Join us  

हॉट टॉवेल ट्रीटमेंट... केसांवर घरच्याघरी जादू करणारी एक सोपी पध्दत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 2:06 PM

केस चांगले ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी ट्रीटेमेण्टच घ्याव्या लागतात, महागडे तेल वापरावे लागतात असं नाही. एक सोपा घरगुती उपायही यासाठी परिणामकारक ठरेल. हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट हा केसांसाठी परिणामकारक उपाय मानला जातो.

ठळक मुद्देगरम टॉवेलमधे केस गुंडाळणं कंवा गरम टॉवेल डोक्याभोवती गुंडाळणं म्हणजे हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट होय.हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त असते.हॉट टॉवेल ट्रीटमेण्टमुळे केसांच्या मुळाचं पोषण होतं.

 केस छोटे असो की लांब ते चांगलेच हवेत . ते काळेभोर, मऊ आणि चमकदार हवेत असं प्रत्येकीलाच वाटां. पण त्यासाठी काही प्रयत्न करतो का हे महत्त्वाचं. केस खराब होणं या समस्येला अनेकींना तोंड द्यावं लागतं. अयोग्य खाण्यापिण्याच्या सवयी, आत्यंतिक तणाव, उन्हाचा परिणाम , केसांवर केलेल्या केमिकल ट्रिटमेण्टचे दुष्परिणाम यामुळे केस खराब होतात. केस चांगले ठेवण्यासाठी किंवा करण्यासाठी ट्रीटेमेण्टच घ्याव्या लागतात, महागडे तेल वापरावे लागतात असं नाही. एक सोपा घरगुती उपायही यासाठी परिणामकारक ठरेल. हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट हा केसांसाठी परिणामकारक उपाय मानला जातो.

 

हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट

हॉट टॉवेल या नावातूनच गरम रुमालाच्या मदतीने हा उपाय करायचा आहे हे लक्षात येतं. गरम टॉवेलमधे केस गुंडाळणं कंवा गरम टॉवेल डोक्याभोवती गुंडाळणं म्हणजे हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट होय. पण हा उपाय करण्याआधी केसांना चांगलं तेल लावून मसाज करणं आवश्यक आहे.केसांना तेलाचा मसाज झाला की आधी टॉवेल गरम पाण्यात भिजवावा. तो पिळून मग केस त्यात गुंडाळावेत. टॉवेल हा पूर्ण डोक्याभोवती गुंडाळलेला असायला हवा याची काळजी घ्यायला हवी. करण तरच टॉवेलद्वारे मिळणारी वाफ ही सर्व केसांच्या मुळांपर्यंत जाऊन केस चांगले होतील.

 

गरम टॉवेलच्या उपायाचे फायदे

*  हॉट टॉवेलने जेव्हा केसांभोवती गुंडाळला जातो तेव्हा केस कोशिका या उघडतत. त्यामुळे केसांना लावलेलं तेल फक्त केसांच्या पृष्ठभागावरच न राहाता ते केसांच्या मुळापर्यंत पोहोचतं. केसांच्या मुळांचं पोषण होतं.

*  हॉट टॉवेलमुळे केसातली घाण निघून जाते. त्यामुळे केस निरोगी होतात.

*  केस गळण्याची समस्या असो की केस पातळ असण्याची हॉट टॉवेलचा उपयोग केसासंबंधित अनेक समस्यांसाठी परिणामकारक आहे.

 

कोरड्या केसांसाठी आवश्यकच!

हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त असते. पण केस जर जास्तच शुष्क असतील तर हा उपाय अवश्य करावा. कारण या उपायामुळे केसांना लावलेलं तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचतं. त्यामुळे केसांचा शुष्कपणा दूर होतो.हॉट टॉवेल हा उपाय परिणामकारक आहे, पण तो कधी करावा हे खूप महत्त्वाचं आहे. हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट परिणामकारक आहे म्हणून ती रोजच करावी असं नाही. रोज हा उपाय करु नये. आठवड्यातुन दोन ते तीन वेळेस हा उपाय करावा. हॉट टॉवेल ट्रीटमेण्टसाठी आधी केसांना तेल लावलेलं असणं आवश्यक आहे.हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट घेण्याचा योग्य मार्ग म्हणजे आधी केस धुवायला हवेत. कारण हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट ही केसांना तेल लावल्यानंतर घेतली जाते. केस खराब असताना किंवा केसात घाण असताना तेल लावणं योग्य नाही. त्यामुळे आधी केस धुवावेत. ते चांगले वाळू द्यावेत. त्यासाठी हेअर ड्रायर वापरु नये. त्यानंतर आपल्या आवडीचं तेल घेवून त्याने केसांच्या मुळाशी मसाज करावा. मसाज करत केसांना तेल लावावं. तेल लावण्याआधी ते थोडं गरम करावं. केसांना तेल लावून झालं की टॉवेल गरम पाण्यात भिजवावा. टॉवेल कडक पिळून घ्यावा. टॉवेल हा ओलसर हवा तो पाण्यानं गच्च ओला असू नये. असा कडक पिळलेला टॉवेल केसांना गुंडाळावा. 10-15 मिनिटं टॉवेल गुंडाळलेला राहू द्यावा. जेव्हा टॉवेल गार झालेला वाटला की तो पुन्हा गरम पाण्यात बुडवून कडक पिळून केसांना गुंडाळावा.

 

दोन नियम पाळाच!

  1. हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट केसांच्या पोषणासाठी आवश्यक उपाय आहे. पण त्याच केसांवर विचित्र परिणाम होवू नये यासाठी हा उपाय करताना काही गोष्टींचे नियम पाळणं आवश्यक आहे. सर्वात पहिला नियम म्हणजे हा उपाय रोज करु नये. हा उपाय केसांचा कोरडेपणा घालवतो हे खरं पण तो जर रोजच केला तर केसांचा कोरडेपणा वाढतो.
  2. हॉट टॉवेल ट्रीटमेण्ट कधीही थेट घेऊ नये. केस धुणे, ते कोरडे होवू देणे, केसांना तेल लावून मसाज करणे या गोष्टी आवश्यक आहे. केसांना लावलेलं तेल केसांच्या मुळापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा उपाय आहे. त्यामुळे जर केसांना तेलच लावलेलं नसलं तर केसांचं पोषण होणार नाही.