Join us  

कॉफी प्या आणि चेहेऱ्यालाही लावा, कॉफी फेस पॅकचे 5 फायदे-5 प्रकारे बनवा हा फेसपॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2021 2:28 PM

एक कप कॉफीमुळे शरीराला जसे फायदे होतात तितकेच फायदे एक चमचा कॉफीमुळे त्वचेलाही होतात. तज्ज्ञ सांगतात की कॉफीमधील अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतं. कॉफीचा उपयोग चेहेर्‍यावर फेस स्क्रब किंवा फेस पॅकपुरतीच सीमित नसून कॉफीमुळे त्वचेला निरनिराळे फायदे होतात. या प्रत्येक फायद्यासाठी कॉफी वापरण्याची विशिष्ट पध्दत आहे.

ठळक मुद्देकॉफीच्या उपयोगाने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार होते.कॉफीमधील गुणधर्म त्वचेवर अँण्टि एजिंग सारखे काम करतात.सनस्क्रीन इफेक्टसाठी आणि सुर्याच्या घातक अती नीलकिरणांपासून वाचण्यासाठी एक चमचा कॉफी सनस्क्रीनसारखं काम करते.

कॉफी हे केवळ एक पेय नसून ती एक ट्रीट आहे. रोज दिवसातून दोन तीन वेळा कॉफी पिणारेही आहेत आणि कॉफीला सेलिब्रेशनसारखं कधी मधी आवडीनं, कौतुकानं पिणारेही आहेत. कॉफीवर अनेक संशोधनं झाली आहेत. कॉफीतले आरोग्यदायी गुणधर्म, कशा पध्दतीनं कॉफी प्यायली तर शरीराला फायदे होतात, अती कॉफी पिल्याचे तोटे या अनेक विषयांवर संशोधनं झाली आहेत आणि सुरुही आहेत. अनेक संशोधनाचे निष्कर्ष कॉफीतील गुणधर्मांवर प्रामुख्याने प्रकाश टाकतात. संशोधनातील निष्कर्षानुसार कॉफी पिल्याने आनंद, प्रेम, समाधान, मैत्री, शांतता या सकारात्मक भावना निर्माण होतात. हार्वर्ड युनिर्व्हसिटीनं केलेल्या अभ्यासानुसार कॉफीमुळे डिप्रेशनचा धोकाही कमी होतो.

Image: Google

कॉफीच्या लाल पिवळ्या फळातील बियांमधे अँण्टिऑक्सिडण्टस असतात. एक कप कॉफी पिल्याने भरपूर अँण्टिऑक्सिडण्टस शरीरात जातात. एक कप कॉफीमुळे शरीराला जसे फायदे होतात तितकेच फायदे एक चमचा कॉफीमुळे त्वचेलाही होतात. तज्ज्ञ सांगतात की कॉफीमधील अँण्टिऑक्सिडण्टसचं प्रमाण आरोग्यासोबतच त्वचेसाठीही खूप फायदेशीर असतं. कॉफीचा उपयोग चेहेर्‍यावर फेस स्क्रब किंवा फेस पॅकपुरतीच सीमित नसून कॉफीमुळे त्वचेला निरनिराळे फायदे होतात. या प्रत्येक फायद्यासाठी कॉफी वापरण्याची विशिष्ट पध्दत आहे.

कॉफीचे सौंदर्योपयोग

Image: Google

1. त्वचेच्या खोलवर स्वच्छतेसाठी कॉफी स्क्रबकॉफीत अँण्टिऑक्सिडण्टस भरपूर प्रमाणात असतात. कॉफीच्या उपयोगाने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा चमकदार होते. यासाठी कॉफी, साखर, आणि लिंबाचा रस घालून त्याचा घट्टसर लेप करावा. हा लेप चेहेरा, मान आणि शरीरावर इतरत्रही लावता येतो. चेहेर्‍यावर हा लेप लावून तो काही वेळ ठेवावा. त्यानंतर स्क्रब करत ( चेहेरा हळुवात घासत) चेहेरा कोमट पाण्यानं धुवावा. कॉफी स्क्रब एकदा वापरला तरी लगेच चेहेर्‍यात फरक दिसून येतो.

2. कॉफीचा अँण्टिएजिंग इफेक्ट

कॉफीचा लेप चेहेर्‍यास लावल्यानं त्वचा घट्ट होते. कॉफीमधील गुणधर्म त्वचेवर अँण्टि एजिंग सारखे काम करतात. कॉफीचा हा इफेक्ट मिळवण्यासाठी एक चमचा कॉफी, एक चमचा दही आणि मध घ्यावं. या तिन्ही गोष्टी चांगल्या एकत्र करुन पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहेर्‍यावर लावून थोडा वेळ ठेवावी. मग त्वचा स्वच्छ करावी. ही पेस्ट धुण्याआधी थोडा वेळ हलक्या हातानं मसाज करावा. अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा कॉफी पेस्ट लावावी.

3. एक्सफोलिएटर कॉफी

कॉफीमधी नैसर्गिक गुणधर्म त्वचेसाठी एक्सफोलिएटरसारखं काम करतात.त्यामुळे कॉफी ही जीवाणूविरोधी घटकांमधे मिसळून चेहेर्‍यास लावल्यास त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या दूर होतात. मुरुम पुटकुळ्या ही समस्या बहुतांशपणे आढळते. यावर उपाय म्हणून कॉफीचा उपयोग होतो.मुरुम पुटकुळ्यांवर इलाज म्हणून, एक्सफोलिएटर म्हणून वापरताना सर्वात आधी कॉफीच्या बिया चेहेर्‍यावर रगडाव्यात. यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते. मुरुम पुटकुळ्याही कमी होतात. यासाठी 3 चमचे कॉफी पावडर, 3 चमचे मध घ्यावं. त्यानंतर दोन चमचे अँलोवेरा जेल आणि 2-3 थेंब लवेण्डर इसेंन्शिअल तेल घालावं. हा फेस पॅक चेहेर्‍यावा लावून तो पंधरा मिनिट राहू द्यावा. शेवटी पाण्यानं चेहेरा स्वच्छ धुवावा.

Image: Google

4 कॉफीतील सनस्क्रीन गुण

सुर्याच्या अतिनील किरणांचा त्रस हा होतोच. यामुळे त्वचेवर काळेपणा , फोड आणि त्वचा खराब होते. कॉफीमधे पॉलिफिनॉल हा घटक असतो. हा घटक त्वचेचं सुर्याच्या हानिकारक किरणांपासून्न वाचण्यासठी होतो. या सनस्क्रीन इफेक्टसाठी आणि सूर्याच्या घातक अती नील किरणांपासून वाचण्यासाठी एक चमचा कॉफी आणि एक चमचा लिंबाचा रस घ्यावा. तो चांगला मिळून घ्यावाही पेस्ट चेहेर्‍यावर पंधरा-वीस मिनिटं राहू द्यावी. नंतर चेहेरा पाण्यानं धुवावा.

5. कॉफीतील कॅफिन इफेक्ट

डोळे कायम सूजल्यासारखे वाटत असेल तर त्याचा उपाय हा कॉफीतही आहे. कॉफीत असलेल्या कॅफिनमुळे शरीर आणि त्वचेत घट्टपणा येतो. यासोबतच डोळ्यांखालची सूज घालवण्यासाठीही कॉफी वापरता येते. यासाठी एक ग्लास गरम पाणी करुन त्यात कॉफी मिसळावी. हे मिश्रण कापसाच्या बोळ्यानं डोळ्यांखाली लावावं.