Join us  

Hair Care: केस वाढतच नाहीत? 3 प्रकारे लावा बटाट्याचा रस, बघा कमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 7:26 PM

केस वाढावेत म्हणून अनेक प्रकारचे प्रोडक्टस वापरुन काहीच उपयोग होत नाही असा अनेकींचा अनुभव आहे. पण घरात सहज करु शकाल असा उपाय केला तर केस नक्की वाढतील. हा उपाय म्हणजे केसांना बटाट्याचा रस लावणे. तीन प्रकारे केसांना बटाट्याचा रस लावता येतो.

ठळक मुद्देबटाट्याच्या रसात क्लीन्जींग गुणधर्म असतात.केस पातळ असतील तर केसांना नियमित बटाट्याचा रस लावल्यास केस दाट होण्यास मदत होते.केस कोरडे असतील तर केसांना बटाट्याचा रस लावताना तो कोणत्यातरी तेलात मिसळूनच लावायला हवा.छायाचित्रं:- गुगल

केस निरोगी असतील तर ते वाढतील आणि सुंदरही दिसतील. केस निरोगी आणि सुंदर ठेवण्याचा मार्ग हा नैसर्गिक असला तर उत्तम. हे नैसर्गिक उपाय आपल्या घरात किंवा घराच्याच आजूबाजूला सहज मिळतात. केस वाढावेत म्हणून अनेक प्रकारचे प्रोडक्टस वापरुन काहीच उपयोग होत नाही असा अनेकींचा अनुभव आहे. पण घरात सहज करु शकाल असा उपाय केला तर केस नक्की वाढतील. हा उपाय म्हणजे केसांना बटाट्याचा रस लावणे. सौंदर्य तज्ज्ञ पूनम चुग त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी बटाट्याचा रस लावण्याचा सल्ला देतात. प्रामुख्याने केस वाढावेत म्हणून बटाट्याचा रस खूप उपयोगी पडतो.

 छायाचित्र:- गुगल 

केसांना बटाट्याचा रस लावला तर..

1. बटाट्याच्या रसात क्लीन्जींग गुणधर्म असतात. बटाट्याचा रस केसांच्या मुळांशी लावला तर संसर्गापासून संरक्षण होतं.

2. बटाट्याच्या रसात ब आणि क जीवनसत्त्वं, झिंक आणि लोह असतं. हे घटक केसांच्या मुळांचं पोषण करतात. यामुळे केस वाढतात. बटाट्याच्या रसानं केस नक्की वाढतात पण हळूहळू वाढतात असं सौंदर्य तज्ज्ञ पूनम चुग सांगतात.

3.  केस पातळ असतील तर केसांना नियमित बटाट्याचा रस लावल्यास केस दाट होण्यास मदत होते.

4. केस जर खूपच तेलकट असतील तर बटाट्याचा रस लावल्याने यातील घटक केसांच्या मुळाशी निर्माण होणार्‍या तेलावर नियंत्रण ठेवतात.

5. केस ब्लीच करण्यासाठीही बटाट्याच्या रसाचा उपयोग होतो. पूनम चुग म्हणतात की याचे चांगले परिणाम दिसून येण्यासाठी नियमितपणे बटाट्याचा रस केसांना लावायला हवा.

 छायाचित्र:- गुगल 

बटाटयाचा रस केसांना कसा लावाल?बटाट्याचा रस केसांना लावण्याच्या तीन पध्दती पूनम चुग सांगतात.1. कोरफड जेल आणि बटाट्याचा रस- याप्रकारे बटाट्याचा रस केसांना लावण्यासाठी तीन मोठे चमचे कोरफड जेल आणि तीन मोठे चमचे बटाट्याचा रस घ्यावा. एका भांड्यात कोरफड जेल आणि बटाट्याचा रस एकत्र करावा. नंतर हे मिश्रण सर्वात आधी केसांच्या मुळांना लावावं आणि नंतर पूर्ण केसांना लावावं. जर केसांना लावण्या इतपत हे मिश्रण पुरणार नसेल तर केसांच्या मुळांना लावून झाल्यावर ते फक्त केसांच्या टोकांना लावावं. यामुळे केसांना फाटे फुटण्याची समस्या बरी होते. अर्धा तासानं केस स्वच्छ धुवावेत.

2. नारळ पाणी आणि बटाट्याचा रस- याप्रकारे बटाट्याचा रस केसांना लावण्यासाठी एक ग्लास नारळाचं पाणी आणि एक कप बटाट्याचा रस घ्यावा. एका भांड्यात नारळ पाणी आणि बटाट्याचा रस चांगला एकत्र करावा. हे मिश्रण केसांच्या मुळाशी मसाज करत लावावं. केसांच्या मुळांना हा रस लावून झाला की तो केसांना लावावा. हा रस वाळू द्यावा. तो वाळला की केसांना पावडर लावल्यासारखी दिसते. रस वाळला की केस धुवावेत. यामुळे केसांना छान चमक येते.

3 ऑलिव्ह ऑइल आणि बटाट्याचा रस- यासाठी एक छोटा चमचा ऑलिव्ह ऑइल आणि तीन मोठे चमचे बटाट्याचा रस घ्यावा. एका भांड्यात ऑलिव्ह ऑइल आणि बटाट्याचा रस एकत्र करावा. हे मिश्रण केसांच्या मुळांशी लावावं. त्यानंतर केसांना ते व्यवस्थित लावावं. हे मिश्रण केसांना रात्रभर लावून ठेवावं आणि दुसर्‍या दिवशी केस धुवावेत. जर केस कोरडे असतील तर केसांना बटाट्याचा रस लावताना तो कोणत्यातरी तेलात मिसळूनच लावायला हवा.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स