Join us  

लिपस्टिकची कोणती शेड आपल्यासाठी योग्य? स्किनटोनप्रमाणे अशी निवडा परफेक्ट शेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 3:53 PM

फार मेकअप नाही केला तरी चालतो. फक्त थोडेसे कॉम्पॅक्ट आणि डोळ्यांवर हलक्या हाताने फिरवलेले काजळ एवढाच मेकअप असला तरी त्याला हटके लूक देण्याचे काम तुमच्या स्किनटोन नुसार निवडलेली लिपस्टिक अगदी परफेक्ट करू शकते.

ठळक मुद्देथोडासा बदल करा आणि लिपस्टिकचा नवा शेड ट्राय करा. यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्यात एक वेगळाच बदल झाल्याचे जाणवू लागेल. लिपस्टिकची निवड करताना तुमच्या स्किनटोन प्रमाणेच तुमचे वय किती, चेहऱ्याचा आकार कसा आहे, तुम्ही कुठे जाताना लिपस्टिक लावत आहात तसेच तुम्ही दिवसा लिपस्टिक लावणार आहात की रात्री या सगळ्याच गोष्टींचा विचार करा

लिपस्टिक म्हणजे कॉलेजगोईंग तरूणींपासून ते वयस्कर महिलांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय.  ऑफिसला जायचे असो किंवा एखाद्या पार्टीला, सहज चक्कर मारायला कुठे जायचे असो किंवा घरी कुणी पाहूणे येणार असो. कोणत्याही प्रसंगी तयार होताना ओठांवरून लिपस्टिक फिरविल्याशिवाय अनेक जणींना चैन पडत नाही. लिपस्टिकची एवढी सवय झालेली असली तरीही आपल्या स्कीनटोननुसार लिपस्टिकची कोणती शेड निवडायची किंवा कोणत्या प्रकारची लिपस्टिक लावायची याबाबत अनेक जणी प्रचंड कनफ्युज्ड असतात. म्हणूनच तुमच्या लूकला अधिक स्टायलिश बनविण्यासाठी आणि ओठांचे सौंदर्य वाढवून तुमचे व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी स्किन टोनप्रमाणे लिपस्टिकची निवड कशी करता येते ते पाहूया. 

अनेकजणी तर त्यांचा लिपस्टिकचा ब्रॅण्ड आणि लिपस्टिकची शेड याबाबत प्रचंड पझेसिव्ह असतात.  लिपस्टिकच्या शेडमध्ये बदल करणे त्यांना अजिबात आवडत नाही. म्हणून वर्षानुवर्षे एकाच प्रकारची आणि एकाच शेडची लिपस्टिक लावणाऱ्याही अनेक महिला आहेत. पण मैत्रिणींनो थोडासा बदल करा आणि लिपस्टिकचा नवा शेड ट्राय करा. यामुळे नक्कीच तुम्हाला तुमच्यात एक वेगळाच बदल झाल्याचे जाणवू लागेल. लिपस्टिकची निवड करताना तुमच्या स्किनटोन प्रमाणेच तुमचे वय किती, चेहऱ्याचा आकार कसा आहे, तुम्ही कुठे जाताना लिपस्टिक लावत आहात तसेच तुम्ही दिवसा लिपस्टिक लावणार आहात की रात्री या सगळ्याच गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे.

१. रंग उजळ असल्यास अशी लिपस्टिक निवडाउजळ रंगाच्या मुलींना किंवा महिलांना कोणत्याही रंगाची लिपस्टिक सूट होते, असे म्हणतात. हे खरे जरी असले तरी गुलाबी, केशरी असे फ्लुरोसन्ट शेड निवडले तर निश्चितच तुम्ही अधिक छान दिसू शकता. यातही जर वय जास्त असेल तर अधिक डार्क असलेला गुलाबी शेड निवडू नका. पर्पल किंवा वाईन शेडही तुमचेव सौंदर्य वाढवू शकते.

 

२. गव्हाळ रंगासाठी असणारे परफेक्ट शेडपरफेक्ट शेडची निवड केली तर सावळ्या किंवा गव्हाळ रंगाच्या मुलींच्या सौंदर्याला तोड नाही. सावळ्या रंगाच्या मुलींनी ब्राईट पिंक, रेड, डार्क ऑरेंज यासारखे डार्क शेड टाळले पाहिजेत. लावायचेच असतील तर या रंगांच्या सगळ्यात लाईट शेड निवडाव्यात. सावळ्या रंगावर कॉपर ब्राऊन, चॉकलेट ब्राऊन किंवा ब्राऊन शेडमध्ये येणाऱ्या विविध लिपस्टिक तसेच न्यूड शेड, मजेंटा, रोझी पिंक लिपस्टिक अधिक खूलून दिसतात. तुमच्या त्वचेमध्ये सहज मिसळून जाणारे शेड निवडल्यास तुमचा लूक निश्चितच हटके होतो. 

टॅग्स :ब्यूटी टिप्स