलाय? मग होऊन जाऊ द्या चहाच्या कपासोबत सेल्फी, शॉपिंग केलीये ? मग आणखी एक सेल्फी, मैत्रिणींना भेटता आहात ?, मग तर भरपूर सेल्फी, कुठे फिरायला गेलात की मग तर सेल्फीचा मोठ्ठा पूर....असं काहीसं सेल्फीच झालं आहे.

 

म्हणून तर आज प्रत्येकालाच सेल्फी चांगल्या प्रकारे काढता येणं जणू कंम्पलसरीच झालं आहे. जो पर्यंत सेल्फी चांगला येत नाही, तोपर्यंत आपल्या आयुष्यातले हॅपनिंग इव्हेंट्स सोशल मिडियावर शेअर करता येत नाहीत. त्यामुळे मग फारच पंचाईत होऊन जाते. त्यामुळे जर आपला सेल्फीही एकदम भारी यावा आणि त्याला भरपूर साऱ्या लाईक्स मिळाव्यात असं वाटेत असेल तर या काही सेल्फी टिप्स फॉलो करा..

१. सेल्फी काढताना ओठ एकदम घट्ट मिटून हसू नका. हसताना दातांचा काही भाग दिसू द्या. त्यामुळे तुम्ही ओढून ताणून हसताय असं वाटत नाही आणि तुमचा एकदम नॅचरल लूक येतो. मात्र हसताना सगळीच बत्तिशी दिसायला नको, याचीही काळजी घ्या.

 

२. सेल्फी काढताना मान छानपैकी मोल्ड करता आली पाहिजे. मान थोडीशी एका बाजूने झुकू द्या. कारण एका बाजूने काढलेले फोटो अधिक छान दिसतात. मान जर थोडी वाकवली तर चेहरा अधिक सुबक दिसू शकेल. 

३. आपण कसे हसलो की अधिक चांगले दिसतो, हे एकदा स्वत: आरशासमोर उभे राहून तपासून पहा. ज्या स्माईलमध्ये आपण बेस्ट दिसतो, ती स्माईल सेफी काढताना ठेवा.

 

४. सेल्फी क्लिक करताना उजेड तुमच्या चेहऱ्यावर आणि कॅमेऱ्याच्या मागून यायला हवा. कमी उजेडात काढलेला सेल्फी आकर्षक दिसत नाही. 

५. आपला फोटो कोणत्या अँगलने जास्त चांगले येतात ते प्रत्येकाला माहित असतं. सेल्फी क्लिक करताना ते लक्षात ठेवा.

६. तुमच्या फोटोला एकाद्या फोटो ॲप मध्ये एडिट करा. इन्स्टाग्राम, पिक्सलरओमॅटिक, स्नॅपसीड अशा ॲप्समध्ये तुम्हाला छान इफेक्टस मिळतील.

 

टॅग्स :ब्यूटी टिप्ससेल्फी