Join us  

बोअरवेलच्या पाण्यामुळे केस खूप गळतात? केस गळणं कमी करण्यासाठी २ उपाय करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2024 9:11 AM

How To Reduce Hair Loss Due To Borewell Water: बोअरवेलच्या पाण्यामुळे केस खूप गळत असतील तर हे काही उपाय करून पाहा. (Hair fall due to borewell water)

ठळक मुद्देतुमच्याकडेही बोअरवेलचंच पाणी असेल तर केस धुताना काय काळजी घ्यावी, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही माहिती बघा...

हल्ली बहुतांश लोकांच्या केसांच्या समस्या खूप वाढलेल्या आहेत. काही जणांचे केस खूप गळतात, तर काही जणांच्या डोक्यात खूप कोंडा होतो. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत असल्या तरी केस गळण्याची जी काही कारणं आहेत, त्यापैकी एक कारण म्हणजे बोअरवेलचे पाणी. सध्या बहुतांश घरात बोअरवेलच्या पाण्याचाच वापर केला जातो. त्या पाण्यामध्ये असणाऱ्या अतिरिक्त क्षारांचा परिणाम त्वचेवर आणि केसांवर होतोच (Hair fall due to borewell water). जर तुमच्याकडेही बोअरवेलचंच पाणी असेल तर केस धुताना काय काळजी घ्यावी, याविषयी डॉक्टरांनी दिलेली ही माहिती बघा... (How to reduce hair loss due to borewell water?)

बोअरवेलच्या पाण्याने केस गळू नये म्हणून उपाय

 

१. पहिला उपाय

बोअरवेलच्या पाण्यात असलेल्या अतिरिक्त क्षारांचा त्रास होऊ नये म्हणून हल्ली वॉटर सॉफ्टनर मिळतात. ते सॉफ्टनर तुम्ही तुमच्या नळाला बसवून घेऊ शकता. यामुळे पाणी थोडे सॉफ्ट होण्यास नक्कीच मदत होईल.

कपड्यांवर शाईचे डाग पडले? घरातली 'ही' वस्तू वापरा- डाग कुठे पडला होता कळणारही नाही

२. दुसरा उपाय

बोअरवेलच्या पाण्यामुळे खूप केस गळत असतील तर ते पाणी केस धुण्यासाठी टाळलेले बरे. आंघोळीसाठी ते पाणी वापरले तरी केस धुण्यासाठी मिनरल वॉटर आणा आणि त्यापाण्याने केस धुवा.

 

३. तिसरा उपाय

केस गळणं कमी करण्यासाठी हा एक उपाय करून बघा.

करीना-करिश्मा ते रणबीर कपूर, खवय्या कपूर कुटूंबातले पाहा आगळे पदार्थ- कुणाला काय आवडते?

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला केस धुण्यासाठी जेवढे पाणी लागणार आहे, ते एका पातेल्यात टाकून चांगले खळखळ उकळून घ्या. त्यानंतर कोमट झाल्यानंतर ते पाणी गाळून घ्या आणि मग त्या पाण्याने केस धुवा. असं केल्याने पाणी सॉफ्ट होण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडी